शीना बोरा ते सुनंदा पुष्कर : सात हत्या प्रकरणं ज्यांनी देश हादरला

फोटो स्रोत, Fiza
लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आफताब पुनावाला नावाच्या व्यक्तिला अटक केली आहे. आफताबने 18 मे रोजी आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची हत्या केली आणि मग तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब आणि श्रद्धा वालकर मुंबईत काम करताना एकमेकांच्या जवळ आले होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं.
अशा प्रकारे संपूर्ण देशाला हादरवणारी सात हत्या प्रकरणं-
शीना बोरा हत्याकांड
एप्रिल 2012 मध्ये शीना बोरा नावाच्या एका तरुणीची हत्या झाली. तिच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर हे प्रकरण सर्वांसमोर येतं आणि मग तपासाला सुरुवात होते.

संशयाची सुई पहिले शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि मग शीनाचे सावत्र वडिल आणि स्टार इंडियाचे माजी CEO पीटर मुखर्जी यांच्यावर गेली. पोलिसांनी मग दोघांनाही अटक केली.
सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होती. नंतर या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली.
प्रकरणाची सध्याची स्थिती : प्रलंबित
सुनंदा पुष्कर हत्याकांड
काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर या दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये मृत सापडल्या होत्या.

फोटो स्रोत, Reuters
मूळ काश्मीरच्या सुनंदा यांचे वडिल पीएन दास भारतीय सेनामध्ये वरिष्ठ अधिकारी हेते. शशी थरूरसोबत त्यांचं तिसरं लग्न झालं होतं.
एम्सच्या फॉरेंसिक रिपोर्टनुसार सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू ड्रग्सच्या ओवरडोसमुळे झाला. दिल्ली पोलिसांचं एक विशेष पथक सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा अजूनही तपास करत आहे.
रिजवानुर रहमान यांचा मृत्यू
कोलकाताच्या एका रेल्वे ट्रॅकवर 21 डिसेंबर 2007 रोजी रिजवानुर रहमान यांचा मृतदेह सापडला होता.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/AFP/Getty Images
पोलिसांनी सुरुवातीला सांगितलं की रिजवानुर यांनी आत्महत्या केली. पण नंतर रिजवानुरच्या पत्नी प्रियंका तोडी यांचे उद्योगपती वडील अशोक तोडी यांच्यावर संशयाची सुई गेली.
या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये अशोक तोडींना सर्व आरोपातून निर्दोश मुक्त करण्याच्या एका याचिकेला कोलकाता उच्च न्यायालयाने फेटाळून लावलं होतं.
निठारी हत्याकांड
29 डिसेंबर 2006 रोजी दिल्लीजवळच्या नॉयडामध्ये एका घरामागे नाल्यातून पोलिसांनी 19 सापळे ताब्यात घेतले होते.
या बहुचर्चित निठारी कांड प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 24 जुलै 2017 ला त्या घराचे मालक मोनिंदर सिंह पंढेर आणि त्यांचा नोकर सुरिंदर कोलीला फाशीची शिक्षा सुनवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, AFP/Getty Images
न्यायालयाने पंढेर आणि कोली यांना 20 वर्षांच्या पिंकी सरकारच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं. पंढरे आणि कोलीवर मुलीचं उपहरण करून, तिचा बलात्कार आणि खून करण्याचा आरोप आहे.
पिंकी सरकारच्या हत्येच्या प्रकरणाआधी सहा प्रकरणांमध्ये या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. नऊ प्रकरणांची अजूनही सुनावाणी सुरू आहे. त्यातही पुराव्याअभावी तीन प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल करता आली नाही.
शिवानी भटनागर मर्डर केस
दिल्लीतल्या 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये काम करणाऱ्या पत्रकार शिवानी भटनागर यांचा 23 जनवारी 1999 रोजी त्यांच्या पूर्व दिल्लीतल्या अपार्टमेंटमध्ये खून करण्यात आला.

जवळपास नऊ वर्षांनंतर 18 मार्च 2008ला यावर निकाल सुनावताना कोर्टाने IPS अधिकारी रविकांत शर्मा यांच्यासोबत अन्य आरोपींना भारतीय दंड विधानाच्या वेगवेगळ्या कलामांतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे.
या प्रकरणात भाजपचे नेते प्रमोद महाजन यांचं नावसुद्धा पुढे आलं होते. मात्र त्यांनी शिवानी भटनागरशी आपला काहीच संबंध नसल्याचं सांगत सगळे आरोप फेटाळले.
ऑक्टोबर 2011मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने रविकांत शर्मा आणि अन्य दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली होतं. मात्र एका आरोपीची जन्मठेप कायम ठेवली आहे.
प्रियदर्शिनी मट्टू हत्याकांड
दिल्ली यूनिवर्सिटीमध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या प्रियदर्शिनी मट्टू यांचा मृतदेह 23 जनवरी 1996 मध्ये दिल्लीतच तिच्या काकाच्या घरी सापडला होता.

1999 मध्ये कोर्टाने त्यांचे हत्यारे आणि कॉलेजचे सीनिअर संतोष कुमार सिंह यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मात्र ऑक्टोबर 2006 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने संतोष कुमार सिंहला मृत्यूची शिक्षा सुनावली. जवळपास चार वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला जन्मठेपेत बदललं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








