पाहा फोटो - दिंड्या-पताका अन् ढोल-ताशे : शिवजयंतीचा राजधानी दिल्लीतही डंका!

शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

फोटो कॅप्शन, शिवजयंतीची मिरवणूक

राजधानी नवी दिल्लीमध्ये पहिल्यांदाच शिवजयंतीनिमित्त एका भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दिंडी पताका, ढोल ताशांनी रंगलेल्या या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रं.

भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून एका मिरवणुकीचं आयोजन केलं होतं.

शिवजयंती

फोटो स्रोत, Niranjan Chhanwal/ BBC

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात शिवजयंतीचा कार्यक्रम.
शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

फोटो कॅप्शन, शिवजयंतीनिमित्त सदनात जमलेले मावळे
शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

फोटो कॅप्शन, शिवजयंतीच्या कार्यक्रमात खास पुण्याहून ढोलताशा पथक आलं होतं.
शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

फोटो कॅप्शन, अनेक वेगवेगळे पथक या मिरवणुकीत सामील झाले होते.
शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

फोटो कॅप्शन, आणि या मिरवणुकीत काही शाळकरी मुलांचाही सहभाग होता.

नवी दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी मार्गावर स्थित महाराष्ट्र सदनातून मिरवणुकीला सुरुवात झाली.

शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरून मिरवणुकीला सुरुवात झाली.

तिथून दिंडी पताकांनी सजलेली ही मिरवणूक पुढेच इंडिया गेट रिंगणाजवळ स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत काढण्यात आली.

शिवाजी महाराज, जिजाऊ आणि संभाजी राजे
फोटो कॅप्शन, शिवाजी महाराज, जिजाऊ आणि संभाजी राजेंच्या भूमिकेत मिरवणुकीत सहभागी कलाकार
शिवजयंती

फोटो स्रोत, Niranjan Chhanwal/BBC

फोटो कॅप्शन, केवळ ढोल-ताशा आणि मावळेच नव्हे तर हत्ती-घोड्यांचा फौजफाटाही या मिरवणुकीची शान वाढवत होता.
शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

फोटो कॅप्शन, मल्लखांबवरच्या कसरती करताना तरुण

संपूर्ण महाराष्ट्रभर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त दिल्लीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

शिवजयंती

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC

मावळे कलाकार

फोटो स्रोत, Shrikant Bangale / BBC

फोटो कॅप्शन, मावळे कलाकार

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचं थीमही शिवराज्याभिषेकच होता.

व्हीडिओ कॅप्शन, प्रजासत्ताक दिनाचा महाराष्ट्राचा चित्ररथ

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)