'हिमा दासचं इंग्लिश चांगलं नाही, पण...' : AFIच्या ट्वीटने अर्थाचा अनर्थ झाला

फोटो स्रोत, facebook/hima das
आसामची 18 वर्षीय धावपटू हिमा दास हिने 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचला आहे.
भारताला जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे, शिवाय सोशल मीडियावर ती ट्रेंड होते आहे नि चोहीकडून तिचं कौतुक सुरूच आहे.
फिनलँडमधल्या टँपेयर शहरात हा इतिहास रचल्यानंतर माध्यमांनी तिच्याबरोबर इंग्रजीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आसामची ही 'फ्लाइंग क्वीन' त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्नही करत होती. तसा व्हीडिओ Athletics Federation of India (AFI) ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. पण एकीकडे हा ऐतिहासिक क्षण शेअर करण्याच्या भानगडीत घोळ झाला नि मग AFIला माफी मागावी लागली.

फोटो स्रोत, facebook/nipun das
तर झालं असं की, या व्हीडिओबरोबर AFIने ट्वीटमध्ये लिहिलं, "उपांत्य लढतीत गोल्ड मेडल पटकावल्यानंतर हिमा दासने माध्यमांबरोबर संवाद साधला. तिचं इंग्लिश चांगलं नाही, पण तिथेही तिने आपलं बेस्टच दिलं. खूप खूप अभिमान आहे तुझा, #HimaDas फायनलसाठी शुभेच्छा!"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अनेकांना या ट्वीटमधला तिच्या इंग्रजीविषयीचा भाग अनावश्यक, तर काहींना तो अपमानजनक वाटला. लोकांनी मग ट्विटरवर AFIलाच धारेवर धरलं.
रोहित राम म्हणाले, "ती टँपेयरमध्ये आपलं ट्रॅकवरचं कौशल्य दाखवायला गेली आहे, इंग्लिशचं नाही. लाज वाटायला पाहिजे असं बोलताना AFI."

फोटो स्रोत, TWITTER
याच्या प्रत्युत्तरात AFIने राहित यांना मूळ ट्वीट पुन्हा वाचण्याचा सल्ला दिला आणि ट्रोलिंग बंद करण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, TWITTER
त्यापाठोपाठ आणखी एका ट्वीटमध्ये AFIने स्पष्टीकरण दिलं - "तिची खूप साधारण पार्श्वभूमी आहे आणि तिला धड हिंदीही बोलता येत नाही. आम्ही तर तिच्या पत्रकारांना सामोरं जाण्याच्या या धाडसाचं कौतुक करत आहोत. पाहा किती चांगला प्रयत्न करत आहे ती इंग्लिशमध्ये बोलण्याचा. आशा करतो की आता तरी तुम्हाला त्या ट्वीटचा आशय कळला असेल."

फोटो स्रोत, TWITTER
आणखी एका व्यक्तीने म्हटलं, "पण तुम्हाला तिच्या इंग्लिशविषयी बोलण्याची गरजच का भासली?"
"तिच्या इंग्लिशविषयी बोलताना तुमचंही स्पेलिंग चुकलंय - speking नाही, speaking असतं," असं हरी SV यांनी लक्षात आणून दिलं.

फोटो स्रोत, TWITTER
माजी भाजप खासदार तरुण विजय यांनीही यावर ट्वीट केलं, "#HimaDas ने एकदम व्यवस्थित उत्तर दिलं - ती आमची हिरो आहे. आणि आपण तिच्याकडून स्पष्ट इंग्लिश बोलण्याची अपेक्षाच का ठेवावी? AFIला आसामी किंवा कुठलीही भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता येते का? आणि किती चँपियन्स शुद्ध इंग्लिशमध्ये बोलू शकतात? तुम्ही गुलामगिरीच्या मनःस्थितीने ग्रासले आहात."

फोटो स्रोत, TWITTER
अखेर AFIला वाटलं की आपलीच चूक झाली आणि हा मुद्दा माफी मागूनच मिटवता येईल.
मग त्यांनी ट्वीट केलं की "त्या एका ट्वीटने अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आम्हाला फक्त हे सांगायचं होतं की आमची धावपटू कुठल्याही आवाहनाला घाबरत नाही... ना मैदानात, ना मैदानाबाहेर. एका छोट्या गावातून येऊनही तिने परदेशात इंग्रजी पत्रकारांना बिनधास्त उत्तरं दिली. पुन्हा एकदा क्षमस्व. जय हिंद."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
आणखी एका ट्वीटमध्ये AFIने सांगितलं की तो व्हीडिओ इतका चांगला असल्यामुळे आम्ही ते ट्वीट डिलीट करणार नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
उल्लेखनीय म्हणजे आधी स्पेलिंगची चूक झाल्यानंतर AFIने हे ट्वीट हिंदीतून केले.
लोकांनी या माफीनाम्याच्या ट्वीट्सना योग्यरीत्या स्वीकारलं. कांचन नावाच्या एका युजरने म्हटलं की, "तुमचा हेतू चुकीचा नव्हता, पण तुमच्या शब्दांनी अर्थाचा अनर्थ केला. तुमच्या स्पष्टीकरणाने तुम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद."

फोटो स्रोत, TWITTER
हिमा मूळची आसाममधल्या नौगांव जिल्ह्यातली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. तिचे वडील शेती करतात.
हिमाचे कोच निपुण दास यांनी सांगितलं की आधी तिच्या घरचे तिला आर्थिक अडचणींमुळे गुवाहाटीला प्रशिक्षणासाठी पाठवण्यास तयार नव्हते. मग दास यांनीच तिचा सगळा खर्च उचलला नि तिला गुवाहाटीमध्ये ट्रेनिंग दिलं.
हिमापूर्वी भारताच्या ज्युनियर आणि सिनियर गटातल्या कोणत्याही महिलेनं जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिप स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








