You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साहित्य संमेलन : भाजप सरकारवर जोरदार टीका
नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं ही वाईट गोष्ट होती असं म्हणत मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. संमेलनाच्या खर्चासाठीचं इतरांवरचं अवलंबित्व कमी करण्याचा सूचक इशाराही त्यांनी आयोजकांना दिला.
असहिष्णुता वाढत चालली आहे असं म्हणत देशमुख यांनी अनेक प्रसंगांचे दाखलेही दिले. तसंच, सहगल निमंत्रण प्रकरणात भाजपच्या मदन येरावार यांच्या प्रतिनिधींनी दबाव आणल्याचा आरोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बीबीसीशी बोलताना केला.
या सगळ्या नाट्याबद्दलची श्रीपाद जोशी यांची सविस्तर मुलाखत, तसंच संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या ठळक घडामोडी तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येतील.
'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.
बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)