गुजरातचा गड भाजपने राखला, पण शतक मात्र हुकलं

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणूक निकालाचे कल आता स्पष्ट झाले आहेत. गुजरातमध्ये भाजपने सत्ता राखली आहे, पण संख्याबळ 16 जागांनी कमी झालं आहे. हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली आहे.

गुजरातमध्ये भाजपला 99 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या वेळी भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या. भाजपला इथे स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांना 80 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या 19 जागा वाढल्या आहेत.

हिमाचल प्रदेशात भाजपला 44 तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या आहेत. इथे आधी काँग्रेसची सत्ता होती.

निवडणुकींच्या ताज्या आकडेवारीसाठी सुरू असलेलं हे LIVE पेज आता आम्ही बंद करत आहोत. ताज्या घडमोडींसाठी बीबीसी मराठी बघत राहा.

दिवसभरातल्या नाट्यमय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी स्क्रोल करा.

8.00 - भाजप नेते विनय सहस्रबद्धे LIVE

7.30 - भाजप अभेद्य नाही, हे स्पष्ट - सुहास पळशीकर LIVE

7.15 - काँग्रेस नेते अशोक चव्हाण LIVE

7:00 - हा विकासाला मिळालेला कौल - मोदी

संध्याकाळी या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विकास आणि चांगल्या प्रशासनाला जनतेनं दिलेला हा कौल आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

विकास नाही केला, गैरव्यवहार हीच तुमची प्राथमिकता असेल तर पाच वर्षांत जनता तुम्हाला कंटाळते. हिमाचल आणि गुजरातच्या सामान्य माणसांनी विकासाला मत दिलं आहे, असं ते म्हणाले.

'गुजरातची निवडणूक अभूतपूर्व आहे. कारण कुठलं सरकार पाच वर्षांनी पुन्हा निवडून येत असेल तर मोठं योगदान मानलं जातं आपल्या देशात', अशी पुस्ती त्यांनी जोडली.

6:00 - पराभव मान्य - राहुल गांधी

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंबंधी ट्वीट करून काँग्रेसचा पराभव मान्य केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी नव्या सरकारसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

हिमाचल प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल याचा पराभव झाला असला, तरी पक्षाची कामगिरी चांगली झाली आहे.

17.25 - थेट गुजरातमधून निवडणूक निकालांचं विश्लेषण

17.10 - हिमाचलमध्ये प्रेमकुमार धुमल पराभूत, पक्षाची मात्र घोडदौड सुरू

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपला हिमाचल प्रदेशात चांगलं यश मिळालं असलं तरी धुमल यांचा पराभव 'धक्कादायक' असल्याचं भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं.

16.50 - विश्लेषणात चूक, ईव्हीएमला दोष देणं अयोग्य - योगेंद्र यादव

योगेंद्र यादव यांनी दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेस जिंकण्याची शक्यता वर्तवली होती. आता निवडणूक निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्या विश्लेषणात चूक झाल्याचं मान्य केलं.

'ईव्हीएम'ला दोष देणं बरोबर नाही', असंही ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात.

16.45 - जातीचं राजकारण करणाऱ्यांना चांगला धडा - अमित शहा

जातीचं राजकारण आणि घराणेशाहीमध्ये अडकलेल्या सर्व पक्षांसाठी हा धडा आहे, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचे कल स्पष्ट झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

16.35 - काँग्रेसला पराभव मान्य, नव्या सरकारसाठी शुभेच्छा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पराभव मान्य केला आहे. तसंच त्यांनी दोन्ही राज्यांमध्ये सत्तेत येणाऱ्या नव्या सरकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातच्या मतदारांचे आभार सुद्धा त्यांनी मानले आहेत.

16.14 - भाजपची पत्रकार परिषद LIVE

16.11 - भाजपचं अभिनंदन करणार नाही - हार्दिक पटेल

15.56 - जिग्नेश मेवाणी यांचा विजय

वडगाम मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी यांचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

15.40 - राही भिडे यांचं निवडणूक विश्लेषण

पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे यांचं निवडणूक विश्लेषण लाईव्ह पाहा. बीबीसी मराठीवर फेसबुक पेजवर.

15.35 - मोदी म्हणतात, जिता विकास

15.22 - हा राहुल गांधींचा विजय : कुमार केतकर

पाहा बीबीसी मराठी फेसबुक लाईव्ह

15.20 - एटीएम मशीन हॅक होतं, तसं ईव्हीएमसुद्धा हॅक होऊ शकतं - हार्दिक

हार्दिक पटेल यांनी निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविरोधात एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

15.10 - संजय निरुपम यांनी केलं ट्वीट - 'EVM घोट्याळ्यामुळे भाजपचा विजय'

संजय निरुपम यांनी आपलं जुनं ट्वीट रिट्वीट करत EVM घोटाळ्यामुळे भाजप विजयी झाल्याचा आरोप केला आहे.

15.00 - भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

14.50 - हिमाचल प्रदेश ताजी जाहीर आकडेवारी

14.45 - गुजरात : 50 जागांचे निकाल जाहीर, भाजप 27 (97वर आघाडी), काँग्रेस 21 (58वर आघाडी)

गुजरात की 50 सीटों के नतीज़े घोषित. 27 सीटों पर जीत के साथ भाजपा को 97 सीटों पर बढ़त. कांग्रेस के 21 उम्मीदवारों ने जीत दर्ज की, इनके अलावा वो 58 सीटों पर आगे चल रही है.

14.30 - हिमाचल प्रदेश : ताजे निवडणूक कल

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार भाजप 43, काँग्रेस 21, सीपीआयएम 1, अपक्ष 1 अशी आकडेवारी आहे.

14.25 - गुजरातमधल्या सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया काय? पाहा बीबीसी हिंदीचा हा व्हीडिओ

14.22 - गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या विजयी मिरवणुकांना सुरुवात

14.20 - गुजरात : जाहीर 35 पैकी 18 जागा भाजपकडे

गुजरातमध्ये आतापर्यंत 35 जागांचे निकाल अधिकृतरित्या जाहीर झाले आहेत. त्यातील 18 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर 82 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

दुसरीकडे काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवत 62 जागांवर आघाडी घेतली आहे. अन्य पक्षांना 2 जागा मिळाल्या आहेत.

14.15 - अल्पेश, जिग्नेश आघाडीवर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही विजयाच्या वाटेवर

काँग्रेसचे उमेदवार अल्पेश ठाकोर राधनपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री विजय रुपाणी राजकोट पश्चिम मतदारसंघात विजयाच्या जवळ आहेत तर जिग्नेश मेवाणी वडगाम मतदारसंघात आघाडीवर आहेत.

उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा मतदारसंघात आघाडीवर आहेत.

मणिनगर आणि वलसाडमध्ये भाजपचे उमेदवार अनुक्रमे धनजीभाई पटेल आणि भरतभाई किकुभाई पटेल जिंकले आहेत.

14.10 - गुजरात : जाहीर निकाल - भाजप 17, काँग्रेस 15, इतर 3

गुजरात मतमोजणीसंदर्भात, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपने आतापर्यंत 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर 88 जागांवर आघाडी मिळवली आहे.

तर काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळवला असून 62 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका जागेवर विजय मिळवला आहे. तर 2 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. तर भारतीय ट्रायबल पार्टीने 2 जागांवर आघाडी घेतली आहे.

14.10 - हिमाचल जाहीर निकाल - भाजप 3, काँग्रेस 2, कम्युनिस्ट पार्टी 1

हिमाचल प्रदेश मतमोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपने 3 जागांवर विजय मिळवला असून 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला असून 19 जागांवर आघाडी घेतली आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) एक जागा जिंकली आहे. तर 3 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

13. 55 EVMमध्ये घोटाळा अशक्य : माजी निवडणूक आयुक्तांचं वक्तव्य

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळा असल्याचे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी असा घोटाळा शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

यासंदर्भात एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, 'EVM ही स्वतंत्रपणे काम करणारी मशीन आहेत, ती कुठल्याही नेटवर्कला जोडलेली नाहीत. त्यामुळे ब्लूटूथ किंवा वायरलेसनं त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. EVMमध्ये घोटाळा आहे हे म्हणणं म्हणूनच चूक आहे. ही यंत्रणा केवळ आधुनिक कॅलक्युलेटरसारखी आहे. तुम्ही ती उघडलीत की, मोजणी बंद होते आणि कुठलेही फेरफार अशक्य असतात', असं गोपालस्वामी म्हणाले.

13.50 गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट आघाडीचा कौल

13.40 - गुजरातमध्ये भाजप 102, काँग्रेस 75

13.35 - बीबीसी मराठी गुजरातमधून लाईव्ह

13.25 - हिमाचलमध्ये भाजपची 42, काँग्रेसची 22 जागांवर आघाडी

हिमाचल प्रदेश निवडणुकीसंदर्भात अधिकृत आकडेवारीनुसार भाजपने 42 जागांवर तर काँग्रेसने 22 जागांवर आघाडी घेतली आहे. अन्य पक्ष आणि अपक्षांना मिळून 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.

13.15 - गुजरात : भाजप 7 विजय, 94 जागांवर आघाडी, काँग्रेसची 71 जागांवर आघाडी

गुजरात मतमोजणीच्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपने 7 जागांवर विजय मिळवला आहे. तर 94 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने 4 जागांवर विजय तर 71 जागांवर आघाडी मिळवली आहे.

13.10 - 'आम्ही अजून हार मानलेली नाही'

काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ट्वीट करून भाजपचं अभिनंदन केलं आहे. आम्ही अजून हार मारलेली नाही, असंही त्यांनी लिहिलं आहे.

13.05 - अंबरगाव, महुवा, मणिनगर, पोरबंदर भाजपकडे, माहुधा काँग्रेसकडे

गुजरातमध्ये पाच जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी अंबरगाव, मणिनदर, पोरबंदर आणि महुवा या 4 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

माहुधाची जागा काँग्रेसने जिंकली आहे.

13.00 - राहुल गांधी संसदेत पोहोलचे

12.55 - हिमाचल प्रदेशात भाजपचा 2, काँग्रेसचा एका जागेवर विजय

हिमाचल प्रदेशात मतमोजणीविषयी निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपने 2 जागांवर विजय मिळवला असून 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 1 जागेवर विजय मिळवला असून 21 जागांवर आघाडी घेतली आहे.

12.48 - 'काँग्रेसचं नेतृत्व बदलणं हा भाजपसाठी शुभसंकेत'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक निकालांवर भाष्य करताना म्हटलं आहे की, 'मी अगोदरच सांगितलं होतं की, काँग्रेसचं नेतृत्व बदलणं हा भाजपसाठी शुभसंकेत असेल.'

12. 45 - भाजप 4 जागांवर, काँग्रेस एका जागेवर विजयी घोषित

गुजरात मतमोजणीत निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपने 4 जागांवर विजय मिळवला आहे, तर 101 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला असून 70 जागांवर आघाडी घेतली आहे.

12. 40 - 'भाजपच्या बुलेट ट्रेनपुढे काँग्रेसचा तीन पायांचा पांगुळगाडा हरला'

काँग्रेसचा तीन पायांचा लंगडा पांगुळगाडा हरला. भाजपची विकासाची बुलेट ट्रेन जिंकली, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

12.35 - भाजपच्या सलग पाचव्या विजयाचं विश्लेषणही करणार - राम माधव

हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेशच्या जातीयवादी अजेंड्याचा काँग्रेसला फटका बसला की लाभ झाला? यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव म्हणाले की, 'सविस्तर निकाल हाती आल्यानंतर काँग्रेसने शांतपणे यावर विचार करावा. भाजपचा सलग 5वा विजय आम्ही साजरा करू शिवाय त्याचं विश्लेषणही करू.'

12.30 - गुजरातमध्ये कुणाला किती मतं?

12.22 - मुंबईत भाजप कार्यालयात जल्लोष

गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपला स्पष्ट आघाडी मिळाल्यानंतर मुंबई भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.

12.20 - 'मोदी क्या चीज है?' - भाजप कार्यकर्त्यांचा जयघोष

गुजरामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा 'मोदी'नामाचा जयघोष - पाहा व्हीडिओ

12.05 - हिमाचल प्रदेश भाजप 41, काँग्रेस 22

हिमाचल प्रदेशात हाती आलेल्या निवडणूक कलांनुसार 41 जागांवर भाजप तर 22 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. 5 जागांवर अन्य उमेदवार आघाडीवर आहेत.

11.50 - पोरबंदरमध्ये भाजप विजयी

गुजरातच्या पोरबंदर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. ही जागा भारतीय जनता पक्षाच्या बाबूभाई बोखरिया यांनी जिंकली आहे.

11.45 - गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर आघाडी

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकड्यांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. भाजप 105, काँग्रेस 69, भारतीय ट्रायबल पार्टी 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत.

11.42 - आनंदीबेन म्हणतात, हा विजय मोदींचा

एएनआयच्या वृत्तानुसार, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'भाजपचा पराभव व्हावा यासाठी तीन तरुण प्रयत्न करत होते. गुजरातचा विजय हा मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे.'

11.40 - गुजरात निकाल भाजप 105, काँग्रेस 69

गुजरात मतमोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 105 तर काँग्रेस 69 जागांवर आघाडीवर आहे.

11.35 - राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

गुजरात आणि हिमालच प्रदेशातील निकाल म्हणजे लोकांनी सरकारच्या धोरणांना दिलेले पाठबळ आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

11.34 - 'शहरी भागात भाजपची टक्केवारी घटली'

2012च्या निवडणुकांशी तुलना करता गुजरातच्या शहरी भागात काँग्रेसने 6 टक्के अधिक मते मिळवली आहेत. पण तरीसुद्धा ते भाजपशी तुलना करताना हे प्रमाण 8 टक्केंनी कमी आहे, असं विश्लेषण पत्रकार राहुल कंवल यांनी केलं आहे.

काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 42 टक्के आहे. तर भाजपने 2 टक्के मते गमावली आहेत. गेल्या निवडणुकीशी तुलना करता काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. पण तरीही अंतर फार जास्त आहे, असं ते म्हणतात.

11.30 - हिमाचलमध्ये पहिला निकाल जाहीर

हिमाचल प्रदेशातून निवडणुकीचा पहिला विजय जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झालेली पहिली जागा काँग्रेसने जिंकली आहे. हिमाचलमध्ये भाजप 40 तर काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर आहे.

11.28 - गुजरातमध्ये भाजप 101, काँग्रेस 74

गुजरातमध्ये 181 जागांच्या निकालांचे कल जाहीर झाले आहेत. भाजप 101 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 74 जागांवर पुढे आहे. इतर पक्ष आणि अपक्ष 6 जागांवर आघाडीवर आहेत.

11.25 - पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना प्रचारबंदीची सेनेची मागणी

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना निवडणूक प्रचारात सहभागी होण्यास बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

11.17 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेत आगमन

11.15 - भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले आहेत. भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याने पक्ष कार्यालयांमधली लगबग वाढली आहे. कार्यकत्यांची उत्साहात घोषणाबाजीही सुरू आहे.

11.00 - दोन्ही निकालातून देशानं सकारात्मक धडा घ्यावा - कुमार विश्वास

आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निकालांविषयी ट्वीट केलं आहे. राजकारण आणि राजकारणी या निकालांतून सकारात्मक धडा आणि संकेत घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपला शुभेच्छा देतानात काँग्रेसनंही अधिक चांगला विरोधी पक्ष बनावं, अशा शुभेच्छा कुमार विश्वास यांनी दिल्या आहेत.

10.50 गुजरातमध्ये भाजपनं शंभरी गाठली

गुजरात मतमोजणीच्या निवडणूक आयोगाच्या ताज्या माहितीनुसार भाजप 100 तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे. गुजरात विधानसभेत बहुमतासाठी 92 जागांवर विजय आवश्यक आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभेच्या जागा आहेत.

10. 48 - हिमाचलमध्ये भाजप 37, काँग्रेस 22

हिमाचल प्रदेशात मतमोजणी, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 37 तर काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर आहेत. हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत.

10.40 - गुजरात : बीबीसी मराठी सुरतेहून लाईव्ह

बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी सुरतहूत फेसबुक लाईव्ह करीत आहेत. तुमचे प्रश्न, निरीक्षणं बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर आवर्जून नोंदवा.

10.37 - काँग्रेस मुख्यालयात शुकशुकाट

बीबीसीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट आहे.

10.35 - गुजरात : भाजप 98, काँग्रेस 70

गुजरात मतमोजणीमध्ये निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 98, तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे.

10.26 -गुजरात फेसबुक लाईव्ह

बीबीसी मराठीचं गुजरातमधून फेसबुक लाईव्ह सुरू आहे. तुमचे प्रश्न, निरीक्षणं इथे जरूर नोंदवा.

10.18 - रुपाणी, मेवाणी आघाडीवर

गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी राजकोट पश्चिम मतदारसंघात सुरुवातीला पिछाडीवर होते. आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार ते आघाडीवर आहेत.

वडगाम मतदारसंघात जिग्नेश मेवाणी आघाडीवर आहेत.

10.15 - हिमाचलमध्ये भाजप आघाडीवर

हिमाचलमध्ये मतमोजणीचे सुरुवातीचे कल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. त्यापैकी भाजप 35 जागांवर तर काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे.

10.08 - गुजरातमध्ये भाजप 94, काँग्रेस 64

गुजरात मतमोजणीमध्ये 163 जागांच्या निकालाचे कल स्पष्ट झाले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार भाजप 94 तर काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे.

10.05 - अधिकृत आकडेवारीसाठी फॉलो करा - बीबीसी मराठी ट्विटर आणि फेसबुक

10.00 - गुजरातमध्ये भाजप आघाडीवर

9.58 - मुख्यमंत्री रुपाणी पिछाडीवर

9.57 - गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप आघाडीवर

गुजरात मतमोजणीच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप 77 तर काँग्रेस 59 जागांवर आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशात भाजप 30 तर काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर

9.55 - अल्पेश ठाकोर आघाडीवर

9.51 - हिमाचलमध्ये भाजप आघाडीवर

9.50 - हार्दिक पटेल यांना झटका?

9.48 - 'जनतेचा कल काँग्रेसला विजयापर्यंत नेईल'

काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गेहलोत यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, 'गुजरातच्या जनतेचा कल काँग्रेसला विजयापर्यंत नेईल.'

सुरुवातीच्या कलाबद्दल काही बोलणार नाही. अंतिम निकाल येऊ देत, असंही अशोक गेहलोत म्हणतात.

9.45 - हिमाचल प्रदेश : भाजप 22 तर काँग्रेस 14

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात भाजप 22 तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे.

9.37 - गुजरात : भाजप 56, काँग्रेस 50 जागांवर आघाडी

भाजप 56 जागांवर तर काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही आकडेवारी आहे.

9.34 गुजरातमध्ये आता मुख्यमंत्री आघाडीवर

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकोट पश्चिम मतदारसंघात मतमोजणी सुरू असून अटीतटीची लढाई सुरू आहे. आता मुख्यमंत्री विजय रुपाणी 1800 मतांनी आघाडीवर आहेत.

9.29 - मुख्यमंत्री रुपाणी पिछाडीवर

भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी राजकोट पश्चिम मतदारसंघात 4000 मतांनी पिछाडीवर आहेत.

9.25 - गुजरात : भाजप 48 तर काँग्रेस 40 जागांवर आघाडी

गुजरात मतमोजणी, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 48 तर काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर.

9.20 - सेन्सेक्स घसरला

गुजरात निवडणुकांचे शेअर बाजारावर परिणाम होत आहेत. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला आहे.

9.15- गुजरात : भाजप 24 तर काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर

गुजरात मतमोजणी, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 24 तर काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलं आहे. ''गुजरातमध्ये मोदींनी 41 रॅली करूनदेखील भाजपला जर स्पष्ट विजय मिळू शकला नाही, तर पक्षासाठी तो मोठ्या चिंतेचा विषय असेल.''

9.08 - भाजप 10 आणि काँग्रेस 13 जागांवर

गुजरात मतमोजणी, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 10 आणि काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर

9.07 - हिमाचल प्रदेशात भाजप 11, काँग्रेस 4

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काही जागांचे कल जाहीर व्हायला लागले आहेत. भाजप 11 तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर.

9.05 - भाजप 7 जागांवर तर काँग्रस 6 जागांवर आघाडीवर

गुजरात मतमोजणी निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 7 जागांवर तर काँग्रस 6 जागांवर आघाडीवर आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार गुजरात मतमोजणीत 9 जागांपैकी 6 जागांवर भाजप तर 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर

9.02 - पोरबंदर आणि भावनगरमध्ये भाजप आघाडीवर तर मांडवी, नादियात काँग्रेस

गुजरात मतमोजणीत भाजप पोरबंदर आणि भावनगर पूर्वमध्ये आघाडीवर तर काँग्रेस मांडवी आणि नादियादमध्ये आघाडीवर.

9.00 - गुजरात निवडणुकांच्या मतमोजणी केंद्रांजवळ पोलीस बंदोबस्त

8.55 गुजरात दोन जागांवर भाजप तर दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर

निवडणूक निकालांचे कल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून निवडणूक आयोगाने वेबसाईटवरूनही हे कल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

8.50 : हिमाचलमध्ये मतमोजणीचा पहिला कल लवकरच

हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजपने सर्व 68 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. हिमालच प्रदेशमध्ये मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि प्रेमकुमार धुमल यांच्यासह 337 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे.

मतमोजणी सर्व केंद्रांवर सुरू असून हिमाचलमधील मतमोजणीचा पहिला कल लवकरच जाहीर होईल.

8.45 : गुजरात मतमोजणीचा पहिला कल जाहीर, दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस आघाडीवर

निवडणूक आयोगातर्फे गुजरात मजमोजणीचा पहिला कल जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण गुजरातमधल्या मांडवीमध्ये काँग्रेस पुढे आहे.

8.35 - मतमोजणी सुरू असलेल्या केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

8:30 - गुजरात निकालांवर चीनची नजर

गुजरातच्या निकालांवर देशाचंच नाही, तर साऱ्या जगाचं लक्ष आहे. या निकालांवर विशेषतः चीनची करडी नजर आहे.

8:26 - हिमाचलमध्येही मतमोजणी सुरू

गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही मतमोजणीला सुरुवात झाली आहे. इथे सत्ताधारी काँग्रेसला भाजपचं तगडं आव्हान आहे.

8: 17 - सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

सर्व मतदान केंद्रांबाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. हे छायाचित्र मुख्यमंत्री रुपाणी यांच्या राजकोट शहरातलं आहे.

8:03 - आधी उघडलं टपाल

सर्वांत आधी पोस्टल बॅलट्स उघडण्यात येत आहेत.

8:00 - मतमोजणीला सुरुवात

संपूर्ण गुजरातमध्ये मतमोजणीला सुरुवात. राजधानी अहमदाबादमध्ये मतपेट्यांमधले EVM उघडणारे अधिकारी.

गुजरातमध्ये 22 वर्षं सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आपलं सिंहासन कायम राखतो का, की काँग्रेस परिवर्तन घडवून आणेल, याकडेच जगभरातल्या अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्याविरुद्ध भाजपने प्रेमकुमार धुमल यांना मैदानात उतरवलं आहे. दोन्ही पक्षांनी सर्व 68 जागा लढवत असल्याने इथे भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा वीरभद्र विरुद्ध धुमल, अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.

गुजरातमध्ये यंदा रंगतदार सामना झाला आहे.

दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून एकूण 68.41 टक्के मतदान यंदाच्या निवडणुकीत झालं आहे. भाजप आपली सत्ता कायम राखेल आणि किमान 100 जागा मिळवेल, असा अंदाज सर्व एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे. गेल्या वेळी भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसला 70 जागा मिळतील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला 2012 सालच्या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत 63 जागा मिळाल्या होत्या.

एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर मात्र काँग्रेसनं तातडीनं राहुल गांधी यांना 16 तारखेलाच अध्यक्षपदी विराजमान केलं. आधी हा कार्यक्रम 19 डिसेंबरला होणार होता.

हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तरुण नेत्यांनी घेतलेल्या भाजपविरोधी पवित्र्यामुळे ही निवडणूक विशेष गाजली.

पाटीदार समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार समजला जातो, पण यंदा पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे भाजपच्या मतदान टक्केवारीत किती फरक पडतो, याकडेही सर्वांचं विशेष लक्ष लागलं आहे.

2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रसला 40 टक्के तर भाजपला 48 टक्के मतं मिळाली होती. तर 2007मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसला 39 तर भाजपला 49 मतं मिळाली होती.

यंदाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास 34, अमित शहा यांनी 31 तर राहुल गांधी यांनी 30 च्या आसपास सभा घेतल्या.

विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला निवडणुकीचा प्रचार मग धर्म, जानवं सारख्या मुद्द्यांमुळे गाजली आणि शेवटी मशरूमपर्यंत येऊन संपली.

तुम्ही हे वाचलं का?

(ही बातमी आम्ही सतत अपडेट करत आहोत. याशिवाय तुम्ही आमचं लाईव्ह कवरेज फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वरही फॉलो करू शकता.)