चंद्रावरची वेळ कशी ठरवतात, पृथ्वी आणि चंद्रावरच्या वेळेत किती फरक?

फोटो स्रोत, Getty Images
या क्षणी चंद्रावर किती वाजले आहेत हे कोणीही सांगू शकत नाही. पण वेळ ही संकल्पना पृथ्वीवर आहे तशीच अवकाशातही आहे.
सध्या अनेक देश चंद्रावर पाऊल ठेवून तिथे काम करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळेच चंद्रावर अधिकृतपणे वेळ ठरवण्याची वेळ आल्याचं आता म्हटलं जातंय.
युरोपियन स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार चंद्रावर अधिकृत वेळ असणं जगभरातील विविध अवकाश संशोधन संस्थांसाठी उपयुक्त ठरेल.
तसंच येत्या काळात चंद्राचा नकाशा तयार करावा लागेल. जेणेकरुन तिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल आणि त्याची माहिती सगळ्यांना देता येईल.
युरोपियन स्पेस एजन्सी नासासोबत या दिशेने काम करत आहे.
सध्या, युनिव्हर्सल टाइम (UTC) चा वापर सर्व मोहिमांसाठी केला जातो. कारण चंद्राचा स्वतःचा टाइम झोन नाही.
पण युरोपियन स्पेस एजन्सीचे म्हणणे आहे की चंद्रावर मोहिमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यूटीसीवर जास्त काळ अवलंबून राहू शकत नाही.
अंतराळ यान कार्यक्षमतेने काम करण्यासाठी अचूक वेळ आवश्यक आहे.
चंद्रावर नेमकी वेळ का नाही?
चंद्रावरची वेळ ठरवण्यासाठी जबाबदार स्पेस एजन्सी असावी असे युरोपीय अवकाश अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एखाद्या देशाने पृथ्वीवरील वेळेचे प्रमाण स्वीकारावे की चंद्रापुरते मर्यादित ठेवावे याबाबत निर्णय घ्यावा लागेल.
आपल्या चांदोबावरील घड्याळं पृथ्वीच्या तुलनेत जरा जास्त वेगाने धावतील, त्यामुळे तिथला वेळ पाळण्यात थोडा त्रास होतो.

पृथ्वीवरील 24 तासांच्या तुलनेत चंद्राचे घड्याळ 56 मायक्रोसेकंद पुढे आहे. याचे कारण चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती कमकुवत आहे.
चंद्रावरील अंतराळवीर त्यांच्या भेटी वेळेपूर्वी ठेवण्याचे हे कारण असू शकते.
पृथ्वीवरील टाइम झोन चंद्रावर अचूक असू शकत नाहीत.
टाइम झोन म्हणजे काय?
पृथ्वीच्या गोलावर मेरिडियन म्हणजे रेखावृत्तं नावाच्या काल्पनिक रेषा आहेत ज्यांच्या आधारे पृथ्वीवरील ठिकाणांची टाइम झोनमध्ये विभागणी केली जाते.
ते दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत आहेत.
ग्रीनविच प्रमाण वेळ किंवा GMT ही लंडनजवळील ग्रीनविचमधून जाणार्या रेखांशाच्या आधारे निर्धारित केलेली वेळ आहे.

फोटो स्रोत, NASA
पृथ्वीवरील एक दिवस 24 तासांमध्ये विभागलेला आहे. ग्रीनविच रेषेच्या पूर्वेकडील देश ब्रिटनमधील वेळेपेक्षा पुढे आहेत. पश्चिमेकडील देश ब्रिटनच्या मागे आहेत.
भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच मीन टाइमपेक्षा साडेपाच तास पुढे आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीचे शास्त्रज्ञ बर्नहार्ड ह्यूफेनबॅच यांनी चंद्रावर प्रमाणित वेळेची स्थापना केल्यामुळे चंद्रावर काम करणाऱ्या अंतराळवीरांना चंद्रावरील आव्हानांचा सामना करणे व्यावहारिक होईल, असे मत व्यक्त केले.
चंद्रावरील एक दिवस आणि एक रात्र ही पृथ्वीवरील सुमारे 28 दिवसांच्या बरोबरीचा असते.
पण चंद्रावरील टाइम झोनबाबतही अनेक प्रश्न आहेत. चंद्राचा टाइम झोन पृथ्वीशी जोडायचा? की स्वतंत्र ठेवायचे? ते आधी ठरवावे लागेल.
NASA 2025 मध्ये 50 वर्षांनंतर चंद्रावर प्रथम मानवयुक्त मोहीम प्रक्षेपित करणार आहे.
आर्टेमिस मिशनद्वारे अमेरिका पहिल्यांदाच चंद्रावर स्त्री पाठवणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








