शक्तिकांता दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्र स्वीकारली

माजी अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्र हाती घेतली. उर्जित पटेल यांनी सोमवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या अर्थसचिवाच्या कार्यकाळात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादरम्यान तेच सरकारच्या वतीने सर्व निर्णय आणि नियम जनतेपर्यंत पत्रकार परिषदांमध्ये पोहोचवत होते.

बुधवारी त्यांनी RBIच्या गव्हर्नरपदाची सूत्र स्वीकारल्यावर सर्वांचे शुभेच्छांसाठी आभार मानले.

शक्तिकांता दास हे 1980च्या बॅचचे तामिळनाडू केडरमधील IAS अधिकारी आहेत. ते सध्या पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत. ते 2017 पर्यंत आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते.

ते G20 परिषदेत भारताचे प्रतिनिधी आहेत. त्यांना आधी महसूल विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर आर्थिक घडामोडी विभागात त्यांची बदली झाली होती. नोटबंदीचा निर्णय राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या दीर्घकालीन करिअरमध्ये त्यांनी तामिळनाडू सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवली. त्याता तामिळनाडूच्या औद्योगिक विभागाचे सचिव, तामिळनाडू न्यूजप्रिंट आणि पेपर्स लिमिटेडचे अध्यक्ष, भारतीय जीवन विमा महामंडळाचे अध्यक्ष अशा अनेक पदांचा समावेश आहे. 

मे 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन नोटा काढल्या आहेत. त्यावर शक्तिकांता दास यांची सही होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)