महाराष्ट्राच्या राजकारणात 15 दिवसात 2 मोठे भूकंप होणार – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, ANI

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1) महाराष्ट्राच्या राजकारणात 15 दिवसात 2 मोठे भूकंप होणार – प्रकाश आंबेडकर

“येत्या 15 दिवसात महाराष्ट्रात मोठं राजकारण होईल म्हणून आपण 15 दिवस वाट पाहूया. येत्या 15 दिवसात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप होतील,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

पुण्यात ‘बा भीमा’ या पुस्तक प्रकाशनासाठी ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या वज्रमूठीबाबत त्यांनी मोठं भाकीत केलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिलीय.

महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणाबद्दल सध्या अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यात प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केल्यानं महत्त्वं प्राप्त झालंय.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि इतर प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्यांवरुन विसंगती आढळून आली असतानाच, काही माध्यमांनी अजित पवार यांच्यासह काही आमदारांचा गट बाहेर पडणार असल्याच्या बातम्या दिल्या आहेत.

राज्यात सुरु असलेल्या या राजकीय घडामोडी पाहता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या विधानानं या चर्चेला आणखी बळ दिलंय.

2) उद्धव ठाकरेंचं फडतूस भाषण, म्हणे वज्रमूठ – भाजप

महाविकास आघाडीची नागपूरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण झालं. त्यांनी त्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला.

या टीकेनंतर भाजपनंही उत्तर देण्यास सुरुवात केलीय. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्याऐवजी लोक उठून गेल्याची टीका भाजपने केली आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीनं दिलीय.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावरूनच आजच्या महाविकास आघाडीच्या सभेवर भाजपने टीका केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांचं फडतूस भाषण सुरू असतानाच नागपूरमधील सुज्ञ जनतेनं धरला घरचा रस्ता असं म्हणत त्यांच्या वज्रमूठ सभेची त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता नागपूरच्या सभेवरून पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

3) महाराष्ट्रात मुख्य माहिती अधिकार आयुक्तांसह माहिती आयुक्तांची पदं रिक्त

महाराष्ट्राच्या मुख्य माहिती आयुक्तासह चार माहिती आयुक्तांची पदे रिक्त असल्यामुळे द्वितीय अपिलांची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्य माहिती आयोगात एक मुख्य माहिती आयुक्त आणि नाशिक, बृहन्मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर माहिती आयुक्त अशी एकूण आठ पदे आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्याने निवृत्त झाले आहेत. नागपूरचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याकडे अमरावती आणि औरंगाबाद या दोन खंडपीठांचा अतिरिक्त पदभार आहे.

पुण्याचे आयुक्त समीर सहाय यांच्याकडे नाशिकचा अतिरिक्त प्रभार आहे. मुंबईचे आयुक्त सुनील पोरवाल यांच्याकडे कोकणासह आता मुख्य माहिती आयुक्तांचा पदभार आहे. अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोकण या ठिकाणी माहिती आयुक्तांची पदे रिक्त असून आता यामध्ये मुख्य माहिती आयुक्त या पदाची भर पडली आहे.

4) अरविंद केजरीवालांची सीबीआयकडून चौकशी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) चौकशी केली. दिल्लीतील मद्यविक्री धोरणाबाबतच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात आली.

“सीबीआयनं एकूण 56 प्रश्न विचारले. सर्व प्रश्न खोटे होते. प्रकरणच खोटं आहे. मला खात्री पटली की, त्यांच्याकडे काहीच नाहीय. अगदी पुराव्याचा एक तुकडाही नाहीय,” असं अरविंद केजरीवाल चौकशीनंतर बाहेर आल्यावर म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि केजरीवालांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया हे तुरुंगात आहेत. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

5) आंध्रच्या मुख्यमंत्र्याच्या काकांना हत्या प्रकरणात सीबीआयकडून अटक

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना एका हत्या प्रकरणात अटक करण्यात आलीय.

सीबीआयनं ही अटकेची कारवाई केलीय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येचं प्रकरण आहे.

आंध्र प्रदातील कडापा येथील ऑफिसमधून वायएस भास्कर रेड्डी यांना सीबीआयनं ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)