पुण्यातला 'मिनी कोरिया' : कॅफे, किराणा दुकान ते गेस्टहाऊस, सर्वकाही कोरियन

व्हीडिओ कॅप्शन, पुण्यात कोरियन कॅफे आणि रेस्टॉरंट्स इतके लोकप्रिय का होत आहेत?

पुण्याजवळच्या MIDC परिसरात ह्युंदाई, पॉस्को आणि लोटे यांसारख्या दक्षिण कोरियन कंपन्यांच्या स्थापनेनंतर इथे कोरियन नागरिकांची संख्या वाढू लागलीय. त्यांच्यासोबत कोरियन खाद्यसंस्कृती, भाषा आणि जीवनशैलीही इथे दिसू लागली आहे.

कोरियन जेवण हे भारतातल्या मसालेदार जेवणापेक्षा वेगळं असंत. तसंच भाषेची अडचण होत असल्याने त्यांच्यासाठी खास व्यवस्था तयार केल्याचं सांगण्यात येत आहे.

तळेगावात एक कोरियन वस्तूंचं किराणा दुकानही आहे. जिथे राम्यून, मिसो पेस्ट, फ्रोझन मीट, विविध प्रकारचे सॉस, तेल आणि कोरियन घरांमध्ये लागणाऱ्या वस्तू सहज मिळतात.

  • रिपोर्ट आणि एडिट - गणेश पोळ
  • शूट - नितीन नगरकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)