भारतीय स्टार्ट-अप्सची पसंती असलेली सिलिकॉन व्हॅली बॅंक का बुडाली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या आठवड्याआधी कदाचित भारतातल्या खूप कमी जणांनी सिलीकॉन व्हॅली बॅंकेचे नाव ऐकलं असेल. पण स्टार्ट-अप मध्ये हे नाव नेहमीच लोकप्रिय होतं. अमेरिकेच्या नियामक मंडळांनी या SVB ला टाळे ठोकले आहे.
2008 ला आलेल्या आर्थिक मंदीनंतर दिवाळखोर होणारी सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेची सर्वांत मोठी बॅंक ठरली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅंटा क्लारा या ठिकाणी मुख्यालय असलेल्या या बॅंकेच्या देशात 17 शाखा होत्या.
31 डिसेंबर 2022 पर्यंत या बॅंकेची एकूण संपत्ती 209 अब्ज डॉलर इतकी होती तर या बॅंकेच्या खात्यामध्ये एकूण 1743 अब्ज डॉलर जमा होते.
एका रिपोर्टनुसार ही बॅंक 2,500 हून अधिक व्हेंचर कॅपिटल फर्म्सला विविध सुविधा पुरवत असे. पर्यावरण तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील 1,500हून अधिक प्रमुख क्लाएंट्स असल्याची माहिती बॅंकेच्या वेबसाइटने दिली होती.
सुरुवातीला अमेरिकन एजन्सी फेडरल डिपॉजिट इंश्योरन्स कॉर्पोरेशनने FDIC सांगितलं होतं की बॅंकेच्या ग्राहकांचा 250,000 डॉलरचा वीमा आहे. पण याहून अधिक पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असतील तर बॅंकेने एक टोल नंबर दिला आहे, त्यावर फोन करावा.
या घटनेमुळे टेक उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.
याची झळ भारतीय स्टार्ट-अप कंपन्यांना देखील बसली आहे. कंपन्यांसमोर हा पेच होता की त्यांचा खर्च कसा भागेल, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे निघतील?
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलंय की ते भारतीय स्टार्ट-अप्सला भेटतील आणि पाहतील की ते काय मदत करू शकतात.
पण मग अमेरिकेच्या संस्थांनी हे स्पष्ट केले की सोमवार मार्च 13 पर्यंत खातेदारांना आपले पैसे पूर्णपणे मिळतील. त्यानंतर खातेदारांचा जीव भांड्यात पडला.
SVB कशी बुडाली?
असं म्हटलं जातं की SVB ने देखील आपल्या जवळचा पैसा ट्रेजरी बाँड्समध्ये गुंतवला होता. जोपर्यंत व्याजदर कमी होते तोपर्यंत त्यावरील परतावा चांगला मिळत होता.
पण चलनवाढ झाल्यावर अमेरिकन बॅंकिंग सिस्टमच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेने दर वाढवला आणि बॅंकेला अडचणींना सामोरं जावं लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिड आणि कोव्हिडनंतरचा हा आर्थिक स्थितीच्या दृष्टीने अडचणींना होता.
या काळात स्टार्ट-अपसाठी फंडिग मिळवणे देखील कठीण होते. त्यामुळे खातेदारांनी आपल्या खात्यातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली होती.
या कारणामुळे बॅंकेवर तणाव पडला आणि त्यांना आपली गुंतवणूक अशा काळात विकावी लागली ज्या काळात त्याची किंमत कमी मिळाली.
आठ मार्च रोजी बॅंकेनी म्हटले की त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या विक्रीतून 1.8 अब्जाचे नुकसान झाले आहे.
एका सरकारी कागदपत्रानुसार मार्चच्या आधी बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली असून देखील गुंतवणुकदार आणि खातेदारांच्या तोट्याच्या बातम्या झळकल्या. त्याचा प्रभाव पडून 9 मार्च रोजी खातेदारांनी 42 अब्ज डॉलर काढून घेतले त्यामुळे बॅंकेची आर्थिक स्थिती खालवली.
या आकडेवारीनुसार 9 मार्चचा दिवस संपायच्या वेळी बॅंकेचे कॅश बॅलन्स अंदाजे उणे 958 मिलियन डॉलर इतके होते.
बॅंकेनी ही आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पण ते निष्फळ ठरले.
ऐवटार व्हेंचर्स फाउंडरचे मोहन कुमार सांगतात की बॅंक यामुळे बंद झाली की अमेरिकेतील व्हेंचर कॅपिटालिस्टमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ते सांगतात की या समस्येचे मूळ अमेरिकन फेडरल बॅंक आहे, SVB नाही. कुणाला वाटलं होतं की नऊ महिन्यांच्या आतच फेडरल बॅंक व्याजाचे दर सहा किंवा सात करतील म्हणून.
भारतीय स्टार्ट अपचे या बॅंकेला का होते प्राधान्य ?
अजून हे निश्चित नाही की नेमके किती स्टार्ट अप या बॅंकेशी संलग्नित होते. किंवा त्यांनी यामध्ये किती गुंतवणूक केली. शेतकऱ्यांना बियाणे खरेदी-विक्रीसाठी मदत करणारे स्टार्ट-अप हार्वेस्टिंग फार्मर नेटवर्कचे प्रमुख रुचिर गर्ग सांगतात की या बॅंकेशी संलग्नित स्टार्ट-अपची संख्या 20-25 हून अधिक नसेल.
पण हे स्टार्ट-अप या बॅंकेचे खातेदार का होतात?
खरं तर भारतातल्या अनेक स्टार्ट-अप्सना जपान, सिंगापूर, अमेरिका इत्यादी ठिकाणीहून गुंतवणूक मिळते. आणि जेव्हा इतर गुंतवणूकदारांचे खाते SVB मध्ये असेल तर तर स्टार्ट-अपच्या संचालकांना देखील त्याच बॅंकेत खाते उघडणे सोपे पडते.

फोटो स्रोत, Getty Images
रुचिर गर्ग सांगतात की जितका मोठा स्टार्ट अप असेल, चांगली वाढ असलेल्या 50-60 टक्के कंपन्यांचे खाते याच बॅंकेत आहे.
या व्यतिरिक्त जर तुमच्या व्यवसाय अमेरिकेत असेल तर त्यासाठी परवाना आवश्यक असतो. आणि त्यासाठी बॅंकेचे खाते आवश्यक आहे.
जाणकारांचे मते एसव्हीबी ही बॅंक तर आहेच त्या व्यतिरिक्त संपत्ती व्यवस्थापन, आर्थिक सल्लागार अशा भूमिकेत देखील वावरत होती. गर्ग सांगतात,एसव्हीबी स्टार्टअपमध्ये देखील गुंतवणूक करत होते. त्यांना कर्ज देत असत. त्यामुळे स्टार्ट-अप कंपन्यांची पसंती या बॅंकेला होती.
सॉफ्टेवअर प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी बाइट रिजचे संस्थापक आणि मुख्याधिकारी विनायक शर्मा सांगतात की ही बॅंक स्टार्ट-अप आणि बिजनेस फ्रेंडली बॅंक म्हणून ओळखली जात होती. भारतात बसून केवळ पासपोर्टच्या आधारावर तुम्ही या ठिकाणी खाते उघडू शकत होता.
ते देखील या बॅंकेचे खातेदार होते आणि जेव्हा त्यांना कळलं ही बॅंक बुडणार आहे तेव्हा त्यांच्या अकाउंटचा वीमा देखील होता आणि तेव्हा त्यांची खात्यातील रक्कम ही अडीच लाख डॉलरहून कमीच होती.
2014-15 पासून या बॅंकेचे खातेदार असलेले विनायक शर्मा सांगतात की माझा अनुभव चांगला होता. छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीसाठी ते सदैव ग्राहकांसोबत असत. खात्यात मिनिमम बॅलन्स असे काही नव्हते. ते कंपनीच्या संस्थापकांसाठी अनेक उपक्रम ठेवत आणि त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देखील करत असं शर्मा सांगतात.
आता पुढे काय?
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की भारतीय स्टार्ट-अप्ससाठी हा एक धडा आहे. त्यांनी भारतीय बॅंकिंग व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा.
पण एका स्टार्ट-अप संस्थापकांच्या मते ही गोष्ट इतके सोपी नाही. ते म्हणतात जेव्हा स्टार्ट-अपला फंडिंग करणारी वेंचर कॅपिटल कंपनी देशाबाहेरील आहे तर त्या स्थितीवर लक्ष ठेवणे अनिवार्य आहे.
एवटार वेंचर्सचे फाउंडर मोहन कुमार सांगतात की भारतीय कंपन्यांनी एकाहून अधिक बॅंकांमध्ये पैसे ठेवावेत.
3one4 कॅपिटलचे सह-संस्थापक आणि इंडियन वेंचर अॅंड अल्टरनेट कॅपिटल असोसिएशनशी संलग्नित सिद्धार्थ पै यांच्यामते खातेदारांचे पूर्ण पैसे परत होतील या घोषणेमुळे सध्याच्या समस्यांचे निराकरण तर झाले आहे.
पुढे ते म्हणतात की सध्या तर संकट थांबलं आहे कारण अनेक स्टार्टअप्सने आता मोठ्या बॅंकांमध्ये खाते उघडण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने त्याच बॅंकांमध्ये खाते उघडण्यास सुरुवात केली आहे ज्यांना फेडरल बॅंकेनी 'सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट फायनान्शियल इंस्टिट्यूशन' म्हटले आहे. पण ही जखम भरण्यास अनेक वर्षांचा अवधी जाईल. कारण संस्थापक, गुंतवणूकदार, संचालक मंडळ आपली पावलं अत्यंत सावधपणे उचलतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








