2500 नग्न लोक या किनाऱ्यावर का जमले?

सिडनीच्या बोन्डी किनाऱ्यावर आज, 26 नोव्हेंबरच्या सकाळी 2500 नग्न स्त्री-पुरुष जमले होते.

सिडनी

फोटो स्रोत, Getty Images

हे नग्न स्त्री-पुरुष त्वचेच्या कर्करोगासंदर्भात जागरुकता वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कलाकृतीत सहभागी होण्यासाठी येथे आले होते.

सिडनी

फोटो स्रोत, Getty Images

 हे इन्स्टॉलेशन अमेरिकन फोटोग्राफर स्पेन्सर ट्युनिक यांच्या प्रोजेक्टचं एक भाग आहे.

सिडनी

फोटो स्रोत, Getty Images

ऑस्ट्रेलियन लोकांनी आपल्या त्वचेची वरचेवर तपासणी करत राहावी हा संदेश त्यातून त्यांना द्यायचा आहे.

सिडनी

फोटो स्रोत, Getty Images

सार्वजनिक जागी नग्नतेला परवानगी देण्यासाठी कायद्यात बदल करावा लागला.

सिडनी

फोटो स्रोत, Getty Images

जगात त्वचेच्या कर्करोगाचे सर्वात जास्त प्रमाण ऑस्ट्रेलियात आहे, अंशी वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने माहिती दिली आहे.

सिडनी

फोटो स्रोत, Getty Images

स्थानिक वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता या इन्स्टॉलेशनमध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक जमू लागले.

सिडनी

फोटो स्रोत, Getty Images

त्वचेच्या तपासणीसाठी जागरुकता वाढीला लागावी याचा प्रचार करण्याची ही एक संधी आहे, त्यात कला सादर करुन शरीर आणि त्याच्या संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सहभागी होता आलं हे माझ्यासाठी सन्मानजनक आहे, असं ट्युनिक यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)