हिवाळ्यात घरातील लहान मुलं आजारी पडू नये म्हणून अशी घ्या काळजी

फोटो स्रोत, Getty Images
आरोग्याचा आणि ऋतूमानाचा थेट संबंध असतो. त्यामुळेच ऋतू बदलला की त्याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. हिवाळ्यात तापमानात घट झालेली असते. त्याचा शरीरावर परिणाम होतो.
या काळात अनेक संसर्गांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यताही असते. मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांना याचा मोठा त्रास होतो.
त्यामुळे हिवाळ्यात आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत काय खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊयात.
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या हिवाळा सुरू आहे. या ऋतूमध्ये मोठ्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात, त्रास होतो. तसाच लहान मुलांनाही अनेक गोष्टींचा त्रास होतो.
त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची, त्यांना आजारांपासून दूर ठेवण्याची आवश्यकता असते. विशेषत: पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात त्यांच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे.
हिवाळ्यात काही टिप्स वापरल्या तर लहान मुलांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकता, त्यांचं आजारपण टाळू शकता.


हिवाळ्यात लहान मुलांना उबदार आणि सुरक्षित कसं ठेवावं?
हिवाळ्यात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना अनेक गोष्टींचा त्रास होतो, तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात.
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार (NHS) (नॅशनल हेल्थ सर्व्हिस) लहान मुलं आणि बाळांना हिवाळ्यात उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून त्यांचं सरंक्षण करण्यासाठी त्यांना एकापेक्षा अधिक कपडे घातले पाहिजेत.
रात्रीच्या वेळेस पांघरुण म्हणून त्यांच्या अंगावर वजनानं हलकं ब्लँकेट, चादर टाकली पाहिजे. लहान बाळांना रात्रीच्या वेळी उष्ण खोलीची आवश्यकता नसते, हे लक्षात ठेवायला हवं.
त्यांच्यासाठी 16 ते 20 अंश सेल्सियस तापमान सर्वात चांगलं असतं. जास्त उष्ण तापमानामुळे बाळांना एसआयडीएस (सडन इन्फंट जेथ सिंड्रोम) होऊ शकतो म्हणजे त्यांचा अचानक मृत्यू होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
हिवाळ्यात तुम्ही बाळाला घराबाहेर घेऊन जात असाल तर त्याचं डोकं उबदार कपड्यांनी झाकावं. तसंच थंडीपासून बाळाचं संरक्षण करण्यासाठी त्याला हातमोजे आणि पायमोजे देखील घालावेत.
गाडीतून जाताना थंडीपासून बचाव म्हणून लहान मुलांना कमी जाड स्वेटर किंवा कोट घालावा. जेणेकरून मुलाला सीट बेल्ट बांधताना अडचण येणार नाही.
आवश्यकता असेल तर सीट बेल्ट बांधल्यानंतर तुम्ही मुलाच्या अंगावर शाल, कमी जाड चादर किंवा ब्लँकेट टाकू शकता. गाडीतून घरात आल्यावर मात्र ते त्याच्या अंगावरून काढून टाकावं.
पाळीव प्राण्यांना उबदार आणि सुरक्षित कसं ठेवावं?
जर जास्त थंडी असेल तर माणसांप्रमाणेच प्राण्यांना देखील थंडीचा त्रास होतो, तसंच त्यांना हायपोथर्मियासारख्या समस्या उद्भवू शकतात.
पीडीएसए या व्हेटर्नरी चॅरिटी संस्थेनुसार, हिवाळ्यात तुम्ही पाळीव कुत्रा किंवा मांजरीसाठी ब्लँकेटची व्यवस्था करू शकता.
याशिवाय त्यांच्या अंथरुणालादेखील तुम्ही उबदार करू शकता. त्यासाठी जाड कपड्यांचा वापर करता येतो. त्यानं त्यांचा थंडीपासून बचाव होईल. वृद्ध कुत्रे किंवा मांजरींना अशा प्रकारचं अंथरुण आवडं. कारण त्यांना थंडीपासून अधिक संरक्षणाची आवश्यकता असते.
पीडीएसएनुसार, हिवाळ्यात जास्त थंडी असल्यामुळे पाळीव प्राणी कमी वेळ बाहेर पडत असतील किंवा बाहेर कमी वेळ खेळत असतील तुम्ही त्यांच्याशी घरातही खेळू शकता. त्यांच्यासाठी तुम्ही खेळणीही आणू शकता.

फोटो स्रोत, Getty Images
रात्रीच्या वेळी मांजरींना खोलीत त्यांच्यासाठी असलेल्या लिटर ट्रे (खास त्यांच्यासाठी असलेला एकप्रकारचा ट्रे) मध्येच ठेवावं.
तापमानात अचानक घसरण झाल्यामुळे ससा किंवा गिनी पिग्स सारख्या बाहेर राहणाऱ्या पाळीव प्राण्यांना देखील थंडीचा त्रास होऊ शकतो.
अशावेळी थंडीपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी अंथरुणाची व्यवस्था करावी किंवा त्यांची घराच्या आत व्यवस्था करावी.
अर्थात त्यांना घरात आणण्यापूर्वी त्यांच्या खेळण्यासाठी, हालचालींसाठी पुरेशी जागा असल्याची खातरजमा करून घ्यावी.

फोटो स्रोत, Getty Images
हिवाळ्यात पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरायला नेणं योग्य असतं का?
हिवाळ्यातही पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरवून आणण्याची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे कुत्र्यांच्या अंगावर जे केस असतात किंवा फर असतं त्यामुळे थंडीपासून त्यांचं संरक्षण होतं.
मात्र आरएसपीसीए ही संस्था वृद्ध किंवा अंगावर बारीक फर असणाऱ्या कुत्र्यांना थंडीपासून बचाव करणारे उबदार कपडे घालण्याचा सल्ला देते.
तसंच पीडीएसएनुसार, हिमवर्षाव होत असताना तुमच्या पाळीव प्राण्यांच्या पंजांवर लक्ष द्यावं. कारण अशा हवामानात तुमच्या पाळीव प्राण्यांच्या पंजाचं जास्त नुकसान होण्याची शक्यता असते.

या बातम्याही वाचा:

हिवाळ्यात कपड्यांची स्वच्छता कशी ठेवावी?
हिवाळ्यात कपडे सर्रास हीटरवर सुकवले जातात. खोल्यांचा किंवा घराच्या ज्या भागाचा वापर तुम्ही कमी करता, त्या भागातदेखील थोडा वेळ हीटरचा वापर करावा. कारण हिवाळ्यात थंडीमुळे जमीन, भिंती, घरातील वस्तूंना ओलसरपणा येण्याचा धोकादेखील असतो.

फोटो स्रोत, Getty Images
त्यासाठी हवेतून आर्द्रता किंवा ओलसरपणा नष्ट करणाऱ्या डिह्युमिडिफायरसारख्या मशीनचा देखील तुम्ही वापर करू शकता. यातील काही मशीनमध्ये लाँड्रीची सुविधा देखील असते. याचा वापर तुम्ही तुमचे कपडे सुकवण्यासाठी देखील करू शकता.
मार्टिन लुई आर्थिक बाबींशी निगडीत पत्रकार आहेत. त्यांनी बीबीसीच्या पॉडकास्टमध्ये या मशीनचं कौतुक करत म्हटलं होतं की, खोलीत हीटरचा वापर करण्यापेक्षा सर्वसाधारणपणे डिह्युमिडिफायरचा वापर करणं स्वस्त असतं.
बर्फापासून कारचं संरक्षण कसं करायचं?
हिमवर्षाव होत असताना किंवा जिथे बर्फ पडलेला असतो अशा ठिकाणी अनेकांना बर्फापासून आपल्या कारचं, वाहनांचं संरक्षण करायचं असतं.
यासाठी अनेकदा ते कारवर गरम पाणी टाकतात. मात्र ड्रायव्हर्सना अनेकदा असं न करण्याचा सल्लासुद्धा दिला जातो.
कारण गरम पाणी किंवा उकळत्या पाण्यामुळे कारच्या काचा तडकू किंवा फुटू शकतात. त्यानंतर तुमच्या कारवर पाणी पुन्हा गोठू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनमध्ये कार विकत घेण्याची सुविधा पुरवणारी 'एए' ही कंपनी अशा स्थितीत कारचा वायपर बंद करून इंजिन सुरू ठेवण्याचा सल्ला देते. याशिवाय तुम्ही गरम हवेची दिशा कारच्या विंडस्क्रीनकडे करू शकता.
याचबरोबर कारच्या मागील भागात असलेल्या ब्लोअर किंवा हीटरचा देखील तुम्ही वापर करू शकता.
जर कारमध्ये एअर-कॉनची सुविधा असेल तर खिडक्यांवर धुकं गोळा होण्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.
यानंतर एका नरम ब्रशचा वापर करून बर्फ हटवावा. मग खिडक्या साफ करणारं स्क्रॅपर आणि बर्फ वितळवणाऱ्या लिक्विडचा वापर केला जाऊ शकतो.
प्लग इन हीटर आणि इलेक्ट्रिक ब्लँकेट कसं वापरावं
हिवाळ्यात अनेकजण पोर्टेबल हीटरचा देखील वापर करतात. मात्र जर याचा वापर करताना खबरदारी घेतली नाही तर आग लागण्याचा धोकादेखील असतो.
अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि इलेक्ट्रिक सेफ्टी फर्स्ट चॅरिटि संस्थेचे मॅनेजर याचा योग्य प्रकारे वापर कसा करावा याचं मार्गदर्शन करतात.
त्यांच्या मते, हीटर नेहमीच सपाट जागेवर ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते पडणार नाही. कोणतीही ज्वलनशील वस्तू हीटरपासून किमान तीन फूट किंवा एक मीटर अंतरावर असली पाहिजे.
याशिवाय कपडे, चादर, ब्लँकेट याप्रकारच्या वस्तू हीटर पासून दूर ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर कपडे सुकवण्यासाठी हीटरचा वापर कधीही करता कामा नये. हीटरला रात्रभर किंवा खूप जास्त वेळ सुरू ठेवू नये.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञ, हीटरला एक्सटेंशन प्लगमध्ये न लावण्याचा इशाराही देतात. कारण यामुळं आग लागण्याचा धोका असतो.
इलेक्ट्रिक ब्लँकेट किंवा ब्लोअर यांचा वापर खूप जास्त वेळ करणंही धोकादायक ठरू शकतं. त्यामुळेच त्यांचा वापर करताना नेहमी टायमरचा वापर करावा.
इलेक्ट्रिक ब्लँकेटची वायर बाहेर निघालेली दिसत असेल, कंट्रोल युनिटमध्ये काही अडचण असेल किंवा स्विच ऑन केल्यानंतर दुर्गंध किंवा घाण वास येत असेल तर त्याचा वापर अजिबात करू नये.
गॅसवर चालणाऱ्या हीटरचा वापर केल्यामुळे खोलीत कार्बन मोनॉक्साईड जमा होण्याचा धोका असतो. त्यामुळे खोलीत कार्बन मोनॉक्साईडपासून अलर्ट करणाऱ्या किंवा धोक्याचा इशारा देणाऱ्या अलार्मचा वापर करावा.
हिवाळ्यात संसर्गापासून संरक्षण कसं करावं?
हिवाळ्यात सर्दी, खोकला, पडसं, गळा दुखणे किंवा गळ्याला आतून सूज येणं यासारख्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.
याशिवाय नोरावायरस (विंटर वॉमिटिंग बग) च्या संसर्गाचे रुग्ण देखील वाढतात. त्याशिवाय कोरोनाचा धोका अजूनही आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हिवाळ्यात बाहेर गारठा असल्यामुळे किंवा हिमबर्षाव होत असल्यामुळे बहुतांश वेळ लोक घरातच राहतात. अशा परिस्थितीत संसर्ग पसरण्याचा धोका आणखी वाढतो. बंदिस्त जागा किंवा जिथे खिडकी किंवा दरवाजा नसतो, अशा ठिकाणी संसर्गाचा पसरण्याचा धोका अधिक असतो.
स्वच्छता आणि हायजीनवर लक्ष देऊन, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरून आणि हात स्वच्छ धुतल्यानं संसर्गापासून स्वत:चा बचाव केला जाऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











