कमला हॅरिस-डोनाल्ड ट्रम्प : तुम्ही कधीही पाहिले नसाल, असे दोघांचे फोटो आणि त्यांच्याबद्दल रंजक गोष्टी

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण असतील, हे अवघ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. या स्पर्धेत असलेले दोन उमेदवार म्हणजे कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प.

राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या प्रचारात अमेरिकेच्या मतदारांना दोन्ही उमेदवार म्हणजे, कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

पण आम्ही तुमच्यासाठी या दोघांचेही काही खास फोटो घेऊन आलो आहोत.

या फोटोतून हे दोघं कोण आहेत आणि त्यांचं मूळ नेमकं काय, हे लक्षात येईल.

या बातमीच्या सुरुवातीला असलेला फोटो कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बालपणीचा आहे. दोघेही त्यावेळी तीन वर्षांचे होते आणि व्हाईट हाऊस काय असतं, हे अर्थातच त्यांना त्यावेळी माहिती नव्हतं.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी सुरुवातीची काही वर्षे कॅलिफॉर्नियाच्या ऑकलंडमध्ये घालवली, तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प हे न्यूयॉर्कच्या क्वीन्स शहरात लहानाचे मोठे झाले.

हॅरिस आणि त्यांची बहीण माया यांना त्यांच्या भारतीय आई श्यामला गोपालन हॅरिस यांनी वाढवलं. त्या स्वतः कॅन्सर संबंधी संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

ट्रम्प यांचे वडील फ्रेंड ट्रम्प हे अनिवासी जर्मन कुटुंबातील होते, तर त्यांची आई मेरी अॅनी मॅक्लियॉड ट्रम्प यांचा जन्म स्कॉटलँडमध्ये झालेला होता.

त्यांनी 13 व्या वर्षी ट्रम्प यांनी न्यूयॉर्क मिलिट्री अकॅडेमीमध्ये पाठवलं होतं.

दुसरीकडं हॅरिस यांनी कॅनडाच्या मॉन्ट्रियलमधील एका हायस्कूलमध्ये पाच वर्ष घालवली, तर त्यांच्या आईनं मॅकगिल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं होतं. पुढं त्यांनी हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला.

ट्रम्प सांगतात की, त्यांनी 1959 मध्ये अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणच्या पाच वर्षांत त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं आणि त्याचबरोबर त्यांना नेतृत्व गुणदेखील अवगत करता आले.

नंतर मात्र शैक्षणिक कारणं आणि हाडाच्या दुखापतीमुळं त्यांना व्हिएतनाम युद्धात सहभागी होता आलं नव्हतं.

कमी वयापासूनच हॅरिस यांना त्यांच्या आईनं नागरिकांच्या अधिकाराच्या आंदोलनाचं महत्त्वं पटवून दिलं. त्यांनी 2004 मध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या वार्षिक मार्टिन लूथर किंग ज्युनियर फ्रीडम मार्चमध्ये सहभागही घेतला होता.

पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या व्हार्टन स्कूलमधून पदवी मिळवल्यानंतर ट्रम्प यांच्या वडिलांनी त्यांची कुटुंबाच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळण्यासाठी निवड केली.

हॅरिस कॅलिफोर्नियाला परतल्या. त्याठिकाणी त्यांनी राज्याच्या गुन्हेगारी न्यायप्रणालीत अत्यंत वेगानं वरचं पद मिळवलं.

त्याठिकाणी त्यांनी अॅटर्नी जनरल म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये अमेरिकेच्या सिनेटसाठी निवडणूक लढवली. त्यात त्यांचा विजय झाला.

त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत होत्या, त्याचवेळी ट्रम्प यांनी पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल होत होते. हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत त्यांनी सर्वांनाच धक्का दिला होता.

तीन वर्षांनी हॅरिस यांनी शांतपणे राष्ट्राध्यक्षपदासाठीची मोहीम राबवली. पण डेमोक्रॅटिक पक्षातील उमेदवारी जो बायडेन जिंकले. पण बायडेन यांनी त्यांना उपराष्ट्राध्यक्षपदासाठीच्या सहकारी बनवलं.

या दोघांनी निवडणुकीत ट्रम्प आणि माइक पेन्स यांचा पराभव केला.

ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावरून हटल्यानंतर बायडेन-हॅरिस यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीनंतर अमेरिकेन अनेक नवीन बाबी अनुभवल्या.

त्यात जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येपाठोपाठ कोविड लॉकडाऊन, मास्क सक्ती आणि सामाजिक अशांतता याचा समावेश होता.

हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःची ओळख निर्माण कऱण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण 2022 मध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं जेव्हा गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द केला, तेव्हा त्यांना स्वतःची अशी एक ओळख मिळाली.

प्रो चॉइस आंदोलनासाठी त्या व्हाईट हाऊसच्या चॅम्पियन बनल्यानं राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही खूश होते.

ट्रम्प यांनीच गर्भपातासंबंधिच्या निर्णयाचा मार्ग सोपा करत सुप्रीम कोर्टाला अधिक रुढीवादी बनवलं होतं.

ओव्हल ऑफिसमधील कार्यकाळादरम्यान त्यांनी अमेरिकेला हवामान बदलाशी संबंधित पॅरिस करारापासून दूर ठेवलं. तसंच अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी पावलं उचलली.

उपराष्ट्राध्यक्ष म्हणून हॅरिस यांनी 2021 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. त्यांनी ग्वाटेमालाला भेट दिली. त्यावेळी मॅक्सिकोबरोबरच अमेरिकेच्या दक्षिण सीमेपर्यंत पोहोचणाऱ्या लॅटिन अमेरिकेच्या प्रवाशांची संख्या कमी करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.

त्यांच्या कार्यकाळादरम्यान परराष्ट्र धोरणाचे अनेक मुद्दे चर्चेत होते. त्यात युक्रेन आणि गाझाचं युद्ध याशिवाय अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या लष्कराला परत बोलवण्याच्या मुद्द्याचाही समावेश होता.

तर राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी 2017 मध्ये पहिला परराष्ट्र दौरा केला होता. त्यांनी सौदी अरबला भेट दिली होती.

ट्रम्प अनेक पद्धतीनं फुटीरतावादी धोरणांची वकिली करायचे. त्यात विदेशी संघर्षांपासून अलिप्त राहणं आणि अमेरिकेच्या उद्योगाला प्रोत्साहन देणं याचा समावेश होता.

हॅरिस यांचा विवाह डग एमहॉफ यांच्याशी झाला आहे. ते नियमितपणे हॅरिस यांचा प्रचार करतात. एमहॉफ यांना पहिल्या पत्नीपासून असलेल्या कॉल आणि अॅला यांच्या कमला सावत्र आई आहेत.

ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात भूमिका निभावली आहे. पण 2024 च्या प्रचारात त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी फार कमी सहभाग घेतला आहे.

ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना पासून त्यांना तीन मुलं आहेत. त्यांची नावं डोनाल्ड ज्युनियर, इव्हांका आणि एरिक आहेत, तर दुसऱ्या पत्नी मार्ला मेपल्सनं त्यांची एक मुलगी टिफनीला जन्म दिला होता. त्यांनी 2005 मध्ये तिसऱ्या पत्नी मेलानिया यांच्याशी विवाह केली. त्यांना एक मुलगा बॅरन आहे.

हॅरिस यांनी 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत बायडेन यांच्या तुलनेत उशिरा प्रवेश केला.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई-अमेरिकन वंशाच्या महिला बनत त्यांनी इतिहास रचला आहे. त्यानंतर त्यांनी इलिनोइसमध्ये शिकागोत डेमोक्रॅटिक नॅशनल कनव्हेंशनमध्ये भाषण केलं.

दुसरीकडं डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या पक्षाकडून तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदासाठीची उमेदवारी मिळाली आहे.

त्यांनी विस्कॉन्सिनमध्ये मिल्व्होकीमध्ये रिपब्लिकन नॅशनल कनव्हेंशनमध्ये भाषण दिलं. त्यावेळी त्यांच्या कानावर पट्टी होती. त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांच्या कानाला दुखापत झालेली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)