फिफा महिला विश्वचषकात स्पेनची बाजी, अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव

स्पेन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नील जॉनस्टन
    • Role, बीबीसी स्पोर्ट्स
    • Reporting from, सिडनी (ऑस्ट्रेलिया)

स्पेनच्या संघानं यंदाच्या महिला फुटबॉल विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात स्पेननं इंग्लंडला 1-0 असं पराभूत केलं.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये आज (20 ऑगस्ट) पार पडलेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या संघातील ओल्गा कारमोना हिने विजयी गोल केला.

स्पेनच्या संघानं पहिल्यांदाच महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे.

फुटबॉल विश्वचषक जिंकणारा स्पेन पाचवी टीम ठरलीय.

स्पेनने जपानला ग्रुप स्टेजमध्ये 4-0 ने पराभव केला होता. त्यानंतर टीमचा प्रवास एकदम जोमाचा झाला.

सिडनीतल्या ज्या मैदानात अंतिम सामना खेळवला गेला, तिथं सामना पाहण्यासाठी सुमारे 75 हजार फुटबॉलप्रेमी प्रेक्षक उपस्थित होते.

हा सामना बीबीसी वन टीव्ही चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला गेला. कोट्यवधी लोकांनी हा सामना पाहिला.

महिला विश्वकपचं हे नववं पर्व होतं. आतापर्यंत चार वेगवेगळ्या टीम वर्ल्ड कप जिंकली होती.

आतापर्यंत अमेरिकेने चार वेळा, जर्मनीने दोन वेळा, नॉर्वे आणि जपानने एक एकदा महिला वर्ल्ड कप जिंकला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)