सोशल : 'राज्यघटना जाळणं म्हणजे देशद्रोहच'

सोशल

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/Getty Images

भारतीय राज्यघटना जाळणं हा एकप्रकारे देशद्रोहच असून अशांना देशद्रोही घोषित केलं पाहिजे, असं मत बीबीसी मराठीच्या वाचकांनी व्यक्त केलं आहे.

आरक्षण धोरणाला विरोध करत दिल्लीत एका संघटनेने राज्यघटनेची प्रत जाळली होती. आझाद सेना नावच्या एका संघटनेने हे कृत्य केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर दोघांना अटक झाली आहे.

या प्रकारावर बीबीसी मराठीने वाचकांना 'होऊ द्या चर्चा'मध्ये त्यांची मतं विचारली होती. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया अशा.

पोस्ट

शशिकांत पवार म्हणतात, "राज्यघटना मुळात कोण्या एका धर्माची अथवा समूहाची नाही ती भारतातील सर्व नागरिकांची आहे. ज्या अर्थी भारतीय राज्यघटना जाळली गेली त्या अर्थी या व्यक्तींना, संघटनेला भारतीय स्वातंत्र्य, कायदे मान्य नाहीत. याचाच अर्थ ही देशाशी गद्दारी असून त्यांना स्वातंत्र्य मान्य नाही. म्हणजेच ते देशद्रोही आहेत."

पोस्ट

जय मैत्रय म्हणतात, "राज्यघटना हा तुमच्या मूलभूत हक्कांचा, धार्मिक, वैचारिक, न्याय, समता आणि स्वातंत्र्याचा करार आहे. राज्यघटनेच संरक्षण करणे आपल्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ला केलेल्या भाषणाचे पुन्हा स्मरण होणे गरजेचे आहे. देश सर्वोच्च मानून जबाबदारी पार पाडणे हे नागरिकांच मूलभूत कर्तव्य आहे."

पोस्ट

प्रेमकुमार ढगे म्हणतात, "आझाद सेनेला 'आझाद' या शब्दाचा अर्थ कळाला असता तर त्यांनी हा अक्षम्य अपराध केला नसता. आज प्रत्येक व्यक्ती मुक्त आणि स्वतंत्र श्वास घेते ते केवळ राज्यघटनेमुळे शक्य झालं आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला शासनाचा निषेध आणि विरोध करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र हा निषेध सविनय, अहिंसक आणि कायदेशीर असावा. अशा या राज्यघटना जाळून निषेध करणे म्हणजे देशाचा अपमान आहे."

पोस्ट

बालाजीराव काळे म्हणतात, "डॉ. बाबासाहेब यांची निर्मिती असलेलं भारतीय राज्यघटना सर्वोच्च आहे. राज्यघटना जाळल्याने ती नष्ट होत नाही अथवा बहिष्कृत होत नाही. राज्यघटना का जाळली? एवढा विद्रोह का? त्यांना परत भारतात राजेशाही किंवा हुकूमशाही आणायची आहे का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे सरकारला शोधून त्यावर कायमचा बंदोबस्त करायला हवा."

पोस्ट

नयन साळवी म्हणतात, "भारतीय राज्यघटना आरक्षणाच्याही खूप वर आहे. आरक्षण म्हणजे राज्यघटना आणि राज्यघटना म्हणजे आरक्षण, हा समज चुकीचा आहे. ज्यांना नीट राज्यघटना समजलेली नाही ते असे प्रकार करत आहेत."

पोस्ट

अमोल सपकाळे म्हणतात, "आरक्षणाच्या विरोधात राज्यघटना जाळणं हा मूर्खपणा आहे. कारण आरक्षणाचं मूळ राज्यघटनेत नाही ते जातीव्यवस्थेत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या विरोधात जर काही जाळायचं असेल तर सर्वप्रथम जातीव्यवस्था आणि जातीव्यवस्थेची प्रतीक जाळली पाहिजेत."

पोस्ट

संतोष झाल्टे म्हणतात, "राज्यघटना ही कुण्या एका समाजाची नाही. सर्व भारतीयांसाठी ती अभिमानास्पद आहे. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आज राज्यघटना जाळली उद्या राज्यघटना बदला म्हणतील."

पोस्ट

अविनाश कांबळे म्हणतात, "राज्यघटना जाळणे किंवा फाडणे उचित नाही. विरोध करणे अथवा बदल करण्यासाठी संसदीय मार्गाने चर्चा करून संसदेतच या विषयी निर्णय घ्यायला हवा."

पोस्ट

मीना आपटे काने म्हणतात, "राज्यघटना जाळून ते बदलणार नाही. राज्यघटनेचे श्रेष्ठत्व आहेच. ते कोणीही नाकारू शकत नाही."

पोस्ट

आदित्य कानडे म्हणतात, "भारतीय राज्यघटना ही एका जातीची किंवा धर्माची नाही. ज्यांना राज्यघटनेचे कायदे मान्य नाहीत ते भारतीय असूच शकत नाहीत. जातीयवादाला बळी पडून हे असे देशद्रोही कृत्य कुणी करू नये."

पोस्ट

समीर म्हणतात, "प्रत्येक नागरिकाने किमान मूलभूत अधिकारांची माहिती करून घेतली पाहिजे. जमल्यास आपल्या राज्यघटनेचा पायाभूत अभ्यास करावा."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

स्मिता साळवे म्हणतात, "राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकीला चांगलं जीवन मिळालं आहे. एक मुलगी म्हणून मला राज्यघटनेचा खूप मोठा आधार आहे."

सदानंद गायकवाड म्हणतात, "राज्यघटना जाळण्यापेक्षा ते एकदा वाचलं असतं तर डोक्यातले वाईट विचार जळून खाक झाले असते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)