व्हॉट्सअपचे मेसेजेस आता पाठवल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत एडिट करता येणार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अॅनाबेल लँग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
व्हॉट्सअपने म्हटलंय की ते आता मेसेज पाठवल्यानंतर पुढच्या 15 मिनिटांपर्यंत एडिट करण्याची सुविधा देणार आहेत. ही सुविधा त्यांचे प्रतिस्पर्धी टेलिग्राम किंवा सिग्नलसारख्या अॅपमध्ये या सुविधा नुकत्याच देण्यात आल्या, त्या टक्कर देण्यासाठी ही घोषणा करण्यात आलीये.
व्हॉट्सअपची मालकी मेटा या कंपनीकडे आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम याच कंपनीच्या मालकीचे आहेत.

फोटो स्रोत, Reuters
येत्या काही आठवड्यात व्हॉट्सअपच्या 2 अब्ज वापरकर्त्यांना हे फीचर उपलब्ध होईल. भारत व्हॉट्सअपचं सर्वात मोठं मार्केट आहे कारण इथे त्यांचे 48 कोटी 87 लाख वापरकर्ते आहेत.
“साध्या व्याकरणाच्या चुका सुधारण्यापासून ते मेसेजमध्ये अधिकचे संदर्भ जोडण्यापर्यंत अनेक बदल करता येतील, त्यामुळे तुमच्या मेसेजवर तुमचं अधिक नियंत्रण राहील. हा बदल आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असं 22 मेला त्यांच्या एका ब्लॉगपोस्टमध्ये लिहिलं होतं.
“तुम्हाला फक्त तुम्ही पाठवलेला मेसेज लाँग प्रेस करायचा आहे आणि त्यात ‘एडिट’ चा ऑप्शन निवडायचा आहे. मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत तुम्ही हे करू शकता,” असंही या कंपनीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं होतं.
ज्यांना असे बदल केलेले मेसेज जातील त्यांना ‘एडिटेड’ असं लिहून आलेलं दिसेल म्हणजे त्यांनाही लक्षात येईल की या मेसेजमधला मजकूर बदललेला आहे.
पण मेसेजमध्ये नक्की काय बदल केला हे दिसून येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
टेलिग्राम किंवा सिग्नलसारख्या अॅपमध्ये या सुविधा नुकत्याच देण्यात आल्या. त्यानंतर व्हॉट्सअपने ही घोषणा केली.
फेसबुकने एडिटचा पर्याय जवळपास एका दशकापूर्वीच त्यांच्या वापरकर्त्यांना दिला होता.
त्यावेळी फेसबुकने म्हटलं होतं की त्यांचे अर्ध्याहून अधिक युझर्स फोनवरून त्यांची सोशल मीडिया साईट वापरतात. फोनवर लिहिताना अधिक चुका होऊ शकतात.
फेसबुकवरचे सगळे एडिट केलेल अपडेट ‘एडिटेड’ या टॅगने दिसतात. एडिटची हिस्टरीही युझर्सला दिसू शकते.
गेल्या वर्षी इलोन मस्क यांनीही म्हटलं की ट्विटर त्यांच्या पैसे भरणाऱ्या सबस्क्रायबर्सला त्यांचेय ट्वीट एडिट करण्याची सुविधा देईल.
पोस्ट केल्यानंतर 30 मिनिटं ट्वीट एडिट करता येऊ शकतात.
“आता ट्वीट करणं अधिक सोपं आणि कमी ताणाचं झालंय,” असं त्यावेळी ट्विटरने आपल्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं.
“एखाद्या संभाषणात तुम्हाला तुमच्या पद्धतीने व्यक्त होता आलं पाहिजे आणि तुम्हाला तसं करता यावं म्हणून वेगवेगळे रस्ते शोधण्यासाठी आम्ही काम करतच राहू,” असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








