सोशल : 'भारतात क्रिकेटला अवास्तव महत्त्व, त्यापेक्षा इतर खेळांना प्रोत्साहन द्या'

सोशल

फोटो स्रोत, Getty Images

एशियन गेम्सच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये भारताने 10 पदकं आपल्या खात्यात जमा केली आहेत. मग आपला देश इतका क्रिकेटवेडा का आहे, हा प्रश्न पडतोच.

आज आम्ही हाच प्रश्न 'होऊ द्या चर्चा'मध्ये वाचकांना विचारला. आणि त्यांनीसुद्धा "आपल्या देशात क्रिकेटला अवास्तव महत्त्व दिलं जातं," असं मत व्यक्त केलं. तर काहींनी गावपातळीवर खेळायला जागा आहे कुठे, असा प्रश्नंही उपस्थित केला.

ही आहेत वाचकांची काही निवडक आणि संपादित मतं -

भाऊ पांचाळ यांच्या मते, "भारतात क्रिकेटच्या मानाने इतर खेळांच्या बाबतीत पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाच्या सोयी खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतात. यासोबतच आर्थिक आणि लोकप्रियतेचं गणितंही आहेतच. सुविधा आणि प्रचार-प्रसाराच्या अभावामुळे अंगभूत गुणवत्ता असूनही ती सहजपणे लक्षात येत नाही."

"ग्रामीण आणि निमशहरी भागात तर खेळात भविष्य घडवता येतं, हेच माहिती नसतं. ज्यांना माहिती असतं त्यांना काय केलं पाहिजे, गुणवत्ता सिद्ध करण्याचं व्यासपीठ कोणतं, याबद्दल माहिती नसते. जोपर्यंत इतर खेळांचं महत्त्व, त्यातील संधी, त्यात असलेले भविष्य आणि त्या बद्दलचा दृष्टिकोन याबद्दल जागरूकता निर्माण होत नाही, तो पर्यंत विशालकाय लोकसंख्येच्या देशात क्रीडानैपुण्याचा दुष्काळ राहणारच."

पोस्ट

डेक्सटर मुरगन म्हणतात, "ज्या दिवशी एक बाप आपल्या मुलाच्या / मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला प्लास्टिक बॅट आणि बॉल आणून नं देता, फुटबॉल, बॅटमिंटन रॅकेट आणून देईल, त्या दिवशी परिस्थिती बदलली, असं म्हणू शकतो. क्रिकेटमध्ये पैसा आहे म्हणून तिकडे जाणारे खूप आहेत. तसा पैसा, तसं ग्लॅमर कुस्ती, बॅटमिंटन सुद्धा मिळवून देऊ शकतं, हे आपल्याला आता समजत आहे."

पोस्ट

माहेश्वरी घाग म्हणतात, "खेळाडू हे मेहनतीच्या आधारेच स्पर्धेत उतरत असतात. सरकार त्यांच्यापाठीशी किती ताकदीने उभी राहते, यावर ते आणखी मनापासून खेळतात."

मेघा अशोक गावडे यांना भारतीयांनी इतर खेळातही रस घ्यायला हवा असं वाटतं. त्या म्हणतात, "भारतात क्रीडा संस्कृती खूप काळापासून आहे. ज्या प्रमाणात पालक हे मुलांनी क्रिकेट खेळावं म्हणून पुढाकार घेतात, तेवढा ते इतर खेळांसाठी घेताना दिसून येत नाही. यामागे अर्थकारण दिसून येतं. कारण पाच-सात वर्षं राज्य पातळीवर अथवा राष्ट्रीय पातळीवर खेळून सहजरीत्या लाखो कमवता येतात, हे गैरसमज आहेत. त्या अनुषंगाने क्रिकेटमधे पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी मिळतात, जे दुर्दैवाने इतर खेळांच्या बाबतीत होत नाही."

पोस्ट

"भारताने खरंतर क्रिकेट बंदच करावं. फुकटच 11 खेळाडूंसाठी कोटींचा खर्च, मोठी मोठी स्टेडिअम्स महिनोनमहीने बंदच ठेवावी लागतात. त्यात परत फिक्सिंगच्या भानगडी. त्यापेक्षा इतर सर्व मैदानी खेळांत मुलांचा जास्तीत जास्त सहभाग करावा," असं मत विनोद सामंत यांनी व्यक्त केलं.

पोस्ट

"भारतीयांनी इतर खेळांमध्ये नक्कीच रस घ्यायला हवा आणि BCCIला इतर खेळांची स्पॉन्सरशीप बंधनकारक करावी," असा विचार सचिन देशपांडे यांनी मांडला आहे.

इतर खेळांची क्रिकेटबरोबर तुलना केली जाऊ नये, असं सुभाष ढवळे यांना वाटतं. इतर खेळातील सर्वं पदाधिकारी आणि त्या-त्या खेळातील जाणकारांनी खेळाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं ते म्हणतात.

सुनिल सांगळे म्हणतात, "खेळायला जागा कुठे आहे? प्रत्येक तालुक्यात स्टेडिअम हवं आणि सर्व सुविधा हव्यात. मुख्य म्हणजे सामान्य मुलांना सहज प्रवेश हवा."

पोस्ट

राजेंद्र गाडेकर म्हणतात, आपले खेळाडू चमकत असून त्यांना प्रोत्साहन द्यायलाय पाहिजे. तर गौरी भुते यांच्या मते आपण क्रिकेटला अवास्तव महत्त्व देत आहोत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)