You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुर्मिळ कर्करोगाच्या तीव्रतेचं निदान करण्यात AI ची परिणामकारकता दुप्पट - संशोधन
- Author, फेर्गुस वॉल्श
- Role, मेडिकल एडिटर
दुर्मिळ स्वरूपाचा कर्करोग वेगाने पसरण्याचं स्तर ओळखण्याचं स्कॅनिंगद्वारे निदान करण्यासाठी सध्याच्या पद्धतीपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) ही जवळजवळ दुपटीने प्रभावी आहे, असं एका अभ्यासातून दिसून आलंय.
मानवी डोळ्यांनी सहजपणे लक्षात न येणारे तपशील प्रयोगशाळेतील विश्लेषणात 44% आणि ‘एआय’द्वारे केलेल्या विश्लेषणात 82% अचूक होते.
रॉयल मार्सडेन हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चचे संशोधक म्हणतात की, यामुळे उपचारांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि दरवर्षी हजारो लोकांना याचा फायदा होऊ शकतो.
वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांचा वेळेआधी शोध लावण्याच्या क्षमतेबाबतही ते आशावादी आहेत.
स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि उपचारांचा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने ‘एआय’ अतिशय सकारात्मक परिणाम देतंय.
संगणकांना मोठ्या प्रमाणात माहिती पुरवली जाऊ शकते आणि अंदाज वर्तवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि स्वतःच्या चुकांमधून शिकण्यासाठी त्यातील नमुने ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं जाऊ शकतं.
"या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतांनी आम्हाला अचंबित केलंय,” असं रॉयल मार्सडेन एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या सल्लागार रेडिओलॉजिस्ट आणि लंडनच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चमधील वैयक्तिक ऑन्कोलॉजीच्या इमेजिंगमधील प्राध्यापक क्रिस्टीना मेसिओ यांनी सांगितलं.
"वेगाने निदान आणि वैयक्तिक उपचारांद्वारे अधिक चांगले परिणाम यामुळे रुग्णांना मिळू शकतात."
ओटीपोटाच्या मागील बाजूला जोडणा-या तंतूंमध्ये रेट्रोपेरिटोनियल सारकोमा विकसित होतो. लॅन्सेट ऑन्कोलॉजीमध्ये लिहिणाऱ्या संशोधकांनी उघड्या डोळ्यांना दिसू न शकणारी चिन्हे ओळखण्यासाठी 170 रूग्णांच्या स्कॅनिंगमध्ये ‘रेडिओमिक्स’ नावाचे तंत्र वापरलं.
‘एआय’ अल्गोरिदमने इतर 89 युरोपियन आणि अमेरिकन रूग्णांच्या ट्यूमरची आक्रमकता बायोप्सीपेक्षा स्कॅनिंगद्वारे अधिक अचूकपणे श्रेणीबद्ध केली.
ज्यामध्ये कर्करोगाच्या तंतूंचा एक छोटासा भाग सूक्ष्मदर्शकाखाली विश्लेषित केला जातो.
‘वेळेत निदान'
गेल्या वर्षी जूनमध्ये पोटदुखीनंतर दंत परिचारिका टीना मॅक्लॉघलन यांचं जेव्हा निदान झालं, तेव्हा त्यांच्या ओटीपोटाच्या मागील बाजूस सारकोमा होता. त्यावेळेस नेमकी काय समस्या आहे हे शोधण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण भीस्त संगणकीकृत-टोमोग्राफीच्या (CT) स्कॅन फोटोंवर होती.
टीना यांना सुईने बायोप्सी देणं हे अतिशय धोकादायक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
बेडफोर्डशायरच्या 65 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने ट्यूमर काढल्यानंतर आता ते दर तीन महिन्यांनी स्कॅनसाठी रॉयल मार्सडेनला परत येतात.
त्या एआय चाचणीचा भाग नव्हत्या परंतु यामुळे इतर रुग्णांना मदत होईल, असं त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
"तुम्ही पहिल्या स्कॅनसाठी गेल्यानंतर ते तुम्हाला स्कॅनमध्ये नेमकं काय आढळलं हे सांगू शकत नाहीत - माझ्या संपूर्ण उपचारांदरम्यान हिस्टोलॉजी, शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांनी मला ते सांगितलं नाही. त्यामुळे ही गोष्ट त्वरित माहित पडणं हे खरोखरच खूप फायद्याचं ठरेल. यामुळे वेळेत निदान होईल अशी आशा आहे,” असं मॅक्लॉघलन म्हणाल्या.
'वैयक्तिक उपचार'
इंग्लंडमध्ये दरवर्षी सुमारे 4,300 लोकांना या प्रकारच्या कर्करोगाचे निदान होतं.
जिथे गंभीर धोका असलेल्या रुग्णांना विशिष्ट उपचार दिले जातात तर कमी धोका असलेल्यांना अनावश्यक उपचार आणि फॉलो-अप स्कॅन करायला सांगितलं जातं, अशांसाठी हे तंत्रज्ञान लवकरच जगभरात वापरलं जाऊ शकतं याबद्दल प्राध्यापक मेसिओला प्रचंड आशावादी आहेत.
लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चचे डॉ. पॉल हुआंग म्हणाले: "या प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये सारकोमा असलेल्या लोकांचे आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता आहे - कर्करोगाच्या विशिष्ट प्रकारानुसार वैयक्तिक उपचार करण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरते.
“अशाप्रकारचे आश्वासक निष्कर्ष मिळणं, ही गोष्ट उत्साह वाढवणारी आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)