बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल कसं फॉलो करायचं?

व्हॉट्सॲप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हॉट्सॲप

तुम्ही आता थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर बीबीसी मराठीवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, महत्त्वाचे लेख आणि ब्रेकिंग न्यूज मिळवू शकता.

बीबीसी मराठीच्या या नवीन व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करणाऱ्यांसाठी, आमचे पत्रकार स्थानिक ते जागतिक पातळीवरच्या सगळ्या बातम्यांचा आढावा घेऊन येत असतात.

व्हॉट्सॲपने 2023 पासून व्हॉट्सॲप चॅनल्सची सुरुवात केली आहे. वाचकांना त्यांच्या आवडीच्या व्यक्ती आणि संस्थांकडून महत्त्वाचे अपडेट्स मिळावेत यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

2023 मध्ये बीबीसी न्यूजनं आपल्या युकेमधील वाचकांसाठी व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केलं. या चॅनलचे आज 13 लाख फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी वाचकांना आता बीबीसी मराठीच्या बातम्या थेट मोबाईलवर वाचता येणार आहेत.

* तुम्ही तुमचा मोबाईल फोन किंवा व्हॉट्सॲप वेब वापरत असाल तर आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

* तसेच व्हॉट्सॲपवर 'अपडेट्स' टॅबमध्ये BBC News Marathi असं सर्च करूनही तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप चॅनलचे सदस्य होऊ शकता.

तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुमच्या स्क्रीनच्या तळाशी डावीकडे तुम्हाला अपडेट्स हा टॅब दिसेल, आणि जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला हा टॅब दिसेल.

तिथेच तुम्हाला सगळे मेसेज दिसतील. तुमच्या नियमित व्हॉट्सॲप चॅटपेक्षा हे वेगळं असेल.

या चॅनलवर दिसणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून तुम्ही हे चॅनल अनम्यूट करा, जेणेकरून तुमचा एकही अपडेट चुकणार नाही. तुम्ही पुन्हा हे चॅनल म्यूटही करू शकता किंवा तुम्हाला अगदी सहज अनसब्सक्राईबसुद्धा करता येईल.

व्हॉट्सॲप चॅनलवर प्रकाशित होणाऱ्या आमच्या बातम्यांवर तुम्ही इमोजी वापरून तुमची प्रतिक्रिया अगदी सहज आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तुम्हाला आवडलेल्या बातम्या तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि मित्रांनाही पाठवू शकता.

व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम चालवणाऱ्या मेटा कंपनीकडून असं सांगण्यात आलं आहे की या चॅनलमध्ये असणारी एकही व्यक्ती तुमचे संपर्क, फोटो, नाव किंवा नंबर पाहू शकणार नाही.

बीबीसी व्हॉट्सॲप चॅनल्सवरील तुमच्या गोपनीयतेबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही इथे क्लिक करून त्याबाबत जाणून घेऊ शकता.