शशी कपूर यांची काही दुर्मीळ छायाचित्रं

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ शशी कपूर यांनी गाजवला होता.

आपल्या स्मितहास्यानं कोणालाही भुरळ पाडणारं त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व होतं. शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च, 1938 मध्ये कोलकात्यात झाला.

अभिनेते शशी कपूर यांनी बाल कलाकार म्हणून हिंदी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 'आग' (1948) आणि 'आवारा' (1951) यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं. या सिनेमात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

1961 मध्ये 'धर्मपुत्र' या सिनेमातून नायक म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमे केले.

शशी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा 'दीवार' चित्रपटातला 'मेरे पास माँ है' हा डायलॉग अजरामर आहे.

'दीवार', 'सत्यम शिवम सुंदरम', 'नमक हलाल', 'सुहाग' आणि 'त्रिशूल' हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे.

शशी कपूर यांनी हिंदी व्यतिरिक्त अनेक इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिश आणि अमेरिकन सिनेमांमध्ये काम करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते होते.

'हाऊसहोल्डर', 'शेक्सपिअरवाला', 'बॉम्बे टॉकीज' आणि 'हिट अॅण्ड डस्ट' हे त्यांचे इंग्रजी चित्रपट गाजले.

2011 मध्ये भारत सरकारने शशी कपूर यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

2015 मध्ये शशी कपूर यांना चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाला कपूर परिवारासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले. शशी कपूर यांच्या अगोदर वडील पृथ्वीराज कपूर यांना 1971मध्ये तर मोठे बंधू राज कपूर यांना 1987मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

ए. के. हंगल यांच्यासोबत शशी कपूर

राज बब्बर, धर्मेंद्र, बॉब क्रिस्टो आणि इतर कलाकारांसोबत शशी कपूर

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडगोळीने 70च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपट केले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)