बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. भारतीय स्टार्ट-अप्सची पसंती असलेली सिलिकॉन व्हॅली बॅंक का बुडाली?
गेल्या आठवड्याआधी कदाचित भारतातल्या खूप कमी जणांनी सिलीकॉन व्हॅली बॅंकेचे नाव ऐकलं असेल. पण स्टार्ट-अप मध्ये हे नाव नेहमीच लोकप्रिय होतं. अमेरिकेच्या नियामक मंडळांनी या SVB ला टाळे ठोकले आहे.
2008 ला आलेल्या आर्थिक मंदीनंतर दिवाळखोर होणारी सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेची सर्वांत मोठी बॅंक ठरली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅंटा क्लारा या ठिकाणी मुख्यालय असलेल्या या बॅंकेच्या देशात 17 शाखा होत्या.
31 डिसेंबर 2022 पर्यंत या बॅंकेची एकूण संपत्ती 209 अब्ज डॉलर इतकी होती तर या बॅंकेच्या खात्यामध्ये एकूण 1743 अब्ज डॉलर जमा होते.
एका रिपोर्टनुसार ही बॅंक 2,500 हून अधिक व्हेंचर कॅपिटल फर्म्सला विविध सुविधा पुरवत असे. पर्यावरण तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील 1,500हून अधिक प्रमुख क्लाएंट्स असल्याची माहिती बॅंकेच्या वेबसाइटने दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
2. मीठ खाल्ल्यानं काय होतं, आहारात मीठ कमी करा, असं WHO का सांगतं?
खाल्ल्या मीठाला जागा... मैने आपका नमक खाया है... अशा म्हणी आणि वाक्प्रचार मीठाचं महत्त्व सांगतात.
जेवणाला चव आणणारं, पदार्थ टिकवणारं मीठ जगातल्या सगळ्याच खाद्यसंस्कृतींचा अविभाज्य भाग आहे.
पण जगभरात बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेने एका ताज्या अहवालात म्हटलं आहे.
या अहवालात नेमकं काय म्हटलंय? किती मीठ खाणं योग्य आहे? आणि जास्त मीठ खाल्ल्यानं काय होतं? हे जाणून घेण्याआधी मीठ महत्त्वाचं का आहे, हे समजून घ्यायला हवं.

3. ऑस्कर पुरस्कार कोण देतं? विजेते कसे निवडले जातात?
आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल आहे.
दर काही महिन्यांमध्ये आपण एखादा चांगला सिनेमा पाहतो, त्याला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळते, बॉक्स ऑफिसवर तो बक्कळ कमाई करतो. पण ऑस्करला भलताच कुठला तरी सिनेमा जातो. असं का होतं?
जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते?

फोटो स्रोत, Getty Images
4. पायाभूत सुविधांच्या उभारणीची भारत-चीनची स्पर्धा हिमालयाला धोक्यात टाकत आहे का?
जोशीमठ आणि त्याच्या आसपासच्या जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे शहर चर्चेत होतं.
हे शहर का बुडतंय हा एक वादाचा विषय झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते यापेक्षाही चिंताजनक परिस्थिती हिमालय पर्वताची आहे.
भारत आणि चीन तिथे ज्या वेगाने पायाभूत सुविधांचं निर्माण करत आहे. त्यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
त्यांच्या मते तापमानवाढीमुळे हे क्षेत्र आणखीच अस्थिर होत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे ग्लेशिअर (हिमनदी) आणि पर्माफ्रॉस्ट (अतिशीत प्रदेशातील गोठलेल्या मातीचा थर) दोन्ही वितळत आहेत.
याच ठिकाणी नवीन महामार्ग, रेल्वे रुळ तयार केले जात आहे. सुरुंग खोदले जात आहे. इतकंच नाही तर हिमालयाच्या दोन्ही बाजूला बंदरं आणि विमानतळं बांधली जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
5. तोशाखाना प्रकरण काय आहे, पाकिस्तानातल्या घडामोडींचा काय परिणाम होईल?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या चर्चेत आहेत.
14 मार्चला इम्रान यांना अटक करायला पोलीस पोहोचले, तेव्हा लाहोरमध्ये त्यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं सुरू होती. बघता-बघता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, आणि देशभरात तणाव निर्माण झाला.
पण इम्रान खान यांना पोलीस अटक करायला का आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








