You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक्झिट पोल : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा
अनेक पराभवांच्या मालिकेनंतर आता काँग्रेसला अपेक्षा आहे की त्यांना यावेळी विजयश्री मिळेल. आज मतदान संपल्यानंतर येत असलेल्या एक्झिट पोल्सच्या आकड्यांनी काँग्रेसला निश्चित आनंद झाला असेल. कारण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येऊ शकते, असा अंदाज अनेक एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस सत्तेत येऊ शकतं, असा अंदाज काही पोल्सनी व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये 230 जागांसाठी 76.39 टक्के मतदान झालं. इथे सध्या भाजपची सत्ता असून शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहे.
इथे काँग्रेसची सत्ता येऊ शकते, असं दोन पोल्सनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊच्या पोलनुसार इथे भाजप सत्ता कायम राखेल तर आज तकनुसार इथे दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत आहे.
राजस्थान
राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 59.43 टक्के मतदान झालं. इथेही सध्या भाजपची सत्ता असून वसुंधरा राजे मुख्यमंत्री आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या दोन सर्व्हेंनुसार इथे काँग्रेसची सत्ता येऊ शकते तर एक सर्व्हे दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत दाखवत आहे.
याशिवाय लोकनीती-CSDSच्या एक्झिट पोलमध्येही कांग्रेसला बहुमत मिळताना दिसतंय.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी 76.35 टक्के मतदान झालं. याही राज्यात भाजपचीच सत्ता असून मुख्यमंत्री रमण सिंह आहेत.
इथे तीन पोल्सनुसार भाजप तर दोन पोल्सनुसार काँग्रेसची सत्ता येऊ शकते.
तेलंगणा
तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसप्रणित आघाडीमध्ये स्पर्धा आहे. इथे तेलंगणा राष्ट्र समिती जिंकत असल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या पोल्सनुसार दिसत आहे.
सर्व पाच राज्यांची मतमोजणी 11 डिसेंबरला होणार आहे. मंगळवारी दुपारपर्यंत कोणत्या राज्यात कुणाची सत्ता येईल याचे चित्र स्पष्ट होईल.
मिझोरम
प्रतिक्रिया आणि विश्लेषण
पत्रकार शिवम विज ट्विटरवर - "खूप माहितीपूर्ण भाकित नाही वर्तवतोय, पण एक राजकीय अंदाज म्हणून सांगू इच्छितो - 11 डिसेंबरला भारतीय जनता पक्ष एक देखील राज्य जिंकणार नाही."
पत्रकार रोहिणी सिंह ट्विटरवर - "हे विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाचे आहेतच. पण डिसेंबर 11 ला हेसुद्धा स्पष्ट होईल की मायावतींचा प्रभाव किती आहे, त्याची राजकीय पत वाढेल की कमी होईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)