गंगेच्या स्वच्छतेवर भाजपा नेते खोटं बोलत आहेत का?

फोटो स्रोत, Jitender/Ken
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
दक्षिण भारतातल्या अनेक सोशल मीडिया ग्रुप्सवर अनेक छायाचित्र शेअर केली जात आहेत. त्याबरोबर आणखी एक दावा केला जात आहे की भाजपने गेल्या काही वर्षांत गंगा स्वच्छतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
काही सोशल मीडिया ग्रुप्समध्ये #5YearChallenge तर काही ग्रुप्समध्ये 10YearChallenege या हॅशटॅगसकट हे फोटो शेअर झाले आहेत. त्यात असा दावा केला आहे की काँग्रेसच्या काळात गंगा नदीची परिस्थिती अतिशय खराब होती. भाजपच्या काळात ती बरीच सुधारली आहे.
भाजपच्या तामिळनाडू शाखेचे सरचिटणीस वनथी श्रीनिवासन यांनीही हे फोटो ट्विट केले आहेत. त्यात लिहिलं आहे की काँग्रेस सरकारच्या काळात (2014) आणि भाजप सरकारच्या काळात (2019) मध्ये काय बदल झाला ते पहा
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दक्षिण भारतातील काही नेत्यांनीही हे फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.
The frustated Indian and rightangles.in या उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या सोशल मीडिया ग्रुप्सनेही हे फोटो शेअर केले आहेत.
कन्नड भाषेतील BJP for 2019 - Modi Mattomme या फेसबुक ग्रुपने ही गेल्या आठवड्यात हे फोटो शेअर केले होते. त्यात लिहिलं होतं, "किती फरक पडलाय पहा. तुम्ही स्वत:च पहा. एक बार फिर मोदी सरकार असं म्हणण्यासाठी हे बदल बोलके आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मात्र आमच्या पडताळणीत आम्हाला असं लक्षात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आणि हिंदूंसाठी महत्त्वाचं असलेल्या वाराणसी शहराला गंगेच्या स्वच्छतेचा पुरावा म्हणून सादर केलं जात आहे ते चुकीचं आहे.
आमच्या पडताळणीत असं लक्षात आलं आहे की हा फोटो 2009 चा आहे, 2019 चा नाही.
पहिला फोटो
रिव्हर्स इमेज सर्चवरून असं कळतं की ज्या फोटोला 2009 चा आहे असं सांगण्यात आलं आहे ती 2015 ते 2018 या काळात आऊटलूक मासिकाने फाईल फोटो म्हणून छापला होता आणि अनेकदा वापरला होता.
मात्र हा फोटो नेमका कधी घेतला होता? हे जाणून घेण्यासाठी आम्ही आऊटलूकचे फोटो संपादक जितेंद्र गुप्ता यांच्याशी संवाद साधला.

फोटो स्रोत, JITENDER GUPTA/OUTLOOK
ते म्हणाले, "2011 मध्ये गंगा नदीच्या स्थितीची स्टोरी करण्यासाठी वाराणसीला गेले होते. तेव्हा त्यांनी हा फोटो घेतला होता. नंतर हा फोटो अनेकदा वापरला होता.
2011 मध्ये केंद्रात काँग्रेसचं आणि उत्तर प्रदेशात बसपाचं सरकार होतं.
आता दुसरा फोटो
या फोटोच्या आधारे भाजपने गंगा नदीचा कायापालट केल्याचा दावा केला आहे. तसंच हा फोटो 2019 चा आहे असाही दावा केला आहे.
रिव्हर्स सर्चच्या आधारे असं कळलं आहे की हा फोटो विकिपीडियावरून घेतला आहे.
उत्तर युरोपच्या एका विकिपीडिया पानावर हा फोटो आहे. त्यात वाराणसी शहराचं वर्णन दिलं आहे.

फोटो स्रोत, KEN WIELAND/FLICKR
विकिपीडिया च्या पानावर फोटो वेबसाईट फ्लिकरसाठी हा फोटो अमेरिकन फोटोग्राफर केन वीलँड यांनी घेतलेल्या फोटोचा वापर केला आहे.
फोटोग्राफरच्या मते मालवा साम्राज्याची राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने असलेल्या अहिल्या घाटात हा फोटो 2009 मध्ये घेतला होता.
2009 मध्येही केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आणि उत्तर प्रदेशात मायावती यांची सत्ता होती.
म्हणजे हे दोन्ही फोटो काँग्रेसच्या कार्यकाळात घेतले होते.
गंगेची स्थिती
मागच्या वर्षी गंगेची सफाई करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचं मुल्यांकन करण्यासाठी एका संसदीय समितीने आपल्या अहवालात सांगितलं होतं की सरकारने उचललेली पावलं पुरेशी नाही.
त्याचवेळी नॅशनल गंगा ट्रिब्युनल ने ही गंगेच्या सफाईवरूव सरकारला फटकारलं आहे.
गेल्या वर्षी 112 दिवस उपोषण करणारे पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जी.डी.अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरुप सानंद यांनी आपलं आयुष्य गंगेच्या सफाईसाठी वेचलं होतं.
उपोषणादरम्यान अग्रवाल म्हणाले होते, "आम्ही पंतप्रधान कार्यालय आमि जलसंसाधन मंत्रालयाला अनेक पत्र लिहिली. मात्र कोणीही उत्तर देण्याचे कष्ट घेतले नाहीत."

फोटो स्रोत, ROHIT GHOSH/BBC
2014 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून वाराणसीत गंगा नदी स्वच्छ करण्याबद्दल बोलले होते. तेव्हा खासदारपदाचे उमेदवार म्हणून गंगेला नमन करताना ते म्हणाले, "मी इथे स्वत: आलेलो नाही, मला कोणीही बोलावलेलं नाही. गंगामातेने मला इथे बोलावलं आहे."
मोदी यांनी सत्तेत आल्यावर सुरुवातीच्या काळात गंगेच्या स्वच्छतेबाबत गांभीर्य दाखवलं होतं. त्यासाठी गंगा संरक्षण मंत्रालयाची स्थापनाही केली होती.
केंद्र सरकारने राज्य सभेत सांगितलं होतं की 2014 ते 2018 या काळात गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी 3867 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा खर्च झाला आहे. जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण राज्य मंत्री डॉ.सत्यपाल सिंह
यांनी 2018 मध्ये राज्यसभेत ही माहिती दिली होती.
तसंच ज्यावरून गंगेची किती स्वच्छता झाली हे कळू शकेल अशी कोणतीच आकडेवारी नाही हा खुलासा 2018 मध्येच एका RTI मध्ये झाला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








