सत्या : भिकू म्हात्रेचा रोल दिल्यानंतर मनोज वाजपेयी झालेला नाराज, पण सिनेमा रिलीज झाला आणि-

मनोज वाजपेयी
फोटो कॅप्शन, मनोज वाजपेयी
    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी भारत

मुंबईत एक सिनेमा पाहण्यासाठी सिनेमा हॉल खचाखच भरला होता. सिनेमाचा दिग्दर्शक हॉलच्या कोपऱ्यावर उभा होता.

अचानक एका अनोळखी माणसानं दिग्दर्शकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, "हम लोगों के ऊपर बेहतरीन फिल्म बनाया है रे तू."

हा सिनेमा 25 वर्षांपूर्वी 3 जुलै 1998 रोजी प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होतं 'सत्या'. हा सिनेमा मुंबईच्या अंडरवर्ल्डवर बनला होता.

इथे ज्या दिग्दर्शकाचा उल्लेख आहे, त्यांचं नाव आहे राम गोपाल वर्मा. ‘हम लोगों पर अच्छी फिल्म बनाई' असे कुणी म्हटलं असेल, हे तुम्हाला समजलंच असेल.

हा प्रसंग 'सत्या' सिनेमावर उदय भाटिया यांनी लिहिलेल्या 'बुलेट ओव्हर बॉम्बे' या पुस्तकात नोंदवला आहे.

सत्या सिनेमा महत्त्वाचा का?

अंडरवर्ल्डवर बनलेल्या सिनेमांच्या दृष्टीने 'सत्या' हा अनेक अर्थांनी मैलाचा दगड मानला जातो.

हा सिनेमा सुरू झाला की कलाकार आणि इतरांची एक यादी येते. ती पाहिली तर त्यात अशा लोकांची नावे दिसतात, जी त्यावेळी क्वचितच कुणाला माहीत असतील किंवा ते असे लोक होते जे धडपडत होते.

पण आज तेच लोक हिंदी सिनेमासृष्टीतील मोठी नावे आहेत.

अवघ्या 24-25 वर्षांचा अनुराग कश्यप नावाचा संघर्षशील लेखक, अभिनेता सौरभ शुक्ला, अपूर्व असरानी नावाचा 19 वर्षांचा एडिटर, रंगीलामध्ये दोन-चार सीन करणारी शेफाली शहा, 'सत्या'मधील अल्पवयीन मवाली संजय मिश्रा, तबेल्याचा मालक मनोज पाहवा. तसंच सीआयडी मालिकेतल्या इन्स्पेक्टर अभिजीतच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला आदित्य श्रीवास्तव आणि भिकू म्हात्रे म्हणजेच मनोज वाजपेयी.

मनोजने 'बॅन्डिट क्वीन'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण तोपर्यंत तो प्रसिद्ध चेहरा बनला नव्हता.

ही यादी बरीच मोठी आहे.

सत्यामध्ये उर्मिला ही एकमेव स्टार होती जिने रंगीलासारखा हिट सिनेमा दिला होता.

मनोज वाजपेयी - मुंबई का किंग

सत्या सिनेमात एक सीन आहे. त्यामध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यवरील खडकाच्या अगदी काठावर डॉन भिकू म्हात्रे उभा असतो.

आपल्या विरोधकांना संपवल्यावर त्याठिकाणी येऊन जोराने ओरडतो ‘मुंबई का किंग कौन, भिकू म्हात्रे.’

30 सेकंदांच्या त्या सीनने मनोज वाजपेयीला रातोरात स्टार बनवलं.

सिनेमा सुरू झाला तेव्हा मनोज वाजपेयीला 'सत्या' म्हणजेच मुख्य नायकाची भूमिका दिली होती. पण भिकू म्हात्रेची भूमिका जसजशी आकार घेऊ लागली, तसं राम गोपाल वर्मा यांना मनोज वाजपेयीच या भूमिकेला न्याय देईल, असं वाटलं.

सुरुवातीला मनोज निराश झाला. कारण त्याला मुख्य भूमिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. पण नंतर ही भूमिकाच त्याचं आयुष्य बदलणारी ठरली.

मनोज वाजपेयी
फोटो कॅप्शन, मनोज वाजपेयी

सिनेमात मनोजने मुंबईच्या डॉनची भूमिका साकारली होती. पण त्याने आपली देहबोली आणि व्यक्तिरेखा बिहारमधील डॉनच्या धर्तीवर साकारली होती.

‘मुंबई का किंग कौन’ हा सीनसाठी मनोज अजूनही लक्षात आहे. तो सीन त्याने खूप घाबरून केला होता. कारण मनोजला जास्त उंचीची भीती वाटते.

उदय भाटिया त्यांच्या पुस्तकात लिहितात, ‘शूटिंग करताना सौरभ शुक्लाने मनोजचे पाय खालून घट्ट धरले होते. जेणेकरून तो घाबरू नये. पण लाँग शॉटच्यावेळी तसं करणे शक्य नव्हतं. तो सीन मनोजने घाईघाईत केला. त्यावेळी तो जोरात काहीही ओरडला. नंतर ते डब करण्यात आलं.'

अनुराग कश्यप : लेखक ते दिग्दर्शक

24-25 वर्षांच्या अनुराग कश्यपची आणि मनोज वाजपेयीची पहिली भेट एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये झाली. त्याआधी दिल्लीत कॉलेजच्या दिवसांमध्ये अनुरागने मनोज वाजपेयीचं एक नाटक पाहिलं होतं.

सिनेमांवरच्या चर्चेदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली. सत्या सिनेमाचं काम सुरू होतं तेव्हा मनोजने अनुरागची रामगोपाल वर्मा यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर अनुरागकडेच 'सत्या'ची पटकथा लिहिण्याची जबाबदारी आली.

पण, रामगोपाल वर्मा यांना ‘अर्धसत्य’ लिहिणारे प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांना लेखक म्हणून घ्यायचे होते. पण तसं काही घडलं नाही.

अनुराग कश्यप
फोटो कॅप्शन, अनुराग कश्यप

अनुरागला सत्यामुळे मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी राम गोपाल वर्मासोबत नंतर 'कौन' आणि 'शूल'मध्ये काम केले. आज अनुराग एक मोठा दिग्दर्शक आणि निर्माता बनला आहे.

सत्याची आधी अनुरागने 1997 मध्ये 'कभी कभी' ही टीव्ही मालिका लिहिली होती. तसंच हंसल मेहताच्या 'जयते' या पहिल्या सिनेमाची स्क्रिप्ट पण त्याने लिहिली.

कल्लू मामा म्हणजेच सौरभ शुक्ला

अनुराग कश्यपप्रमाणेच सौरभ शुक्ला दिल्लीच्या नाटक ग्रुपमध्ये सक्रिय होता. त्याने मनोजसोबत 'बँडिट क्वीन'मध्ये काम केलं होतं.

राम गोपाल वर्मा यांना सत्यासाठी एका सह-लेखकाची गरज होती. त्यासाठी सौरभ शुक्लाला बोलावण्यात आले. पण सौरभ यांना सिनेमा लिहिण्यात रस नव्हता.

तो एकदा राम गोपाल वर्मा यांना भेटायला गेला होता. तेव्हा त्याला पहिल्यांदा कल्लू मामाची भूमिका आणि कधीतरी एकत्र लिहिण्याची ऑफर देण्यात आली. साहजिकच शुक्ला ती ऑफर नाही म्हणू शकला नाही.

सौरभ शुक्ला
फोटो कॅप्शन, कल्लू मामा म्हणजेच सौरभ शुक्ला

सत्यामधील भिकू म्हात्रेच्या गँगमधील ‘कल्लू मामा’ हे हुशार पात्र आजही प्रसिद्ध आहे. तसंच त्याला स्वतःवर एक गाणंही मिळाले आहे. ते म्हणजे 'गोली मार भेजे में… कल्लू मामा'

'सत्या'पूर्वी सौरभ शुक्लाने 'इस रात की सुबह नहीं' आणि 'बँडिट क्वीन'मध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. तर 90 च्या दशकात 'तहकीकात' या टीव्ही मालिकेत काम केले होते.

गुलजार, विशाल भारद्वाज आणि 'गोली मार भेजे में'

'सत्या'च्या काळात विशाल भारद्वाज संगीत दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करत होते. त्यांचं दिग्दर्शक म्हणून पदार्पण अजून झालं नव्हतं. सत्याला संगीत देण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. तर त्याची गाणी गुलजार यांनी लिहिली.

गुलजार यांनी लिहिलेल्या एका गाण्याचे बोल होते - ‘गोली मार भेजे में, भेजा शोर करता है, भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू, मामा कल्लू मामा.'’

उदय भाटिया 'बुलेट्स ओव्हर बॉम्बे' या पुस्तकात लिहितात, ‘गुलजार यांनी हे गाणे लिहिलं तेव्हा राम गोपाल वर्मा यांच्यासहित जवळपास सर्वांनाच हे गाणं विचित्र वाटलं होतं. पण गुलजार साहेबांना हे सांगण्याचे धाडस कुणाकडेच नव्हतं.

गुलजार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुलजार

अनुराग लहान असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली होती. पण गुलजार यांनी आधीच अनुरागला झापलं होतं. त्याला उर्दूतील 'ग़म' शब्दाचा स्पष्ट उच्चार शिकून ये, असं सांगितलं होतं.

दरम्यान ‘मामा कल्लू मामा’ गाणं शूट झालं. हे सत्या सिनमातील सर्वात हिट गाणं ठरलं. सिनेमाचं पार्श्वसंगीत देखील अप्रतिम झालं होतं. ते संदीप चौटा यांनी दिलं होतं.

सत्या’पूर्वी विशाल भारद्वाज यांनी 1996 मध्ये माचीस या सिनेमाला संगीत दिलं होतं. पण त्यानंतर ते मोठ्या ब्रेकची वाट पाहात होते.

राम गोपाल वर्मा हैदराबादहून मुंबईत आले

तेलुगू सिनेमातून आलेल्या रामगोपाल वर्मा यांना मुंबई अंडरवर्ल्डमध्ये खूप रस होता. त्यावेळी मुंबई फिल्म इंडस्ट्री आणि अंडरवर्ल्डच्या सर्रास चर्चा व्यायच्या. राम गोपाल वर्मा यांची अजय दिवानी नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. तो मंदाकिनीचा सेक्रेटरी होता.

अजय दिवानीकडून त्यांना अंडरवर्ल्डचे अनेक किस्से मिळाले. नंतर अजयची हत्या करण्यात आली. त्याचा आरोप अबू सालेम टोळीवर करण्यात आला होता.

दरम्यान, 1997 मध्ये टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. रामगोपाल वर्मा यांनी मुंबई अंडरवर्ल्ड आणि गुन्ह्याच्या पलीकडचं गुलशन कुमार यांचं वैयक्तिक जीवन यातून सत्या’ची कल्पना केली.

अंडरवर्ल्डवर बनवलेल्या इतर सिनेमांप्रमाणेच राम गोपाल वर्मांचा हा सिनेमा देखील खास आहे. लोक गुन्हेगारीच्या पार्शभूमीसोबत सामान्य दैनंदिन जीवन कसे जगतात? त्यात काय विरोधाभास असतो हे सगळं दाखवण्यात आलं.

शेफाली शाह
फोटो कॅप्शन, शेफाली शाह

उदाहरणार्थ, सत्यामध्ये एक सीन आहे. ज्यामध्ये भिकू म्हात्रे आपल्या मुलीशी फोनवर बोलतो, ‘डॅडी बात करता है, मेरा बच्चा, कैसी है तू, अंग्रेजी पढ़ रही है तू. डॅडी शाम को घर आएगा. ठीक है.’

हे ऐकलं तर कुणीही म्हात्रेला एक सामान्य वडील मानेल. पण दुसऱ्याच क्षणी तो वसुलीसाठी बिल्डरसोबत बसलेला आढळतो.

एकदा प्यारी (शेफाली शाह) तिचा नवरा मनोज वाजपेयीसोबत सत्याच्या मैत्रिणीसाठी भेटवस्तू घ्यायला जाते. तेव्हा ते कोणत्याही सामान्य पती-पत्नीप्रमाणे भांडतात. शॉपिंगच्या वेळी प्यारी म्हणते, 'म्हात्रे हमारी शादी को कितना साल हुआ? बारह साल में तूने मेरे को कुछ दिया, कोई गिफट दिया.'

अजित दिवाणी

फोटो स्रोत, Satya Cinema

अजित दिवाणी यांना सिनेमात श्रेय

एक मजेशीर गोष्ट म्हणजे सत्या सिनेमाच्या सुरुवातीलाच रामगोपाल वर्मा यांनी अजित दिवानी नावाच्या व्यक्तीला प्रथम श्रेय दिले आहे. पण श्रेय देण्याचे कारण सांगितले नाही.

आपल्या एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, या फोटोत उभा असलेला व्यक्ती अजित दिवानी आहे. ज्याची हत्या करण्यात आली होती. तो मला अंडरवर्ल्डची माहिती देत ​​असे. तो मंदाकिनीचा सेक्रेटरी होता.

'सत्या'पूर्वी रामगोपाल वर्मा यांनी 'रंगीला' सिनेमा बनवला होता. तेलुगूमध्ये 'अँथम' हा सिनेमा बनवला होता. त्याच कथेवर आधारित 'सत्या' बनवला होता. बॉलीवूड इंडस्ट्रीत अनेकांना संधी दिल्याचे श्रेय रामगोपाल वर्मा यांना जातं.

जेडी चक्रवर्ती आणि उर्मिला

मुंबईत नोकरीसाठी आलेला एक माणूस अंडरवर्ल्डच्या दुनियेत कसा अडकतो यावर सत्या आधारित आहे.

तेलुगू अभिनेता जेडी चक्रवर्तीने यापूर्वी रामगोपाल वर्मासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं.

सुरुवातीला राम गोपाल वर्मा यांनी त्यांना सत्याची भूमिका देण्यास नकार दिला. तो त्यावेळी अमेरिकेतून आला होता.

नंतर राम गोपाल वर्मा आजारी असताना त्यांना घरी भेटायला गेले आणि त्यांनी दाढीही केली नव्हती.

जेडी चक्रवर्ती
फोटो कॅप्शन, जेडी चक्रवर्ती

सत्या ही अंडरवर्ल्डसोबत एका स्थलांतरिताची कथा आहे. एक अनोळखी माणूस जो स्वतःला मुंबईत एकटा सापडतो. त्याची कोणतीही पार्श्वभूमी नसते.

भिकू म्हात्रे यांना तू कुठून आलास असे विचारल्यावर सत्या म्हणतो, क्या फर्क पडता है. जेव्हा भिकू विचारतो, तेरा फैमिली किधर है, तेव्हा सत्या म्हणतो - शायद मर गए होंगे.

सत्यापूर्वी जेडी चक्रवर्ती तेलगूमध्ये लोकप्रिय होते पण हिंदी इंडस्ट्रीत त्यांना फार कमी लोक ओळखत होते.

मुंबई शहराचीही गोष्ट

मुंबई

सत्याची पहिली फ्रेम मुंबईच्या मॉन्टेजने सुरू होते आणि पहिला आवाज येतो - 'मुंबई'

मुंबई हे एक असे शहर आहे जे झोपत नाही, जे जागे असतानाही स्वप्नं पाहतं. जिथे तेजाची उंची आहे, जिथे निःशब्द अंधाराचा पाताळ आहे. जिथे माणसातल्या या फरकाने एक वेगळं जग निर्माण केलंय. ते म्हणजे ‘मुंबई अंडरवर्ल्ड’.

'सत्या' ही सर्व पात्रांसहित मुंबईची कथा आहे.

हे वाचलतं का?