You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
APJ Abdul Kalam qoutes: अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार
एपीजे अब्दुल कलाम यांची आज स्मृतिदिन. कलाम हे वैज्ञानिक, संशोधक आणि माजी राष्ट्रपती तर होतेच. पण, त्याचबरोबर ते एक विचारवंत आणि प्रेरणादायी वक्तेदेखील होते. त्यांचे हे 10 विचार जे सदैव प्रेरणा देत असतात.
1. "तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तळपायची तयारी ठेवा."
2. "प्रत्येकाला अडचणी येणं आवश्यक असतं, कारण त्यामुळेच आपल्याला यशाचा आनंद लुटता येऊ शकतो."
3. "आपल्या प्रत्येकाकडं समान बुद्धिमत्ता नसते, पण ती विकसित करण्याची संधी मात्र सर्वांना समान मिळते."
4. "स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात. पण स्वप्नं ती असतात जी तुम्हाला सतत जागं ठेवतात."
5. "एखाद्याला हरवणं सोपं असतं पण एखाद्याला जिंकणं कठीण असतं."
6. "जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त असणं आवश्यक आहे आणि जर यालाच दूरदृष्टीची जोड मिळाली तर तुम्ही कोणतंही ध्येय गाठू शकतात."
7. "यशस्वी होण्याची उर्मी तुमच्यात असेल तर पराभव तुमच्या वाऱ्यालाही उभा राहणार नाही."
8. "आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी तुमच्या विचारशक्तीच्या जोरावर त्यांच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा."
9. "तुमच्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगांच्या मदतीनंच तुमचं आत्मबळ वाढवा आणि त्या प्रसंगानांच तुमच्या यशाचा साथीदार बनवा."
10. "स्वप्नांचं रूपांतर विचारात होतं आणि विचार कृतीमध्ये बदलतात."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)