अमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण, ट्वीट करून दिली माहिती

फोटो स्रोत, Getty Images
भाजप अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.
"मला स्वाईन फ्लू झाला आहे आणि त्यावर उपचार सुरू आहेत. देवाची कृपा आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी लवकरच बरा होईल," असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अमित शहा यांनी हे ट्वीट केल्यानंतर अनेकांना त्यांना लवकर बरं व्हा असा संदेश दिला आहे. त्यामध्ये अनेक भाजप नेत्यांचा समावेश आहे.
अमित शहा यांना सध्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांनी त्यांची एम्समध्ये जाऊन विचारपूस केली.
ताप आणि अस्वस्थ वाटल्यामुळे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास अमित शहा एम्समध्ये गेले होते. त्यानंतर तपासण्यांमध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचं आढळलं, असं आज तकनं त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
तपासात स्वाईन फ्लू झाल्याचं लक्षात येताच त्यांना तात्काळ अॅडमिट करण्यात आलं. साधारण दोनतीन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)