रावळपिंडी कसोटी : पाकिस्तानविरोधात इंग्लंडने पहिल्याच दिवसात 506 रन्स कशा केल्या?

इंग्लंड क्रिकेट टीम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अब्दुल रशीद शकूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, रावळपिंडी

रावळपिंडी टेस्ट मॅच वेळेवर सुरू होणार का? यावर अनिश्चिततेची टांगती तलवार होती. पण मॅच वेळेवर सुरू झाली आणि पाकिस्तानी संघाची निराशाही झाली.

खरंतर ही टेस्ट मॅच सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाली, यात बेन स्टोक्स होता. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला 11 फिट खेळाडू मैदानात उतरवता येतील का आणि मॅच वेळेत सुरू होईल का? असे प्रश्न पुढे आले.

पण इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आजारी बेन स्टोक्सच्या जागी विल जॅक्सला संघात सामील करून घेतलं. विल जॅक्स पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळतोय.

तर दुसरीकडे पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमला चिंता होती की, त्याचे अननुभवी बॉलर्स इंग्लंडच्या फलंदाजांना थोपवू शकतील का?

पाकिस्तान बॉलिंग

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे झालं असं की, टेस्ट क्रिकेटच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा स्कोर चार विकेट गमावून 506 रन्सवर पोहोचला. टेस्ट क्रिकेटच्या संबंध इतिहासात पहिल्याच दिवशी इतक्या रन्स काढण्याचा हा विक्रम इंग्लंडच्या संघाने केलाय.

याआधी 1910 मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिडनी टेस्ट मॅचमध्ये 494 रन्स केल्या होत्या. पाकिस्तानी संघाने रावळपिंडी टेस्ट मॅचमध्ये चार खेळाडूंना टेस्ट कॅप दिलीय. म्हणजे हे चार खेळाडू पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळणार आहेत.

या चौघांमध्ये फास्ट बॉलर हारिस रौफ, हम्द अली, लेगस्पिनर जाहिद महमूद आणि मधल्या फळीतला बॅट्समन सौद शकील आहे.

टेस्ट मॅचच्या इतिहासात पहिल्याच दिवशी चार फलंदाजांनी शतक ठोकल्याची ही पहिलीच वेळ आहे.

रावळपिंडीची खेळपट्टी यावर्षी चर्चेत

यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये मोठ्या संख्येने रन्स जमा झाल्यामुळे रावळपिंडीची खेळपट्टी चर्चेत आली होती. या खेळपट्टीवर एकूण 1187 रन्स काढल्या होत्या तर फक्त 14 विकेट्स मध्ये सामना गुंडाळला होता.

आयसीसीचे मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी ही खेळपट्टी सरासरीपेक्षा पण कमी असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आयसीसीने या स्टेडियमला आणखीन एक डिमेरिट पॉइंट दिला होता.

त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने या टेस्ट सीरिजसाठी नव्याने खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या या खेळपट्टीवर किती रन्स निघणार हे बघणं क्रिकेटप्रेमींसाठी औत्सुक्याचं ठरेल. सध्या तरी बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्येच नसीम शाहच्या बॉलवर जॅक क्रॉलीने तीन चौकार ठोकलेत. त्यामुळे इंग्लंड फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय.

शाहीन शाह आफ्रिदी व्यतिरिक्त हे तीन बॉलर्स पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळत आहेत. त्यामुळे जॅक क्रोली आणि बेन डकेट यांना याचा पुरेपूर अंदाज आला होता.

रावळपिंडीच्या खेळपट्टीबद्दल शंका होत्या

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानचे सुमार बॉलर्स

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांनीही या संधीचा फायदा करून घेतला. त्यांनी पाकिस्तानच्या नवख्या बॉलर्सच्या जीवावर रन्स केल्या.

जॅक क्रॉलीने या वर्षी मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावल्यानंतर पुढच्या 17 डावांत केवळ एक अर्धशतक झळकावलं होतं.

त्यामुळे इंग्लंडने त्याला संघात घेतलं जरी असलं तरी त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले गेले. पण पाकिस्तानी बॉलर्सच्या सुमार बॉलिंगमुळे क्रॉलीला त्याच्या टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीतलं तिसरं शतक झळकावण्याची संधी मिळाली.

क्रॉलीने टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी लंचच्या आधी पहिलं शतक ठोकलं असतं आणि असं करणारा तो इंग्लंडचा पहिला टेस्ट क्रिकेटपटू ठरला असता. पण त्याला केवळ 91 रन्सवर समाधान मानावं लागलं. लंचनंतर त्याने 99 रन्स करत आणल्या होत्या इतक्यात अंपायर अहसान रझाने त्याला नसीम शाहच्या बॉलवर एलबीडब्ल्यू दिला.

पण क्रॉलीने रिव्ह्यू मागितला आणि निर्णय त्याच्या बाजूने लागला. कारण बॉल लेग स्टंपच्या बाहेर गेला होता. क्रॉलीला सोबत करणारा बेन डकेटही मागे नव्हता. त्याने तब्बल सहा वर्षांनी टेस्ट मॅचमध्ये पुनरागमन केलंय.

सर्वात मोठी भागीदारी

क्रॉली आणि डकेटने पहिल्या विकेटच्या आधी 233 रन्सची भागीदारी केली. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या टेस्ट मॅचमधली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे.

याआधी जानेवारी 1962 मध्ये असा विक्रम रचण्यात आला होता. ढाका टेस्ट मॅचमध्ये जेफ पुलर आणि बॉब बार्बर यांनी 198 रन्सची भागीदारी केली होती. त्यावेळी ढाका हा पूर्व पाकिस्तानचा भाग होता.

रावळपिंडी टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध रन्स जमा करण्याऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जॅक क्रॉली हमखास दिसतो. त्याने 2020 च्या साउथॅम्प्टन टेस्ट सिरीजमध्ये जो बटलरसोबत पाचव्या विकेटसाठी 359 रन्स जमा केल्या होत्या.

मॅचच्या दुसऱ्या सेशन मध्ये 122 रन्स करून क्रॉली हारिस रौफच्या बॉलवर बोल्ड झाला. तर जाहिद महमूदने रिव्ह्यूच्या माध्यमातून बेन डकेट (107) आणि जो रूट (23) यांची विकेट घेतली.

मॅचच्या पहिल्या तासातच डीआरएस टेक्निक बंद पडलं. पण अंपायरला निर्णय देताना अडचण येईल अशी कोणतीही गोष्ट घडली नाही. राहिलेली कमी पोप आणि ब्रुक यांनी भरून काढली.

दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडने त्यांच्या स्कोअरमध्ये 158 रन्स जोडल्या. तर शेवटच्या सेशनमध्ये पाहुण्या संघाला 174 धावांवर समाधान मानावं लागलं.

विकेटकीपर असणाऱ्या ऑली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी रन्सचा डोंगर रचायला मदत केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 176 रन्सची भागीदारी केली.

ऑली पोपने त्याचं 10 वं अर्धशतक पूर्ण केलं, पण त्याची नजर होती ते टेस्ट मॅचच्या तिसऱ्या शतकावर. त्यामुळे त्याने 90 बॉल्सवर 14 चौकार लागवून राहिलेली कसरसुद्धा भरून काढली.

त्याने 108 रन्स काढल्या, मात्र मोहम्मद अलीने पहिल्या टेस्ट विकेटमध्येच त्याचा गेम गुंडाळला.

रावळपिंडी टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

सहा बॉल्समध्ये सहा सिक्स

ब्रूकनेही रन्सच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. त्याच्या दुसऱ्या टेस्ट सीरिज मध्ये त्याने पहिल्यांदाच तीन आकडी रन्स जमवल्या.

सौद शकीलच्या एकाच ओव्हरमधील सहा बॉल्सवर त्याने सहा सिक्स मारले. हॅरी ब्रूक पाकिस्तानी क्रिकेट फॅन्ससाठी कोणी नवखा प्लेयर नाहीये.

तो यावर्षी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स संघाकडून खेळला होता.क त्याने इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध पाच सिक्स आणि दहा फोर मारून 102 रन्स होत्या. त्याचा हा गेम सहजासहजी विसरता येणार नाही.

हॅरी ब्रूक पाकिस्तानी क्रिकेट फॅन्ससाठी कोणी नवखा प्लेयर नाहीये. तो यावर्षी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स संघाकडून खेळला होता.

त्याने इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध पाच सिक्स आणि दहा फोर मारून 102 रन्स केल्या होत्या. त्याचा हा गेम सहजासहजी विसरता येणार नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)