You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट कोहलीचे वनडेत सर्वांत जलद 10 हजार रन : 'रनमशीन'चा नवा विक्रम
'रन-मशीन' म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध विराट कोहलीने वनडेत 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करत शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा रोवला. वनडे क्रिकेटमध्ये 10,000 रन्सचा पल्ला गाठणारा विराट एकूण 13वा तर 5वा भारतीय बॅट्समन ठरला आहे. विशेष म्हणजे विराटने केवळ 205 वनडे इनिंग्जमध्ये हा टप्पा पूर्ण केला. सगळ्यांत कमी मॅचेसमध्ये 10,000 रन करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरने 259 इनिंग्जमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठला होता. अद्भुत सातत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटने केवळ 213 मॅचमध्येच हा विक्रमी टप्पा गाठला.
विराटने 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्ध दम्बुला येथे वनडे पदार्पण केलं होतं. अवघ्या दहा वर्षात विराटने हा जादुई आकडा पार गाठला. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी या भारतीय बॅट्समननी हा टप्पा पूर्ण केला होता.
वनडेत 10,000 धावांचा टप्पा गाठणारे बॅट्समन
वर्षनिहाय कामगिरी
विराट कोहलीच्या वर्षनिहाय कामगिरीवर एक नजर टाकूया
विविध संघाविरुद्धची कामगिरी
विविध संघाविरुद्ध विराट कोहलीने बजावलेल्या कामगिरीवर एक दृष्टिक्षेप:
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)