अकोल्यात इन्स्टाग्राम पोस्टवरून हिंसाचार, एका व्यक्तीचा मृत्यू

अकोल्यात इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे हिंसाचार झाला. या हिंसाचारामुळे अकोल्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलंय.
या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
हिंसाचार घडलेल्या संपूर्ण क्षेत्रात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बोलावण्यात आल्या आहेत.
अकोल्यात काल (13 मे) विशिष्ट समाजाच्या धर्मगुरूच्या विरुद्ध इन्स्टाग्रावर अश्लील शब्दात पोस्ट लिहिल्यावर काही लोकांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल केली तरी या समाजाच्या लोकांचा जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली.
त्यानंतर दुसऱ्या समाजाचे लोक समोर आले. त्यांनी एक तास जोरदार घोषणाबाजी केली आणि दगडफेक केली.
अकोला शहरातील गंगाधर चौक, हरिहर पेठ या भागात संमिश्र वस्ती आहे. तिथे दोन्ही समुदाय एकमेकांसमोर आले आणि एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. तसंच अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांच्या गाडीवरही यावेळी दगडफेक करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीवरही जोरदार दगडफेक करण्यात आली, यात अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला. अनेक गाड्या जाळण्यात आल्या.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. एका तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

या हिंसाचारानंतर अकोला ग्रामीण भागातून पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला आहे. तसंच वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागातून पोलिसांना बोलावण्यात आलं.
या घटनेत आतापर्यंत 26 लोकांना अटक करण्यात आली आहे.
घटनेवनिषयी अधिक माहिती देताना अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, “दोन समुदायात काही गैरसमज झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे."
या पुढे कोणतीही अप्रिय घटना होऊ नये पोलीस तैनात करण्यात आले आहेत, अशीही माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








