चीनच्या अत्याधुनिक शस्त्रं, ड्रोन आणि लष्करी उपकरणांच्या प्रदर्शनातून काय समजलं? जाणून घ्या 5 महत्वाचे मुद्दे

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनने नुकतीच एक मोठी परेड आयोजित केली होती. या परेडमध्ये नवीन अत्याधुनिक शस्त्रं, ड्रोन आणि इतर लष्करी उपकरणांचं प्रदर्शन करून त्यांनी जगाला आपलं लष्करी सामर्थ्य दाखवलं.
    • Author, टेसा वोंग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

चीनने नुकतंच एक मोठी परेड आयोजित केली. या परेडमध्ये नवीन अत्याधुनिक शस्त्रं, ड्रोन आणि इतर लष्करी उपकरणं सादर करून त्यांनी जगाला आपलं लष्करी सामर्थ्य दाखवलं आहे.

अनेक लोक चीनचं हे पाऊल म्हणजे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना दिलेला हा स्पष्ट संदेश मानत आहेत.

या कार्यक्रमात शी जिनपिंग यांनी 20 पेक्षा जास्त परदेशी राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केलं. यात रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांचा समावेश आहे. हे दोघंही आर्थिक मदत आणि इतर बाबतीत चीनवर अवलंबून आहेत.

हा कार्यक्रम जागतिक स्तरावर शी जिनपिंग यांच्या वाढत्या शक्तीचा आणि चीनच्या लष्करी सामर्थ्याचा दाखला होता. या प्रदर्शनात 'गुआम किलर' क्षेपणास्त्र, 'लॉयल विंगमन' ड्रोन आणि अगदी रोबोटिक लांडग्यांचाही समावेश होता.

जोरदार चर्चा आणि या नवीन शस्त्रांच्या लक्षवेधक गोष्टींच्या पलीकडे आपल्याला आणखी काय समजलं? हे समजून घेण्यासाठी 5 महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.

1. चीनकडे भरपूर शस्त्रं आहेत. परंतु, ते किती प्रभावीपणे वापरू शकतात?

बुधवारच्या (3 ऑगस्ट) प्रदर्शनातून स्पष्ट झालं की, चीनने वेगानं विविध प्रकारची शस्त्रं तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.

सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीतील लष्करी बदलांच्या प्रोग्रॅममधील सहाय्यक प्राध्यापक मायकेल रस्का म्हणतात, दहा वर्षांपूर्वी चीनने जे लष्करी तंत्रज्ञान दाखवलं होतं, ते अमेरिकेनं शोधलेल्या खूपच प्रगत उपकरणांची 'नक्कल' होती.

परंतु, या परेडमध्ये अधिक नाविन्यपूर्ण आणि विविध प्रकारची शस्त्रं दिसली, विशेषतः ड्रोन आणि क्षेपणास्त्रं. यावरून दिसून येतं की चीनचा संरक्षण-उद्योग किती प्रगत झाला आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बुधवारच्या (3 ऑगस्ट) प्रदर्शनातून स्पष्ट झालं की, चीनने वेगानं विविध प्रकारची शस्त्रं तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.

पॅसिफिक फोरममधील सहाय्यक सहकारी अलेक्झांडर नील म्हणतात की, चीनची वरून खाली (टॉप-डाउन) असलेली रचना आणि मोठ्या प्रमाणातील संसाधनं यामुळे ते इतर अनेक देशांपेक्षा जलद नवीन शस्त्रं तयार करण्यास सक्षम आहेत.

चीन ही शस्त्रं मोठ्या प्रमाणात तयार करू शकतं, ज्यामुळे ते युद्धभूमीवर शत्रूंवर प्रचंड दबाव टाकू शकतात.

"चीनकडे युद्धसामग्री, जहाजं आणि इतर लष्करी साधनं तयार करण्याची क्षमता आहे… राज्य फक्त आदेश देतं आणि ते लगेच तयार होतात," असं नील म्हणतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीन ही शस्त्रं मोठ्या प्रमाणात तयार करू शकतं, ज्यामुळे ते युद्धभूमीवर शत्रूंवर प्रचंड दबाव टाकू शकतात.

परंतु, चीनचं लष्कर ही शस्त्रं किती प्रभावीपणे एकत्रित वापरू शकतं?

"ते हे चमकदार आणि प्रगत शस्त्रं दाखवू शकतात, पण ते त्यांना हव्या त्या पद्धतीनं वापरण्यासाठी संघटनात्मकदृष्ट्या लवचिक आहेत का?" असं डॉ. रस्का विचारतात.

ते म्हणतात की, हे सोपं असणार नाही, कारण चीनचं लष्कर खूप मोठं आहे आणि अनेक दशकांपासून मोठ्या युद्धात ते सहभागी झालेले नाहीत, त्यामुळे त्यांची चाचणी झालेली नाही.

2. अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीनचा क्षेपणास्त्रांवर भर

चीनने बरीच क्षेपणास्त्रं दाखवली आहेत, त्यात काही नवीन प्रकारही आहेत.

यात डोंगफेंग-61 आहे, जे त्याच्या नोजकोनमध्ये अनेक वारहेड्स घेऊन जाऊ शकतं. डोंगफेंग-5सी आंतरखंडीय क्षेपणास्त्र, जे उत्तर चीनहून सोडलं जाऊन अमेरिका गाठू शकतं आणि 'गुआम किलर' डोंगफेंग-26डी मध्यम श्रेणीचं क्षेपणास्त्र, जे अमेरिकेतील महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ला करू शकतं.

यात काही हायपरसॉनिक अँटी-शिप क्षेपणास्त्रही होते, जसं वायजे-17 आणि वायजे-19, जी खूप वेगानं उडू शकतात आणि अँटी-क्षेपणास्त्र प्रणालींपासून वाचण्यासाठी अनपेक्षितपणे मार्ग बदलू शकतात.

क्षेपणास्त्रांवर लक्ष केंद्रित करण्यामागे एक कारण आहे.

नील म्हणतात की, चीनने क्षेपणास्त्रं आणि रॉकेट शक्ती विकसित केली आहेत, हे त्यांच्या प्रतिकार धोरणाचा एक मुख्य भाग आहे आणि अमेरिकेच्या नौदलातील श्रेष्ठतेला विरोध करण्यासाठी आहे.

डीएफ-61 क्षेपणास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डीएफ-61 क्षेपणास्त्र परेडदरम्यान सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच दाखवण्यात आलं.

अमेरिकेचे नौदल जगात सर्वोत्तम आहे, त्यांच्याकडे सर्वात मोठी एअरक्राफ्ट कॅरिअर आणि कॅरिअर स्ट्राईक ग्रूप्स आहेत. चीन अजून या बाबतीत खूप मागे आहे.

पण, नील म्हणतात की, काही पाश्चात्य संरक्षण तज्ज्ञ आता हळूहळू असं म्हणत आहेत की, हे स्ट्राइक ग्रूप्स खूप धोकादायक आहेत, कारण ते क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यासाठी 'सोप्या लक्ष्यांसारखे' आहेत.

ते म्हणतात की, बीजिंग फक्त प्रतिकारशक्ती मजबूत करत नाही, तर 'दुसऱ्या हल्ल्याची क्षमता' (सेकंड स्ट्राइक कॅपेबिलिटी) देखील तयार करत आहे. म्हणजे जर देशावर हल्ला झाला तर त प्रत्युत्तर देऊ शकतात.

इतर उल्लेखनीय शस्त्रांमध्ये एलवाय-1 लेझर शस्त्रं होती, जे मुळात एक प्रचंड लेझर आहे, जे इलेक्ट्रॉनिक्स जाळू शकतं, पायलटच्या डोळ्यांना इजा पोहोचवू शकतं आणि जे-20 आणि जे-35 विमानांसह पाचव्या पिढीच्या स्टेल्थ फायटर जेट्सचा समावेश होता.

3. चीन पूर्णपणे एआय आणि ड्रोनवर देत आहे भर

तिथे अनेक प्रकारचे ड्रोन होते, काही एआय-सक्षमही होते. परंतु, सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते एजेएक्स-002 महाकाय पाणबुडी ड्रोनने.

ज्याला अतिरिक्त मोठ्या लांबीचे चालकविरहित पाण्याखालील वाहन (एक्स्ट्रा लार्ज अन्क्रूव्ड अंडरवॉटर व्हेइकल (एक्सएलयूयूव्ही)) म्हणतात, हे सुमारे 20 मीटर (65 फूट) लांब आहे आणि शक्यतो पाळत ठेवणं आणि माहिती गोळा करण्याची कामं करू शकतं.

चीनने जीजे-11 स्टेल्थ अटॅक ड्रोन देखील दाखवलं, ज्याला 'लॉयल विंगमन' म्हणतात. हा ड्रोन मॅनड (मानवयुक्त) फायटर जेटसोबत उडू शकतो आणि हल्ल्यांवेळी त्याला मदत करू शकतो.

एजेएक्स- 0002 ड्रोन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एक प्रचंड, 60 फूट (18 मीटर) लांबीचे पाण्याखालील आण्विक सक्षम मानवरहित वाहन.

सामान्य हवाई ड्रोन व्यतिरिक्त, तिथे 'रोबोटिक लांडगे'ही होते. तज्ज्ञांच्या मते, हे निरीक्षण, माइन (भूसुरुंग) शोधणं किंवा शत्रूच्या सैनिकांना शोधून पकडणं अशा विविध कामांसाठी वापरले जाऊ शकतात.

ड्रोन प्रदर्शनातून स्पष्ट होतं की, चीनला आपल्या लष्करी धोरणात कोणती दिशा घ्यायची इच्छा आहे, जिथे त्यांना 'फक्त पारंपरिक रचना वाढवायच्या नाहीत, तर त्यांची जागा घ्यायची आहे'.

डॉ. रस्का म्हणतात की, चीनने युक्रेन युद्धातून स्पष्टपणे धडा घेतल्याचं दिसतं, जिथे 'शत्रूवर फक्त ड्रोन फेकून' त्यांचं संरक्षण हळूहळू कमजोर केलं जाऊ शकतं.

नील म्हणतात की 'हल्ल्याच्या साखळीतील (किल चेन) वेग महत्त्वाचा आहे,' कारण वेगानं चालणाऱ्या युद्धात शत्रूवर मात करण्यासाठी आणि वरचढ होण्यासाठी निर्णय 'नॅनोसेकंदांत' घ्यावे लागतात आणि हे एआय करू शकतं.

रोबोट वुल्व्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सैनिकांसोबत विविध कामं करण्यासाठी याला सज्ज केलं जाऊ शकतं, जसं निरीक्षण करणं आणि दारूगोळा वाहून नेणं.

ते पुढे म्हणतात की, अनेक देश अजूनही त्यांच्या लष्करी प्रणालींमध्ये एआय वापरण्याबद्दल चिंतेत आहेत आणि "एआयला हल्ल्याच्या साखळीत (किल चेन) टाकण्यात आपण किती सुरक्षित आहोत?" असं विचारतात.

पण चीन या बाबतीत खूपच निश्चिंत आहे, असं डॉ. रस्का म्हणतात. "त्यांना वाटतं की, ते एआय नियंत्रित करू शकतात. ते आपल्या प्रणालींमध्ये पूर्णपणे एकत्रित करण्याच्या मार्गानं जात आहेत."

सैनिकांसोबत विविध कामं करण्यासाठी याला सज्ज केलं जाऊ शकतं, जसं निरीक्षण करणं आणि दारूगोळा वाहून नेणं.

4. चीनकडे तंत्रज्ञान असलं तरी, अमेरिका अजूनही वरचढ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

परेडमध्ये स्पष्टपणे दिसून आलं की, चीन लष्करी तंत्रज्ञानात अमेरिकेला लवकर मागे टाकत आहे आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रं तयार करण्यासाठी संसाधनं आहेत.

परंतु तज्ज्ञ म्हणतात की, ऑपरेशन्सच्या बाबतीत अमेरिका अजूनही वरचढच आहे.

डॉ. रस्का म्हणतात की, अमेरिकन लष्कर 'उत्कृष्ट' आहे, कारण तिथे 'खालपासून वर' (बॉटम अप) संस्कृती आहे, जिथे जमिनीवरील युनिट्स परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात आणि त्यांची युद्धनीती बदलू शकतात. यामुळे ते युद्धात अधिक लवचिक किंवा चपळ होतात.

दुसरीकडे चीन हा 'वरून खाली' (टॉप-डाऊन) पद्धतीने काम करतं, जिथे "त्यांच्याकडे घातक उपकरणं आणि प्रणाली असू शकतात, परंतु त्यांना वरून आदेश आल्याशिवाय एकही पाऊल उचलता येत नाही," असे ते म्हणतात.

डॉ. रस्का म्हणतात, "चीनचा विश्वास आहे की, त्यांचं तंत्रज्ञानच प्रतिकार निर्माण करतं. त्यांना वाटतं की यामुळे अमेरिका थांबेल... पण ऑपरेशन्सच्या पातळीवर काही घटनांमुळे दिसून आलं आहे की, ते जितके म्हणतात तितके कुशल नाहीत," असं सांगत ते गेल्या महिन्यातील एका घटनेकडे लक्ष वेधतात, चीनच्या युद्धनौकेनं फिलिपिन्स कोस्ट गार्डच्या समोर त्याच्या स्वतःच्या लहान जहाजाला धडक दिली होती.

जीजे-11 स्टेल्थ ड्रोन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जीजे-11 स्टेल्थ ड्रोन, चीनच्या चालकविरहित लढाऊ हवाई वाहनांच्या ताफ्याचा एक भाग.

5. ही परेड शस्त्र विक्रीसाठी आणि अमेरिकेला एकत्रित सामर्थ्य दाखवण्याची संधी

नील म्हणतात की, 24 पेक्षा जास्त देशांचे नेते या कार्यक्रमाला आमंत्रित होते, त्यामुळे शस्त्र आणि टँकची (रणगाडे) ही परेड प्रामुख्याने संभाव्य खरेदीदारांसाठी शस्त्रास्त्रांचे मोठे विक्री प्रदर्शन होते.

डॉ. रस्का म्हणतात की, या परेडला उपस्थित असलेले काही देश जसं की म्यानमार हे आधीच चीनची मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं खरेदी करत आहेत. परंतु, नवीन ग्राहकांना विक्री करण्याची किंवा ऑर्डर वाढवण्याची संधी हेच चीन सरकारला जागतिक पातळीवर आपला प्रभाव वाढवण्याचा मार्ग आहे.

या परेडमध्ये सहभागी झालेले काही नेते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या परेडमध्ये काही राष्ट्राध्यक्षांनी हजेरी लावली होती. परंतु, बहुतांश पाश्चात्य नेते त्यापासून दूर राहिले.

मुख्य ग्राहकांमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन उभे होते.

तिघेही एकत्र चालत परेडकडे गेले आणि स्टेजवर उभं राहून त्यांनी एकजुटीचा संदेश दिला.

नील म्हणतात की, हा अमेरिकेसाठी एक संदेश होता, जर अमेरिका खरोखर त्यांना आव्हान देऊ इच्छित असेल, तर त्याचा अर्थ असा होईल की "त्यांच्याविरुद्ध एकाच वेळी अनेक संभाव्य युद्धभूमींवर लढावं जसं की- कोरियन द्वीपकल्प, तैवान सामुद्रधुनी आणि युक्रेन".

"आणि जर तुम्ही विचार केला, तर तीनही क्षेत्रांवर अमेरिकेला दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यापैकी एखाद्या युद्धभूमीत ते अपयशी ठरू शकतात."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.