रजनीकांतचं आध्यात्मिक राजकारण म्हणजे काय?

    • Author, प्रमिला कृष्णन
    • Role, बीबीसी तामीळ प्रतिनिधी

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात येणार असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे. 'स्पिरिच्युअल पॉलिटिक्स' करण्याचा त्यांचा मानस आहे. सत्य, पारदर्शी आणि सद्भावपूर्वक मूल्यांवर आधारित हे राजकारण असेल, असंही रजनीकांत म्हणाले.

तामिळनाडूत लोकशाहीची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच व्यवस्थेत बदल होणं गरजेचं आहे, असं त्यांनी 31 डिसेंबर रोजी केलेल्या भाषणात म्हणाले होते.

या घोषणेनंतर रजनीकांत यांनी काही पत्रकारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. बीबीसी प्रतिनिधीनं चैन्नईमध्ये भेट घेऊन या 'आध्यात्मिक राजकारणा'विषयी चर्चा केली.

"तामिळनाडूमधील राजकीय पक्षांकडं सत्यता आणि पारदर्शकतेची मूल्य दिसत नाहीत," असं रजनीकांत यांनी बीबीसीला सांगितलं.

"म्हणून पारदर्शक आणि सत्याधारित राजकारण करण्यासाठी मी हा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे," असं ते म्हणाले.

सिनेमात येण्याअगोदर काही दिवस 'संयुक्त कर्नाटक' या कन्नड मासिकात काम केलं, असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

"स्वातंत्र्यलढ्यापासून ते आतापर्यंत देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींची सुरुवात तामिळनाडूतूनच झाली. त्यामुळं मी ही राजकीय क्रांती याच राज्यातून सुरू करणार आहे," असं रजनीकांत म्हणाले.

"अशा राजकारणाची सुरुवात आत्ताच करणं उचित आहे," असं ते म्हणाले.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)