प्रणव मुखर्जी : 'द्वेषामुळे भारताची राष्ट्रीय ओळख धोक्यात'

RSSच्या कार्यक्रमाला जाणारे प्रणव मुखर्जी काही पहिलेच नेते नाहीत. याबाबतच RSSचे माजी प्रचारक के. एन. गोविंदाचार्य यांनी केलेले विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा - संघाचं आमंत्रण स्वीकारणारे प्रणब मुखर्जी काही पहिले नेते नाहीत

रात्री 9. 15 : काँग्रेसची पत्रकार परिषद

प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणातून RSSला आरसा दाखवण्याचं काम केल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तंसच भारताच्या इतिहासाची त्यांनी RSSला आठवण करून दिल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

रात्री - 8.57 : 'राष्ट्रवादाचा उगम संविधानातून'

अधुनिक इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मुखर्जी यांच्या भाषणानंतर असं ट्वीट केलं आहे. "प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील मुख्य मुद्दा म्हणजे त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की राष्ट्रवादाचा उगम संविधानातूनच होतो."

इथे पाहा प्रणव मुखर्जी यांचे संपूर्ण भाषण LIVE -

रात्री 8 : विविधता भारताची सर्वात मोठी ताकद -प्रणव मुखर्जी

- राष्ट्र, राष्ट्रभावना आणि राष्ट्रभक्तीवर बोलायला आलो आहे.

- इतिहासकाळात भारतात आलेल्या प्रवाशांनी भारतीय प्रशासन यंत्रणेची प्रशंसा केली आहे.

- देशातील सर्व जनतेचं देशभक्तीमध्ये योगदान.

- भाषणात वेगवेगळे ऐतिहासिक दाखले.

- भाषणात टिळक, गांधी आणि पटेल यांचा उल्लेख

- राष्ट्रवाद कुठल्याही धर्म आणि भाषेत विभागलेला नाही.

- सहनशीलता हा आपल्या समाजाचा आधार.

- वैचारिक वैविध्य आपण नाकारू शकत नाही.

- लोकशाहीत संवाद आवश्यक, संवादातून प्रत्येक समस्येचं निराकरण.

- अंहिंसक समाजच प्रगती करु शकतो.

- द्वेष, असहिष्णुता यांमुळे आपली राष्ट्रीय ओळख धोक्यात येण्याची शक्यता.

संध्याकाळी 7. 35 : मोहन भागवत यांचे भाषण सुरू

- देशातील वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित करण्याची संघाची परंपरा.

- या अनुषंगानं झालेला वाद योग्य नाही.

- आम्ही सहज त्यांना आमंत्रण दिलं, त्यांनी ते स्वीकारलं.

- फक्त हिंदू नाही तर संपूर्ण समाजाला एकत्र करण्यासाठी संघ आहे.

- मतमतांतरं होतंच असतात, पण त्याची एक मर्यादा आहे.

- भारतातली विविधता एकाच एकतेतून उपजली आहे.

- सरकारं खूप काही करू शकतात, पण सर्वकाही नाही.

- सर्वांचे पूर्वज एकच आहेत, सर्वांवर भारतीय संस्कृतीचे प्रभाव आहेत.

- संघ सर्वांना जोडणारी संस्था आहे.

- भाषणं एकून आणि पुस्तकं वाचून संघटन होत नाही.

- सर्वांची माता भारतमाता, सर्व तिचे सुपुत्र.

संध्याकाळी 7.19 : सोशल मीडियावर चर्चेला ऊत

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी प्रणव मुखर्जींच्या या पावलाचं स्वागत केलं आहेत. तर काहींनी टीका केली आहे. वेगवेगळे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत.

संध्याकाळी 7. 17 : अडवाणींच्या पाकिस्तान भेटीशी तुलना

काँग्रेस नेते मणिकम टगोर यांनी प्रणव मुखर्जी यांच्या या भेटीची तुलना अडवाणींनी पाकिस्तानात जीन्नांच्या स्मारकाला दिलेल्या भेटीशी केली आहे.

संध्याकाळी 7.09 : भारतरत्नासाठी प्रयत्न?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाऊन प्रणव मुखर्जी भारतरत्न मिळवायचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी विचारला आहे.

संध्याकाळी 7.07 : भाषणाचा मसुदा जाहीर करा

आधुनिक इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी लिहिलंय की आजच्या फेक न्यूजच्या काळात मुखर्जींनी त्यांच्या भाषणाचा संपूर्ण लेखी मसुदा जाहीर करावा.

संध्याकाळी 7.03 : आनंद शर्मांची टीका

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी लिहिलं आहे की 'प्रणवदां'ना संघ मुख्यालयात पाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना मनोवेदना झाल्या आहेत. भारतीय गणराज्याच्या विविधतेने नटलेल्या मूल्यांवर ज्यांचा विश्वास आहे, तेही आज दुःखी आहेत.

संध्याकाळी 6.53 : संचलन आणि प्रात्यक्षिकं

रेशीमबाग मैदानावर संचलन आणि प्रात्यक्षिकं सुरू आहेत.

संध्याकाळी 6.36 : संचलन सुरू

रेशीमबाग मैदानात RSS च्या स्वयंसेवकांचे संचलन सुरू झाले आहे. "नमस्ते सदा वत्सले" ही संघाची प्रर्थना सुरू असताना प्रणव मुखर्जी सावधान स्थितीत उभे होते.

संध्याकाळी - 6.30 : प्रणव मुखर्जी यांचे रेशीमबाग मैदानात आगमन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे रेशीमबाग मैदानात आगमन झाले आहे.

संध्याकाळी - 5.36 : हेडगेवारांची स्तुती

हेडगेवार स्मारकाच्या व्हिजिटर्स बुकमध्ये प्रणव मुखर्जी यांनी संदेश लिहिला आहे.

त्यात ते लिहितात, "भारतमातेच्या महान सुपुत्राला आदरांजली वाहण्यासाठी मी इथे आलो आहे."

संध्याकाळी - 5.25:कार्यक्रमाची जय्यत तयारी

कार्यक्रमासाठी सजवण्यात आलेलं व्यासपीठ. इथंच मुख्य कार्यक्रम होणार आहे.

संध्याकाळी - 5.20 : मुखर्जी यांचे आगमन

हेडगेवार यांच्या स्मारकात प्रणव मुखर्जी दाखल.

संध्याकाळी - 5 : मुखर्जी यांची प्रतीक्षा

प्रणव मुखर्जी यांच्या आगमनाची प्रतीक्षा करताना सरसंघचालक मोहन भागवत.

अहमद पटेलांची नाराजी

लोक भाषण विसरतील पण फोटो लक्षात ठेवतील, असं प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांना हे आवडलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर प्रणवदांकडून हे अपेक्षित नसल्याची टिप्पणी अहमद पटेल यांनी केली आहे.

प्रणव मुखर्जी यांचा आजचा कार्यक्रम असा असेल

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संध्याकाळी साडेपाच वाजता नागपुरातल्या रेशीमबागमधल्या स्मृती मंदिर परिसरात दाखल होतील. तिथं सरसंघचालक मोहन भागवत त्याचं स्वागत करतील.

त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल. यावेळी मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी उपस्थित असतील.

चहापानानंतर संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर प्रणव मुखर्जी यांचा परिचय करून दिला जाणार आहे. त्यानंतर प्रणव मुखर्जी संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट देतील.

संध्याकाळी सव्वासहा वाजता प्रणव मुखर्जी मुख्य कार्यक्रमस्थळी दाखल होतील. यावेळी संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे स्वयंसेवक प्रात्यक्षिकं सादर करतील.

6 वाजून 35 मिनिटांनी प्रणव मुखर्जी त्यांचं भाषण सुरू करतील. हे भाषण साधारण 20 मिनिटांचं असण्याची शक्यता आहे.

प्रणव मुखर्जींच्या भाषणानंतर मोहन भागवतांचं भाषण होईल.

प्रणव मुखर्जी यांच्या या भेटीबाबत RRSचे माजी प्रचारक के. एन. गोविंदाचार्य यांनी केलेले विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)