#बीबीसीसंगेवारी फोटो : 'टाळ, मृदुंग हाती घेऊ, विठ्ठलाचे गुण गाऊ'

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी देहूहून

समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी संप्रदायाच्या सणाला म्हणजेच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली आहे.

टाळ-मृदुंगाच्या तालात, हरिनामाचा गजर करत संत तुकाराम महाराजांची पालखी शुक्रवारी देहूहून निघाली.

हाती वीणा आणि मुखी विठ्ठलाचे नाम!

काही वारकरी पूर्ण वारी दरम्यान हातात वीणा घेऊन जय हरी विठ्ठलचा जयघोष करतात.

जगद्गुरू तुकारामांचा 333वा पालखी सोहळ्याच्या प्रस्थानप्रसंगी देहू नगरीत भक्तांचा जनसागर लोटलाय.

काही महिला वारीदरम्यान डोक्यावर छोटंसं तुळशी वृंदावन घेऊन प्रवास करतात. तुळशीला रुखमाईचं रूप समजलं जातं.

फुगडी हा महिलांचा खेळ समजला जातो. पण वारीमध्ये स्त्री-पुरुष हा भेद नसतो सर्व वारकरीचं असतात. त्यामुळे पुरुषही फुगडी खेळताना वारीत दिसतात.

टाळ, मृदंग, वीणाच्या तालात विठ्ठलाच्या भजनात दंग झालेले वारकरी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक देहूमध्ये येतात आणि वारीत सहभागी होतात.

वारीला निघण्यापूर्वी तुतारी वाजवताना एक सेवेकरी.

दरम्यान, ज्ञानेश्वर माऊलींची पालखीनेही आळंदीहून पंढरपूराकडे प्रस्थान ठेवलं आहे. आळंदीचं समाधी मंदिर आणि त्यातला सुवर्णपिंपळ परिसर वारकऱ्यांनी भरून गेलाय. त्याचा हा खास 360 डिग्री व्ह्यू.

.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)