पाहा फोटो - दिंड्या-पताका अन् ढोल-ताशे : शिवजयंतीचा राजधानी दिल्लीतही डंका!

राजधानी नवी दिल्लीमध्ये पहिल्यांदाच शिवजयंतीनिमित्त एका भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दिंडी पताका, ढोल ताशांनी रंगलेल्या या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रं.

भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून एका मिरवणुकीचं आयोजन केलं होतं.

नवी दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी मार्गावर स्थित महाराष्ट्र सदनातून मिरवणुकीला सुरुवात झाली.

तिथून दिंडी पताकांनी सजलेली ही मिरवणूक पुढेच इंडिया गेट रिंगणाजवळ स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत काढण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रभर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त दिल्लीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचं थीमही शिवराज्याभिषेकच होता.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)