डायरी लिहिल्याने मानसिक आरोग्य सुरक्षित राहतं का?

    • Author, हॅरिसन जोन्स
    • Role, बीबीसी न्यूज

इंग्लंड सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक व्हॅलेन्स यांनी जेव्हा 2020 मधील कोव्हिड संकटावरील डायरीच्या नोंदींचा "ब्रेन डंप" (मेंदूत सुरू असलेल्या गोष्टींच्या नोंदी) सुरू केला तेव्हा ते प्रकाशित होईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती - किंवा तशी इच्छा नव्हती.

त्याऐवजी, सर पॅट्रिक व्हॅलेन्स यांचं म्हणणं होतं की साथीच्या रोगाला इंग्लंडच्या प्रतिसादावरील त्यांच्या खाजगी नोंदी या दिवसभर काम करून थकलेल्या मंत्र्यांना मदत म्हणून मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या उद्देशाने केलेल्या होत्या.

स्वतःसाठी एक प्रकारची उपचारासाठी आचारपद्धती म्हणून अशाप्रकारच्या नोंदी करणारे हे उच्चपदस्थ शास्त्रज्ञ एकटे नाहीत.

आधुनिक जगात - जिथे बर्‍याच गोष्टी अतिवेगवान आणि डिजिटल झाल्या आहेत - तिथे हाताने डायरी लिहिण्यासारखी एखादी साधी गोष्ट आपली डोकी मोकळी ठेवण्यासाठी मदत करू शकते का?

मानसोपचारतज्ज्ञ आणि ग्रीफ वर्क्सच्या लेखिका ज्युलिया सॅम्युअल, यांचा यावर विश्वास आहे.

'आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं’

त्यांनी मंगळवारी ‘बीबीसी रेडिओ 4’ च्या आजच्या कार्यक्रमात सांगितलं: "बोलताना आपल्या भावना आपण ज्याप्रमाणे व्यक्त करतो तसंच लिहिताना देखील मांडतो हा त्याचा खूप चांगला पुरावा आहे.”

"खरंतर, रोजनिशी लिहिणं हे बोलण्याच्या उपचारांइतकंच प्रभावी आहे - भावना, चिंता आणि तणाव नियंत्रित करण्यास मदत करतं, आपली रोगप्रतिकारक शक्ती, आपली मन:स्थिती देखील सुधारतं आणि अनेकदा समस्या सोडवण्यातही कामी येतं.”

सुश्री सॅम्युअल पुढे म्हणाल्या की डायरीनंतर वाचायची आहे की नाही यापेक्षा, “भावना व्यक्त केल्याने आणि लिहिण्याने शांतता मिळते याचा खुलासा करतं."

यावरून असं सुचवू शकतो की डायरीत लिहिली जाणारी माहिती - किंवा ज्यांना कदाचित आशा आहे - की त्यांचे विचार इतरांद्वारे वाचले जातील, त्यांच्यासाठी त्यातून मिळणारा तो एक सुखकारक फायदा असू शकतो.

तरीही माजी डॉक्टर अॅडम के म्हणतात की, मोठ्या समुदायासाठी लिहिल्याने तुमची समजावून सांगण्याची पद्धत बदलते.

"माझ्या डायरी आता उत्तमप्रकारे लिहिलेल्या आहेत, परंतु त्या माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या कमी उपयुक्त आहेत कारण मला पूर्ण खात्री आहे की कधीतरी मी त्या प्रकाशकाला ईमेल करणार आहे," असं ते आज म्हणाले.

2016 साली एडिनबर्ग फेस्टिव्हल फ्रिंजमध्ये त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या नोंदी वरचेवर वाचल्या होत्या, त्यानंतर त्यांचं ‘दिस इज गोइंग टू हर्ट’ नावाच्या पुस्तकात रूपांतर झालं आणि याच नावाच्या पुरस्कार विजेत्या टीव्ही मालिकेत रूपांतरित झाल्या.

आपले विचार खाजगी राहतील या उद्देशाने लेखकाने डायरी लिहायला सुरुवात केली. मिस्टर के यांना असं वाटतं की आयुष्यातील कामाच्या तणावाचा सामना करण्याची ही त्यांची पद्धत आहे.

1600 च्या दशकातील सॅम्युअल पेपिसच्या कामांपासून ते अॅन फ्रँक, अॅलन क्लार्क, टोनी बेन, साशा स्वायर, अॅलन रिकमन, कॅप्टन स्कॉट, नेला लास्ट आणि लेना मुखिना यांसारख्या लोकांच्या कल्पनाशक्तीचा वेध घेणार्‍या डायरी लिहिणा-यांच्या लांबलचक यादीत त्यांचा समावेश होते.

अवर हिस्ट्री ऑफ ट्वेंटीयथ सेंचुरी : ॲस टोल्ड इन डायरीज, जर्नल्स ॲन्ड लेटर्स’चे लेखक ट्रॅव्हिस एल्बोरो यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, डायरी लिहिल्याने समाजाला, तसेच व्यक्तींना, वर्तमानात आणि भविष्यात फायदे मिळू शकतात.

लेखकांसाठी "सर्जनशीलतेचे एक साधन" असण्याबरोबरच, सुरूवातीच्या नवकल्पनांना दिलेल्या मूळ प्रतिक्रियांबद्दल भूतकाळातील डाय-यांमधून धडे मिळू शकतात.

मिस्टर एल्बोरो म्हणतात की त्यात बर्‍याचदा अशा मुद्द्यांचा समावेश होतो “जे बहुतांशवेळा अधिकृत स्त्रोतांच्या लक्षात येत नाहीत किंवा अगदीच उल्लेख करण्याकडे दुर्लक्ष करतात.”

एक्सेटर युनिव्हर्सिटीचे इतिहासकार अलुन विथे यांच्या मते डायरी "असाधारण समृद्ध ऐतिहासिक स्त्रोत", दैनंदिन जीवनातील उपयुक्त नोंदी किंवा वैयक्तिक आयुष्यातील घटनांचं संस्मरणीय स्मरणपत्र असू शकतात.

परंतु नकारात्मक गोष्टी देखील असू शकतात, जसं की तुम्ही अद्ययावत न राहिल्यास अपराधी वाटणं, असं कॅथरीन कार्टर बीबीसी न्यूजला स्पष्ट करतात.

आत्मचरित्र आणि जीवन लेखन या विषयांवर अभ्यासक्रम शिकवणारे विल्फ्रीड लॉरियर विद्यापीठाचे प्राध्यापक असा युक्तीवाद करतात की, लेखकाचा हेतू काहीही असला तरीही डायरी कधीच खाजगी नसतात.

"मला असं सांगावसं वाटतं की, एक सार्वजनिक सवय म्हणून डायरी लेखनाचा प्रदीर्घ इतिहास बाजूला ठेवला, तरी समकालीन काळातही गोष्टी नेहमीच खाजगी ठेवण्याचा हेतू नसतो,” असं त्या स्पष्ट करतात.

मिस्टर एल्बोरो हे देखील अंगुलीनिर्देश करतात की त्यांच्याबद्दल टीका करणारी डायरी वाचणारे लोकं कसे अस्वस्थ होऊ शकतात, या मुद्याला डॉ विटे यांनी दुजोरा दिला, जे नियमित लेखनासाठी प्रयत्न आणि शिस्त आवश्यक असल्याचं सांगतात.

इतिहासकार असंही सावध करतात की काही डाय-यांमध्ये लेखकाच्या स्वतःच्या हेतूसाठी गोष्टी जाणूनबुजून वगळल्या जाऊ शकतात किंवा समाविष्ट केल्या जाऊ शकतात.

पण सर पॅट्रिक यांनी कोविड तपासाबाबत समजावून सांगितलं की दररोज संध्याकाळी काही विचार लिहून ठेवल्याने त्यांना "दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रित" करण्यास मदत झाली.

त्यांनी सांगितलं की त्यांनी आपली डायरी एका ड्रॉवरमध्ये ठेवली आणि पुन्हा "कधीच पाहिली नाही".

तरीही त्यांच्या नोंदींनी कोविड चौकशीत अनेक खुलासे जोडले, त्या वैयक्तिक विचारांमुळे सरकारच्या साथीच्या रोगाच्या प्रतिसादावर सार्वजनिक टीका करण्यात आली.

त्यांना हे परिवर्तन उपचारात्मक वाटलं की नाही हे फक्त त्यांच्या डायरीत नोंदवलं जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)