किबुत्झ : इस्रायलमधली एक अनोखी वसाहत व्यवस्था ज्याचा प्रयोग ओशो यांनीही करून पाहिलेला

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

हमासने 7 ऑक्टोबरपासून इस्रायलवर हल्ला केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इस्रायलच्या आत सर्व बाजूने घुसण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचे दुष्परिणाम कफर आझा, नहाल ओझे, आणि मेगान या किबुत्झ भागात जाणवले. किबुत्झ गाझा सीमेच्या जवळ आहे.

किबुत्झ हे गावखेडं नाही तर वसाहत आहे. किबुत्झ ही एक वेगळ्या प्रकारची शासनव्यवस्था आहे. त्यात लोकशाही, सहकार, साम्यवाद यांचा समावेश आहे.

या समुदायाच्या इतिहास इस्रायल देशाच्या स्थापनेच्या चार दशकांच्या आधीचा आहे. इस्रायलच्या निर्मितीच्या दरम्यान त्याने अनेक पातळ्यांवर सहकार्य केलं.

ओशो रजनीश यांनाही या व्यवस्थेची भुरळ पडली होती आणि त्यांनीही ही व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न केला होता.

या व्यवस्थेने इस्रायलच्या निर्माणात महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसंच जेव्हाही इस्रायलवर हल्ला झाला तेव्हा या व्यवस्थेने त्यांना तारलं आहे.

किबुटिझमने फक्त शेतीच नाही तर इस्रायली समाजाच्या बौद्धिक विकासात आणि त्याच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

किबुत्झ मध्ये दैनंदिन जीवन कसं असतं?

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

किबुटिझम म्हणजे सहनिवास. एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाच्या व्याख्येप्रमाणे त्याचा अर्थ घ्यायचा झाला तर ही शेतकी किंवा औद्योगिक वसाहतीचा भाग आहे.

डेंग्या किबुत्झ ही वसाहत पहिल्यांदा 1909 मध्ये उदयाला आली. तेव्हा ती पॅलेस्टाईनचा भाग होती. या वसाहती सुरुवातीला छोट्या होत्या आणि नंतर त्यांचा आकार वाढला आणि त्यांनी समुदायाचं रुप घेतलं.

या वसाहतींच्या निर्माणाने इस्रायलच्या आणि तिथल्या समाजाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली.

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

पूर्व युरोपियन देशातून आलेल्या 12 ज्यू तरुणांनी किबुट्झची निर्मिती केली होती. किबुट्झची व्यवस्था निर्माण करण्यामागे की सुपीक जमीन तयार करण्याच्या व्यवस्थेला तयार करायची असा उद्देश होता.

ती केवळ समतावादीच नसेल तर त्यातून सामान्य आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल हा त्यामागे उद्देश होता.

किबुटिझमने हीच व्यवस्था पुढे अंमलात आणली आणि ती एक प्रकारे यशोगाथाच झाली.

किबुत्झ व्यवस्थेत समानता प्रचंड प्रमाणात पाळली जाते. तिथे प्रत्येक सदस्य समान असतो. प्रत्येकाला सगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. इतकं की एखाद्याला भेटवस्तू मिळाली तर त्यावर सगळ्यांचा समान हक्क असतो.

किबुत्झमध्ये कोण राहतं आणि तिथलं आयुष्य कसं आहे?

किबुत्झमध्ये कामाचं विशिष्ट मूल्य आहे आणि प्रत्येक काम समान आहे. इथे दैनंदिन कामं विभागली जातात आणि बदलतात. एखाद्या दिवशी भांडी धुवावी लागतात, तर कधी दुसऱ्या दिवशी घरही साफ करावं लागतं.

किबुट्झमध्ये आर्थिक समानतेची भावना विकसित करण्यासाठी, सर्व सदस्य सामुदायिक स्वयंपाकघरात जेवतात आणि इतकंच नव्हे तर बहुतेक एकसारखे कपडे देखील घालतात.

आधी शेती हा किबुत्झचा मुख्य आधार होता. मात्र, नंतर त्यात इतर व्यवसायांचीही भर पडली.

कालांतराने, किबुत्झ शेती फलदायी ठरली आणि हळूहळू हे किबुत्झ देखील तांत्रिकदृष्ट्या प्रगत उद्योग झाले. इस्रायलच्या एकूण लोकसंख्येत 2.5 टक्के किबुटिझमचा वाटा आहे आणि या संकल्पनेचा इस्रायलच्या कृषी उत्पादनात 33 टक्के आणि औद्योगिक उत्पादनात 6.3 टक्के वाटा आहे.

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लोकशाही आणि कृषिप्रधान व्यवस्था ही किबुट्झची मुख्य वैशिष्ट्यं आहेत. 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाल्यापासून, किबुत्झ वैयक्तिक आणि मालमत्तेच्या गोपनीयतेमध्ये वाढला आहे.

साम्यवादात ज्यामध्ये उपलब्ध असलेल्या मालकी सामायिक केली जाते आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जाते. त्यात वैयक्तिक मालमत्ता नसते. मार्क्सवादी, लेनिनवादी आणि माओवादी व्यवस्था या तत्त्वाभोवती फिरतात.

ज्यू नॅशनल फंडाद्वारे किबुत्झला जमीन भाड्याने दिली जाते. त्याच्या मालमत्तेची मालकी वाटून घेतली जाते.

समाजातील सदस्यांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक आणि आरोग्य सेवा किबुत्झद्वारे पुरविल्या जातात. जॉर्डन व्हॅली, डेड सी आणि गाझा आणि वेस्ट बँकसह इस्रायलच्या सीमेच्या वर अशा किबुत्झ देशभरात आहेत. त्यामुळेच इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट अनेकदा या किबुत्झ भागात उतरतात.

किबुत्झमध्ये प्रौढांसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, त्यांच्या खासगीपणाचा आदर केला जातो. स्वयंपाक आणि खाण्याची व्यवस्था सामुदायिक आहे. तिथे मुलांचं संगोपन केलं जातं आणि एकत्रितपणे एकाच ठिकाणी त्यांची काळजी घेतली जाते. सर्व मुलं समान पातळीवर सुरुवात करतात आणि त्यांना समान संधी असतात.

किबुत्झचं बदलतं स्वरुप

एका किबुत्झमध्ये 100 ते 1000 सदस्य असू शकतात, तर जुन्या किबुत्झमध्ये तीन किंवा चार पिढ्या एकत्र राहण्याची उदाहरणे आहेत. अशा किबुत्झमध्ये मूळ संस्थापक आणि त्यांचे वारस एकत्र राहत असल्याची नोंद केली जाते.

काही किबुत्झमध्ये ज्यू म्हणून ओळखले जाणारे आणि इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या स्थलांतरितांचाही समावेश होतो.

येथील बहुतांश रहिवासी धर्मनिरपेक्ष आहेत, काही धार्मिकसुद्धा आहेत.

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

एका अंदाजानुसार, इस्रायलमध्ये सुमारे अडीचशे किबुत्झमध्ये सुमारे सव्वा लाख लोक राहतात. सुमारे 20 टक्के धार्मिक आहेत. काही पुराणमतवादी तर काही सुधारणावादी आहेत.

अगदी काल्पनिक वाटणाऱ्या किबुत्झ पद्धतीतही काळानुरूप अनेक बदल होत गेले आणि समूहाऐवजी आता ते व्यक्तीकेंद्रित होत आहे. काही किबुटिझमने नवीन रूपं स्वीकारली आहेत, तर काहींनी आपली ऐतिहासिक ओळख टिकवून ठेवायची की बदलत राहायचे यावर वाद सुरू आहेत.

किबुत्झ आणि ओशो

भारतातील वादग्रस्त गुरू रजनीश यांनी ओरेगॉन काउंटी, USA येथे जमीन खरेदी केली आणि जगाच्या विविध भागातील अनुयायांसाठी 'रजनीशपुरम' च्या रूपाने मुक्त समाज तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात अध्यात्माबरोबरच शेती, सामूहिक गृहनिर्माण, सामूहिक श्रम इत्यादी गोष्टींवर भर देण्यात आला होता .

फॉस्वोज रुडी ही ज्यू स्त्री ओशोंच्या खूप जवळ होती असं म्हटलं जातं. हिटलरच्या ज्यूंच्या नरसंहारापासून ते वाचले आणि ओशो आश्रमाला त्यांच्या नावाने हास्य असे नाव देण्यात आले.

रजनीशपुरम

फोटो स्रोत, NEH.Gov

रुडी स्वतः इस्रायलमध्ये किबुत्झमध्ये राहत होती आणि नंतरच्या काळात ओशोंच्या संपर्कात आली. ओशोंनी पुण्यात एक आश्रम स्थापन केला, परंतु 1981 मध्ये ते वैद्यकीय कारणास्तव अमेरिकेत गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिष्यही गेले.

मात्र, येथील रजनीशपुरममधील रहिवाशांच्या जीवनशैलीमुळे स्थानिकांशी त्यांचा संघर्ष झाला. एका क्षणी, ओशोंवर व्हिसात फसवणूक केल्याचा आणि अमेरिकन भूमीवर जैविक शस्त्रांसह अमेरिकन लोकांविरुद्ध हिंसाचार केल्याचा आरोपही करण्यात आला.

त्यानंतर ओशो भारतात आले आणि त्यांनी आपले उर्वरित आयुष्य भारतात घालवलं. काल्पनिक समुदाय तयार करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यातले काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी झाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)