You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अयोध्या प्रकरणाची 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी
अयोध्या प्रकरणाची 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आहे.
या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ समिती नेमण्यात आली होती. पण त्यांना कुठलाही तोडगा काढण्यात अपयश आल्यानं आता 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी घेण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलंय.
यापूर्वी मध्यस्थ समितीनं राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला होता.
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्च महिन्यात तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला हे यांनी समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिलं, तर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थाची भूमिका निभावली.
काय आहे रामजन्मभूमीचा वाद
वादग्रस्त जागा ही 2.77 एकरची आहे. 16व्या शतकात बाबरनं अयोध्येमध्ये मशीद बांधली होती. डिसेंबर 1992मध्ये हिंदू कारसेवकांनी ती मशीद पाडली आणि त्या ठिकाणी राम मंदिर होतं असा दावा केला. याच ठिकाणी हिंदूंचं दैवत रामाचा जन्म झाला होता अशी या हिंदू संघटनांची श्रद्धा आहे.
गेल्या 60 वर्षांपासून हा वाद सुरू आहे. मात्र 6 डिसेंबर 1992 ला अडवाणींच्या नेतृत्वात निघालेल्या रथयात्रेदरम्यान बाबरी मशीद पाडण्यात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)