मुलांना आणि पुरुषांना मासिक पाळीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे कारण...

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली होती. 12 वर्षीय मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी सुरू झाली.

पण मासिक पाळीबाबत असलेल्या अज्ञानामुळे मोठ्या भावाने लहान बहिणीचा खून केला.

त्याने कपड्यावर लागलेल्या रक्ताच्या डागांचा सबंध लैंगिक संबंधांशी जोडला. आपल्या 12 वर्षांच्या बहिणीला मासिक पाळी येऊ शकते याचा विचारही त्याने केला नव्हता.

त्याच्या अत्याचारात मुलीचा जीव गेला. म्हणजे जेव्हा केव्हा स्त्रियांवर अत्याचार होतात तेव्हा त्याला बरीच कारणं असतात.

या प्रकरणी पोलिसांनी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. पण या प्रकारामुळे मासिक पाळीविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

आजच्या काळात मुलांना मासिक पाळीविषयी माहिती नसते असं क्वचितच घडतं. पण हे पण तितकंच खरं आहे की पुरुषांना याविषयी माहिती असण्याची शक्यता फार कमी असते.

मग भले ही पुरुषाचं लग्न झालेलं असो, त्यांना स्त्रियांच्या रक्ताचा फक्त एकच अर्थ कळतो. स्त्रीच्या शरीरातून रक्तस्त्राव होणं म्हणजे केवळ लैंगिक संबंध एवढंच त्यांना कळतं.

साहजिकच, मासिक पाळीविषयी पूर्ण माहिती नसल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल तर अजिबातच माहिती नसते.

मासिक पाळी हा आजार नाहीये

मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मुलांना आणि पुरुषांना माहीत आहे का?

मासिक पाळी येणं खूप सामान्य आहे. हा आजार नाहीये. स्त्रीला महिन्यातून एकदा मासिक पाळी येते. पाळीचं 28 दिवसांचं एक चक्र असतं.

तसं तर मासिक पाळी 21 ते 35 दिवसांत कधीही येऊ शकते. मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयाच्या आतून रक्त येत असतं.

स्त्रीचं शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्यावर मासिक पाळी सुरू होते.

यातून स्त्रियांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल देखील दिसून येतात.

स्त्री जीवनाविषयीचे समज गैरसमज

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आपल्या समाजात मासिक पाळीबाबत समज गैरसमज आहेत. त्यातही आणखीन अशा काही प्रथा आहेत, ज्यामुळे स्त्रियांचा जीव धोक्यात येतो.

बऱ्याच धर्मांमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अपवित्र मानलं जातं.

त्यामुळे या दिवसांमध्ये स्त्रियांना पूजेची, नमाजची परवानगी नसते. त्यांना रमजानच्या दिवसांमध्ये उपवास सुद्धा करता येत नाहीत.

अनेक ठिकाणी स्त्रियांना पाळीच्या दिवसांमध्ये एका बाजूला बसवून ठेवण्याची प्रथा आहे.

पाळीविषयी बोलणं म्हणजे सॅनिटरी पॅड्सविषयी बोलणं हा त्याचा अर्थ नाहीये.

स्त्रियांच्या आयुष्यातील या गोष्टीकडे पुरुष, मुलं एक रहस्य असल्यासारखं बघतात.

पण हल्ली टीव्हीवर होणाऱ्या चर्चा, प्रसिद्धी यामुळे मासिक पाळीविषयी जनजागृती नक्कीच वाढली आहे. आणि खरं तर ही जनजागृती बाजारपेठेचं देणं आहे.

पण ही जनजागृती सॅनिटरी पॅडपुरतीच मर्यादित आहे. जसं की मासिक पाळीमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. दुसरं काहीही न वापरता पॅड वापरलं पाहिजे.

पण पाळी हे प्रकरण एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये. ही बाब मुलींच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित आहे. वर्षानुवर्षे दर महिन्याला त्या त्यांचं आयुष्य एका विशिष्ट पद्धतीने जगत असतात.

मासिक पाळी विषयी पुरुष आणि मुलांना काय माहित असायला हवं?

मुलांना किंवा मग पुरुषांना स्त्रियांच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याबद्दल काय माहित आहे?

मुली दर महिन्याचे काही विशिष्ट सहा-सात दिवस कसे काढतात याविषयी पुरुषांना माहिती आहे का? जर तुम्हाला ते माहित नसेल तर तुम्हाला त्याविषयी माहित असणं आवश्यक आहे.

हे माहीत नसेल तर तुम्हाला तुमच्या बहिणीचा, मैत्रिणीचा, पत्नीचा स्वभाव किंवा मनःस्थिती समजू शकणार नाही.

दर महिन्यातील हे काही दिवस मुली इतकं सहन करतात जे कोणतंही धष्टपुष्ट पुरुष करू शकणार नाही.

या दिवसांत त्यांच्या शरीरात काही बदल होत असतात. या बदलांमुळे त्या अपवित्र ठरत नाहीत. म्हणूनच आपण त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागता कामा नये.

मासिक पाळी म्हणजे मन आणि शरीरातील बदल

पाळीची प्रक्रिया सुरू होण्याआधी मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये बरेच बदल होतात. याला मासिक पाळीपूर्वीच्या समस्या म्हणता येईल.

इंग्रजीत याला पीएमएस म्हणजेच प्री-मेंस्ट्रुअल सिंड्रोम म्हटलं जातं. यामध्ये मनासोबत शरीरातही बदल होत असतात.

वैद्यकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे बदल 200 प्रकारचे असू शकतात. यात मनात खूप मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असतात. मुलींचा मूड खूप लवकर बदलतो, चिडचिड वाढते, वेदना होत राहतात.

एखाद्या गोष्टीवर लगेच रडू येतं. तणाव आणि चिंता वाढलेली असते. झोप येत नाही, डोकं दुखत असतं, थकवा येतो. लैंगिक इच्छा वाढते किंवा कमी होते.

शरीराला पण त्रास होत असतो. पण औषध गोळ्या घेऊन हा दुखण्याचा त्रास कमी करता येतो. पण मनाचं काय? या काळात मानसिक आधाराची गरज असते.

म्हणूनच या दिवसांविषयी माहीत करून घेणं गरजेचं असतं.

ही सर्व लक्षणं प्रत्येक मुलीमध्ये, स्त्रीमध्ये दिसतीलच असं नाही.

त्यामुळे या दिवसांत आपल्या घरातील मुलींना, स्त्रियांना नेमका काय त्रास होतो हे समजून घेणं फार महत्वाचं असतं.

जेव्हा मुलांना किंवा पुरुषांना, स्त्रियांच्या पाळीच्या काळातील भावना समजतील तेव्हाच त्यांना स्त्रियांचं वर्तन आणि मनःस्थितीविषयी समजू शकेल.

त्यानुसार आपल्यालाही आपल्या वागण्यात बदल घडवून आणावा लागतो.

मुलांना किंवा पुरुषांना हे बदल जाणवले नाहीत आणि त्यानुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल केले नाहीत तर?

आपण लक्षात ठेवायला हवं की हे बदल मुलीच्या रोजच्या वागण्याबोलण्यात नसतात. हे बदल निसर्गाच्या चक्राशी संबंधित असतात.

निसर्गाच्या या चक्रामुळे दर महिन्याला होणाऱ्या बदलांवर मात करण्यासाठी आपण आपल्या आई, मुलगी, बहीण, मित्र, जोडीदार यांना कशी आणि किती प्रमाणात मदत करू शकतो हे आपण ठरवायला हवं.

जर पुरुषांनी या विशेष दिवसांमध्ये त्यांची मनस्थिती समजून घेतली तर तुमच्या सारखा सर्वोत्तम पुरुष या जगात नसेल याची खात्री बाळगा.

मासिक पाळीच्या दिवसांत मुलांनी आणि पुरुषांनी काय करायला हवं?

आपण स्त्रियांच्या या दिवसांवर विचार करू. त्यांना संवेदनशीलतेने समजून घ्या. या काळात त्यांना रोजच्या सारखं जगण्यासाठी मदत करा.

कदाचित पुरुषांसाठी निसर्गाने हेच काम ठरवून दिलंय. काळया पिशवीत बंद करून फेकून देण्याची ही गोष्ट नाहीये. ही गोष्ट अपवित्रही नाहीये आणि आजार तर मुळीच नाहीये.

जर मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना त्रास होत असेल, त्यांना विश्रांती घ्यायची असेल किंवा घरातील कामं करायची नसतील तर त्यांना आराम करू द्या.

त्यांना घराच्या कोणत्या कोपऱ्यात नव्हे तर त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आराम करू द्या. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या.

पण मग हे करण्यासाठी पुरुषांना घरातील सर्व कामं करावी लागतील, जी कामं आपण स्त्रियांच्या भरवशावर सोडलेली असतात.

या दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. त्यांच्यात सहनशीलता निर्माण करा. नाहीतर कधी कधी नकळत गोष्टी बिघडतात.

जेव्हा आपल्याला त्यांच्या पाळीविषयी समजेल तेव्हा आपण त्यांच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. याचमुळे नोकरदार स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी घेण्याचा सल्ला दिला जातो.

त्यामुळे लक्षात ठेवा की, मासिक पाळीचा मुद्दा हा केवळ स्वच्छता किंवा पॅडचा मुद्दा नाहीये. तो त्याहूनही मोठा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)