ताम्हिणी घाटात खासगी बस उलटून भीषण अपघात; 5 प्रवाशांचा मृत्यू, 27 जखमी

रायगड हद्दीत ताम्हिणी घाटात खासगी बस पलटी झाल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हिणी घाटात पर्पल ट्रॅव्हल्सची खासगी बस अपघात होऊन पलटी झाली आहे.
या बसमध्ये जाधव कुटुंबीय प्रवास करत होतं. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात होतं. पण, ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली.
यामध्ये 2 पुरुष व 3 महिला अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी काम करत आहेत.
मृतांमध्ये, संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव आणि एक अनोळखी पुरुष यांचा समावेश आहे, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी दिली.
बातमी अपडेट होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











