आपण नाकात बोटं का घालतो?

नाक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेसन गोल्डमॅन
    • Role, बीबीसीसाठी

आपल्यापैकी अनेक लोक हे करतात मात्र ते केल्याची कबुली सगळेच लोक देत नाहीत. जर कोणी रंगेहाथ पकडलं तर आपल्याला लाज वाटते आणि पश्चात्ताप होतो. जेव्हा इतर लोक सार्वजनिक ठिकाणी हे करतात तेव्हा आपल्याला किळस येते.

बरोबर ओळखलंत. मेकूड काढण्यासाठी आपला हात सहज नाकपुड्यांपर्यंत पोहोचतो. म्हणजे नाकात बोटं घालण्याच्या क्रियेबद्दल बोलतोय.

नाकात बोटं घालणं इतकं वाईट असतं का? आणि का वाईट असतं? (खरंच... वाईट का असतं?) मेकूडाची चव वाईटच लागते हे कोणी असं ठरवलं आहे का?

नाकात बोटं घालण्याच्या क्रियेला rhinotillexomania असं म्हणतात.

थॉम्पसन आणि जेफरसन यांनी 1995 मध्ये अमेरिकेत या क्रियेचा अभ्यास केला आहे. त्यांनी 1000 लोकांचं सर्वेक्षण केलं. तसा एक मेल त्यांनी या लोकांना पाठवला. 254 लोकांनी या मेलला प्रतिसाद दिला. त्यातील 91 टक्के लोकांनी नाकात बोट घालत असल्याचं कबूल केलं आहे. त्यापैकी 1.2 टक्के लोक प्रत्येक तासाला करत असल्याचं कबूल केलं.

नाकात बोटं घालण्याची सवय त्यांच्या रोजच्या आयुष्यात खोडा घालत आहेत असं दोन लोकांनी सांगितलं. काही लोकांनी तर सांगितलं की त्यांनी इतकी नाकात बोटं घातली की उजव्या आणि डाव्या नाकपुडीला वेगळं करणाऱ्या पेशीचं नुकसान झालं.

ते संशोधन फारसं परिपूर्ण नव्हतं. ज्या लोकांना मेल पाठवले त्यापैकी फक्त 25 टक्के लोकांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. ज्यांना नाकात बोटं घालण्यात आधीपासून रस आहे अशा लोकांना हे सर्वेक्षण पाठवलं असतं तर त्यांनी कदाचित चांगली उत्तरं दिली असती, मात्र असं असलं तरी नाकात बोटं घालणं एक प्रकारचा टॅबू असला तरी ही सवय सर्वदूर पसरली आहे हे मात्र नक्की.

तरुणांमध्ये प्रमाण जास्त

पाच वर्षांनंतर बंगळुरूच्या National Institue of Mental Health and Neurosciences चे संशोधक चित्तरंजन अंद्राडे आणि बी.एस.श्रीहरी यांनी एक संशोधन केलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांच्या संशोधनात असं लक्षात आलं की प्रौढ व्यक्तींपेक्षा तरुण आणि पौंगंडावस्थेतल्या लोकांमध्ये ही सवय मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे प्रौढ व्यक्तींपेक्षा या वयोगटात सर्वेक्षण केलं असतं तर चांगले निकाल हाती लागले असते.

त्यांनी विस्कॉन्सिनमध्ये झालेल्या संशोधनाबरोबर स्वत:चं एक संशोधन केलं. त्यांनी बंगळुरूमधल्या निम्न आर्थिक स्तर, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू अशा तीन विविध पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले.

एकूण 200 टीएनजर्सला घेऊन त्यांनी हे सर्वेक्षण केलं. त्यापैकी बहुतांश लोकांनी नाकात बोट घालत असल्याचं कबुल केलं. तेही दिवसातून चार वेळा.

आता हे काही फार विशेष नाही, कारण हे सगळं आपल्याला माहिती आहेच. मात्र त्याच्या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. 7.6 टक्के विद्यार्थ्यांनी दिवसातून वीस वेळा नाकात बोट घालण्याचं कबूल केलं.

20 टक्के लोकांनी ही अतिशय मोठी समस्या असल्याचं कबूल केलं. बहुतांश लोकांनी सांगितलं की ते नाकातली खाज मिटवण्यासाठी किंवा नाकातला कचरा काढण्यासाठी करत असल्याचं सांगितलं. 12 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं की नाकात बोट घातल्यावर छान वाटतं

बरं फक्त बोटच घालत नाहीत तर काही लोक चिमटा घालतात. नऊ विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते नाकात पेन्सिल घालायचे. चक्क पेन्सिल. काहींनी तर मेकूड छान लागतं असंही सांगितलं.

नाकात बोटं घालण्यात कोणतीही सामाजिक दरी नाही. सामाजिक भेद नसला तरी लिंगभेद मात्र जरूर आहेत. मुलांमध्ये ही सवय मोठ्या प्रमाणात आढळते. मुलींना ही सवय किळसवाणी वाटते. मुलांना अन्य काही वाईट सवयी असण्याची शक्यता जास्त आहे. उदा. नखं कुरतडणं, केस उपटून काढणं.

चेहऱ्याचं नुकसान

नाक

फोटो स्रोत, Getty Images

नाकात बोटं घालणं तसं धोक्याचं नाही. मात्र काही केसेसमध्ये नाकात बोटं घातल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. श्रीहरी आणि अंड्रादे यांना असं एक लक्षात आलं आहे की एका केसमध्ये माणसाची सर्जरी झाली. पण नाकात सातत्याने बोटं घालण्याच्या सवयीमुळे ती जखमच भरून आली नाही.

तर एका केसमध्ये 53 वर्षांची बाई होती. तिला नाकात बोट घालायची इतकी सवय होती की तिच्या सायनसला छिद्र पडलं.

29 वर्षांचा एक माणूस होता. त्याला नाकातले केस उपटून काढायची फार सवय होती. नाकात बोटं घालणं (rhinotillexomania) आणि केस उपटून काढणं (trichotillomania) यामुळे डॉक्टरला त्याच्यासाठी नवीन संज्ञा शोधावी लागली त्याचं नाव होतं rhinotrichotillomania.

त्याला सतत नाकातले केस खाण्याची सवय होती. त्यामुळे त्याच्या नाकाला सतत जखमा होत असत. त्या जखमा बऱ्या करण्यासाठी त्याने एक क्रीम लावलं. त्यामुळे त्याचं नाक जांभळं झालं. त्यामुळे एक फायदा असा झाला की त्याच्या नाकातले केस दिसेनासे झाले. त्यामुळे नाकातले केस वागवण्यापेक्षा जांभळं नाक वागवणं त्याला जास्त सोयीस्कर वाटलं. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. हा ओसीडीचाच एक प्रकार असल्याचं ते म्हणाले.

नाकाचा जीव धोक्यात

नाक

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या या सवयीने कोणताही धोका होणार नाही कारण नाकात बोटं घालण्याने कोणतेही आजार होत नाही. नखं कुरतडणं आणि नाकातले केस काढणं हा ओसीडीचा प्रकार असला तरी नाकात बोटं घालणं हा त्यात मोडत नाही.

याचा अर्थ असा नाही की ते संपूर्णपणे सुरक्षित आहे. 2006 मध्ये डच संशोधकांनी केलेल्या एका संशोधनानुसार नाकात बोटं घातल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

नाकात बोटं घालणारऱ्या लोकांच्या नाकात S.Aureaus नावाचा बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता असते.

मग इतका सगळा धोका असताना, या कृतीने लोकांना किळस येत असताना आपण हे का करतो? याचं स्पष्ट कोणतंच उत्तर नाही.

एका तज्ज्ञाच्या मतानुसार नखं कापणं हा एक स्वच्छतेचा प्रकार आहेच. तसंच त्यात एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. नाकात बोट घालण्याचं एकच महत्त्वाचं कारण म्हणजे नाक आहे म्हणून बोट घालायचं.

किंवा असं म्हणता येईल की नाकात बोट घालणं हे आळशीपणाचं लक्षण आहे. नाक स्वच्छ करायचं असेल तर बोटांची वानवा नाही. टिश्यूपेपरबदद्लही तेच म्हणणं आहे.

काही संशोधक अद्यापही नाकात बोटं घालण्याची कारणं आणि उपाय शोधत आहेत. 2001 मध्ये अंड्रादे आणि श्रीहरी यांना या संशोधनासाठी Ig नोबेल पारितोषिक मिळालं.

आधी हसवणाऱ्या आणि मग विचार करायला लावणाऱ्या संशोधनांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार समारंभात अंड्रादे म्हणाले, “काही लोकांना दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसण्याची सवय असते. मी माझ्या कामासाठी लोकांच्या नाकात बोटं खुपसले.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)