सोशल : 'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, EPA

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की. बाबासाहेबांचा कोणता विचार त्यांना सर्वाधिक भावतो.

वाचकांनी त्यांना भावणारे आणि त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणारे बाबासाहेबांचे अनेक विचार बीबीसी मराठीकडे लिहून पाठवले. त्यातलेच काही निवडक विचार.

राजेश शिंदे लिहितात की, त्यांना "जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल पुस्तक तुम्हाला जगावं कसं ते शिकवेल," हा विचार सर्वाधिक आवडतो.

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

योगीराज म्हस्केंना आंबेडकरांचं ब्रिदवाक्य 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा', सर्वाधिक भावतं.

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

"मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय," आंबेडकरांचा हा विचार मला जास्त आवडतो असं लिहिलं आहे संदीप पवार यांनी.

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

बालाजी कांबळेंना आवडणारा विचार म्हणजे, "ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावं लागेल आणि ज्याला लढायचं असेल त्याला अगोदर शिकावं लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे."

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

"गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही" हा विचार वैभव सातपुतेंना मार्गदर्शक वाटतो.

सचिन कडूंना बाबासाहेबांचे आरक्षणाविषयक विचार आवडतात. "आरक्षणाची गरज कोणाला आणि कुठपर्यंत हे त्यांनी आरक्षणाची परिभाषा मांडतानाच ओळखलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आरक्षणाचा उपयोग झाला असता तर त्याचा राजकीय फायदा लोक उचलू नसते शकले. त्यामुळे समाजात दुही नसती निर्माण झाली," ते पुढे लिहितात.

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

"माणसाच्या स्पर्शानं माणूस बाटतो आणि बाटलेला माणूस पशुच्या मुत्रानं शुद्ध होतो. अशी विचारसरणी असलेला धर्म कसा असू शकतो?" हा विचार आपल्याला प्रेरणादायी वाटत असल्याचं मकरंद डोईजड यांनी लिहिलं आहे.

किरण यांनी आपल्या अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे की, त्यांना डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांच्या प्रगतीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत ते जास्त आवडतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"माणसाला आपल्या दारिद्र्याची नाही तर दुर्गुणांची लाज वाटायला हवी," हा बाबासाहेबांचा विचार सचिन जाधव यांना भावतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)