घृणास्पद कृत्य प्रकरणी एअर इंडियाला तीस लाखांचा दंड, पायलटचा परवाना निलंबित

शंकर मिश्रा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शंकर मिश्रा

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दुसऱ्या सहप्रवासी असलेल्या वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी नागरी उड्डाण प्राधिकरणाने (DGCA) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. वृत्तसंस्था एएनआयने डीजीसीएच्या हवाल्याने म्हटलंय की, एअर इंडियाने 'नियमांचे उल्लंघन' केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय. तसेच डीजीसीएने संबंधित एअर इंडिया फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केलाय. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, फ्लाइटचा पायलट-इन-कमांड आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरला. त्यामुळे डीजीसीएने एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या डायरेक्टरला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे लघुशंकेचं प्रकरण नोव्हेंबर महिन्यात घडलं होतं. मात्र दीड महिन्यापूर्वी हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी शंकर मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. एअर इंडियाने शंकर मिश्राला चार महिन्यांसाठी फ्लाइट बॅन लावल. हे विमान अमेरिकेतील न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेने येत होतं. पीडित महिला विमानाच्या फर्स्टक्लास मधून प्रवास करत होती.

दारुच्या नशेत महिला सहप्रवाशावर कथित लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला बंगळुरू इथून अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळी दिल्ली पोलिसांच्या बरोबरीने बंगळुरू पोलिसांचं पथकही हजर होतं. शंकर मिश्रा असं या व्यक्तीचं नाव आहे. आरोपीला दिल्लीत आणण्यात आलं होतं आणि त्याला जामीन नाकारण्यात आला होता.

आरोपी चौकशीत सहकार्य करत नाही असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

वडील काय म्हणाले होते ?

तो असं वागला असेल असं मला वाटत नाही. पीडित महिला 72 वर्षांची आहे, त्याच्या आईच्या वयाएवढी आहे. माझा मुलगा 34 वर्षांचा आहे. तो असं कसं वागू शकतो? त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला 18 वर्षांची मुलगीही आहे.

माझा मुलगा 30-35 तास झोपला नव्हता. रात्रीचं जेवण झाल्यानंतर विमानाच्या क्रूने दिलेलं ड्रिंक प्यायला असावा. मग तो झोपला असेल. मला जेवढं माहिती आहे, त्यानुसार तो जागा झाल्यानंतर एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याची विचारपूस केली होती.

पीडित महिलेने मुलाकडे नुकसानभरपाई मागितली. ती त्याने दिली. त्याच्यानंतर काय झालं माहिती नाही. त्यांनी अशी मागणी केली असेल जी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे त्या नाराज झाल्या असतील. कदाचित ब्लॅकमेलिंग केलं जात असावं.

शुक्रवारी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या वडिलांनाही चौकशीसाठी समन्स बजावला आहे. अनेकदा फोन करुनही त्यांनी उत्तर दिलं नाही. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात मुंबईत दोन लोकांची चौकशी केली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

काय होतं प्रकरण ?

26 नोव्हेंबरला एअर इंडियाचं विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत होता. या विमानात आरोपीने सहप्रवाशी महिलेवर लघुशंका केल्याचा आरोप आहे. एअर इंडियाकडे यासंदर्भात तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी बुधवारी तक्रार दाखल करुन घेतली. आरोपीने पीडितेची माफी मागून तक्रार न करण्याची विनंती केली होती. याप्रकरणाचा त्रास पत्नी आणि मुलीला होऊ नये असं आरोपीला वाटत होतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आरोपी ज्या कंपनीत कामाला होता त्या अमेरिकेच्या वेल्स फार्गो कंपनीने त्याला कामावरुन कमी केलं. वेल्स फार्गो ही अमेरिकास्थित आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. आरोपीवर लागलेले आरोप अस्वस्थ करणारे आहेत असं कंपनीने कारवाई करताना म्हटलं होतं.

महिला सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या पुरुष प्रवाशावर सुरुवातीला 30 दिवसांची प्रवासबंदी घातलीे असं एअर इंडियाने स्पष्ट केलं होतं. पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत,' असे दिल्ली पोलिसांनी सांगितलं होतं.

'डीजीसीए'ने या घटनेबाबतचा अहवाल विमान कंपनीकडून मागविला आहे. यात निष्काळजी दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे 'डीजीसीए'ने म्हटलं आहे.

शंकर मिश्रा असं या आरोपीचं नाव असून, त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस दिल्ली पोलिसांनी जारी केली होती. आरोपीने दिलेल्या निवेदनात पीडित महिलेबरोबरच्या व्हॉट्अप संभाषणाचा दाखला दिला. मी कपडे आणि बॅग्ज साफ केल्या होत्या. पीडित महिलेनं माफ केल्याचं सांगितलं तसंच या कृत्यासाठी तक्रार नोंदवण्याचा हेतू नसल्याचं म्हटलं होतं. या संवादाचा पुरावा आरोपीने निवेदनाबरोबर जोडला आहे.

महिलेची तक्रार फक्त एअर इंडियाकडून पुरेशी नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात होती, यासाठी तिने 20 डिसेंबर रोजी तक्रार केली होती. मिश्रा यांनी 28 नोव्हेंबर रोजी पेटीएमवरुन दोन्ही पक्षांच्या सहमतीनुसार महिलेला नुकसान भरपाई दिली. याला जवळपास एक महिना उलटला. पण ही रक्कम महिलेच्या मुलीने १९ डिसेंबर रोजी परत केली होती.

या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता आणि केबिन क्रूच्या जबाबानुसार दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या समझोत्याला पुष्टी मिळाली आहे. आरोपींचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि ते तपास प्रक्रियेत सहकार्य करतील," असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे"