करुणानिधी यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा, तामिळनाडूत सर्वत्र प्रार्थना

फोटो स्रोत, FACEBOOK / PG / KALAIGNAR89
तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे (DMK) अध्यक्ष एम. करुणानिधी यांची तब्येत काही काळ अत्यवस्थ झाली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं हॉस्पिटलनं स्पष्ट केलं आहे. करुणानिधी यांच्यावर चेन्नई इथल्या कावेरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
"रात्री उशिरा करुणानिधी काही काळासाठी अत्यवस्थ झाले होते. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसत आहे. डॉक्टरांचं पथक लक्ष त्यांच्यावर ठेवून आहे," अशी माहिती त्यांच्या पक्षाने एका ट्वीटद्वारे दिली. कावेरी हॉस्पिटलचं ते रात्री 9.50 चं हेल्थ बुलेटिन होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यांची तब्येत अत्यवस्थ झाल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. हॉस्पिटलबाहेरील गर्दी कमी करण्यासाठी DMKच्या नेत्यांनी पाठीराख्यांना शांतता राखून माघारी जाण्याचं आवाहन केलं.
रात्री उशिरा करुणानिधींचा मुलगा M. K. स्टॅलिन यांनी आवाहन केलं, "मी विनंती करतो की कृपया सर्वांनी कुठल्याही अनुचित प्रकार घडेल, लोकांना त्रास होईल, असं कोणतंही कृत्य करू नये."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पण अजूनही शेकडो लोक हॉस्पिटलबाहेर प्रार्थना करत आहेत. यामुळे हॉस्पिटलबाहेर रात्री साडेआठनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
रविवारी दिवसभरात अनेक मोठ्या नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सकाळीच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांबरोबर काही वेळ घालवला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
भारताच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, पाच वेळा मुख्यमंत्री आणि 60 वर्षं लोकप्रतिनिधी असलेले करुणानिधी वैयक्तिकरीत्या एकही निवडणूक हरलेले नाहीत.
करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील DMK 1998 ते 2014 मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या पहिल्या सरकारमध्ये तामिळनाडूतील 12 मंत्री होते. द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं.
या खात्यामार्फत जाहीर झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि करुणानिधी यांची मुलगी व खासदार कनिमोळी यांना तुरुंगावास झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)