You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खरंच Ease of Livingच्या बाबतीत पुणे-मुंबई देशात सर्वोत्तम आहेत का?
पुणे शहरासाठी आनंदाची बातमी आहे. गृहनिर्माण, नागरी विकास मंत्रालयाच्या Ease of Living Index मध्ये पुणे शहराने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. नवी मुंबई दुसऱ्या, बृहन्मुंबई तिसऱ्या आणि ठाणे सहाव्या क्रमाकांवर आहे.
विशेष म्हणजे देशाची राजधानी नवी दिल्ली 65व्या क्रमांकावर आहे.
हा सर्व्हे देशातील 111 शहरांत घेण्यात आला. या यादीतील पहिली 10 शहर पुढील प्रमाणे.
- पुणे
- नवी मुंबई
- बृहन्मुंबई
- तिरुपती
- चंदिगढ
- ठाणे
- रायपूर
- इंदूर
- विजयवाडा
- भोपाळ
नागरी विकास खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले ही निवड चार निकषांवर करण्यात आली आहे:
- शहरातील प्रशासन
- सामाजिक संस्था
- आर्थिक सुविधा
- पायाभूत सुविधा
कोलकत्याने या पाहणीत भाग घ्यायला नकार दिला होता, असं ते म्हणाले.
या घोषणेवर संमिश्र प्रतिक्रियी आल्या आहे. शिव खेमका ट्विटरवर लिहितात की पुण्यात टॅक्सी मिळणं कठीण आहे. भाड्याने घर मिळणं त्रासदायक आहे. बाजार आणि गरजेच्या वस्तू जवळ उपलब्ध नसतात.
तर दीपक अय्यर लिहितात की पुणं सुरक्षित शहर आहे. तिथे शाळा आणि महाविद्यालयं चांगली आहेत.
गार्फिल्ड डिसुझा लिहितात की अंधेरी पूर्वेतून अंधेरी पश्चिममध्ये जायला एक तास लागतो, तर मुंबई तिसऱ्या नंबरवर कशी?
तर अमेय फडके लिहितात की मोटरमन संपावर गेलेले असताना टीएमटीची बस मिळत नाही आणि ठाणं सहाव्या नंबरवर कसं?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)