हिमा दास : भारताची नवी 'फ्लाईंग राणी'

फोटो स्रोत, Getty Images
क्रिकेटच्या मैदानात भारत जेव्हा इंग्लंडचा दणकून पराभव करत होता, तेव्हा ट्विटरवर एक वेगळाच ट्रेंड सुरू होता. या सामन्यात कुलदीप यादवनं 6 विकेट घेतल्या होत्या. तर, रोहित शर्मानंही शतक झळकावलं होतं. पण, यांचा ट्रेंड ट्विटरवर दिसण्याऐवजी आसामची 18 वर्षीय अॅथलिट हिमा दास हिचं नाव ट्विटर ट्रेंड्समध्ये वर आलं होतं.
हिमा दास हिचं नाव ट्विटरवर पुढे येण्यामागचं कारणही विशेष होतं. कारण, फिनलँडमधल्या टॅम्पेयर शहरात हिमा दास हिनं एक नवा इतिहास रचला होता.
हिमानं IAAF च्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी भारताच्या ज्युनियर आणि सिनियर गटातल्या कोणत्याही महिलेनं जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिप स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं नाही.
हिमानं ही धावण्याची स्पर्धा 51.46 सेकंदांमध्ये पूर्ण केली आहे. या स्पर्धेत रोमानियाच्या एंड्रिया मिकलोसला रौप्य आणि अमेरिकेच्या टेलर मँसनला कांस्य पदक मिळालं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
धावण्याची स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हा हिमा पहिल्या तीन धावपटूंमध्ये देखील नव्हती. पण, नंतर तिनं वेग पकडला आणि एक इतिहास घडवला.
स्पर्धेनंतर जेव्हा हिमानं सुवर्ण पदक पटकावलं तेव्हा समोर भारताचं राष्ट्रगीत वाजू लागलं. यावेळी हिमाचे डोळे पाणावलेले दिसत होते.
चांगल्या खेळात सातत्य
बुधवारी या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत चांगली कामगिरी करत 52.10 सेकंद धावून तिनं पहिलं स्थान पटकावलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यापूर्वीच्या स्पर्धेतही तिनं 52.25 सेकंद धावून पहिलं स्थान राखलं होतं.
अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानंही हिमा दासच्या या उत्तम कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यावर्षीच्या एप्रिलमध्ये गोल्ड कोस्ट इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हिमा 10व्या स्थानावर राहिली होती.
या स्पर्धेत तिनं 51.32 सेकंदांत धावण्याचा विक्रम केला.
याच राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये 4 X 400 मीटर रिले स्पर्धेत तिला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय नुकत्याच गुवाहाटी इथं झालेल्या आंतरराज्य चँपियनशिप स्पर्धेत तिनं सुवर्ण पदक मिळवलं होतं.
हिमाचे रेकॉर्ड
- 100 मीटर 11.74 सेकंद
- 200 मीटर 23.10 सेकंद
- 400 मीटर 51.13 सेकंद
- 4 X 400 मीटर 3:33.61

भारताला जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या हिमा दास यांच्या कुटुंबीयांशी त्यांच्या आसाममधल्या घरी संवाद साधत आहेत बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








