11 हजार फूट उंचीवर विमान उडत होतं, अन कॉकपिटमध्ये दिसला किंग कोब्रा

पायलट रूडॉल्फ एरसमस

फोटो स्रोत, RUDOLPH ERASMUS

फोटो कॅप्शन, पायलट रूडॉल्फ एरसमस
    • Author, सिसीलिया मॅकले
    • Role, बीबीसी न्यूज

दक्षिण आफ्रिकेचे पायलट रूडॉल्फ एरसमस तो एक साधा दिवस होता. त्यांनी विमानाला हवेत उडवलं पण त्यांच्या अजून हे लक्षात यायचं होतं की विमानात एक प्रवासी जास्त होता.

हा प्रवासी म्हणजे कोणी व्यक्ती नव्हती तर एक किंग कोब्रा होता. जो त्यांच्या सीटखाली सरपटत होता. रूडॉल्फ यांचं विमान त्यावेळी 11 हजार फूट उंचीवरून उडत होतं.

बीबीसीशी बोलताना रूडॉल्फ म्हणाले, “खरं सांगू का, माझा मेंदू बंद पडला होता, मला कळतच नव्हतं की काय होतंय.”

ते म्हणाले, “अत्यंत घाबरवून टाकणारा हा अनुभव होता.”

“मला काहीतरी थंड जाणवलं, असं वाटलं की काहीतरी सरपटतंय.”

त्यांना आधी वाटलं की त्यांच्या पाण्याच्या बाटलीचं झाकण नीट लागलं नसेल आणि त्यातून पाणी सांडलं असेल.

“पण जेव्हा मी डावीकडे वाकून पाहिलं तेव्हा मला तिथे किंग कोब्रा दिसला. तो सीटच्या आत स्वतःचं डोकं घुसवायच्या प्रयत्नात होता.

रूडॉल्फ यांचं विमान दक्षिण आफ्रिकेतल्या ब्लूमफोंटीनवरून प्रिटोरियाला जात होतं. त्या विमानात आणखी चार प्रवासी होते. विमानात साप आहे हे कळल्यावर त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.

रूडॉल्फ म्हणतात की जर कोब्रा जातीचा साप चावला तर पुढच्या 30 मिनिटात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यांना विमानात भीतीचं वातावरण पसरवायचं नव्हतं.

त्यांनी शांतपणे विचार केला की काय करायचं आणि मग एकदम शांततेत लोकांना सांगितलं की विमानात ‘अजून एक प्रवासी’ आहे.

नाग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोब्रा जातीचा साप चावला तर पुढच्या 30 मिनिटात माणसाचा मृत्यू होऊ शकतो

त्यांना भीती वाटत होती की किंग कोब्रा जर मागच्या बाजूला गेला तर लोक घाबरतील आणि विमानात गोंधळ उडेल.

पण त्यांनी ठरवलं की प्रवाशांना खरं काय ते सांगायचं. ते म्हणाले, “ऐका, विमानात किंग कोब्रा शिरला आहे. तो माझ्या सीटखाली आहे, त्यामुळे आपण विमान लवकरात लवकर खाली उतरवू.”

यानंतर विमानात एकदम शांतता पसरली.

रूडॉल्फ म्हणाले, “टाचणी जरी पडली असती तरी आवाज आला असता अशी शांतता विमानात पसरली होती. मला वाटतं एकदोन सेकंदांसाठी विमानातले सगळेच स्तब्ध झाले होते.”

त्यांनी सांगितलं की पायलटला वेगवेगळ्या परिस्थिती कसं वागावं, गोष्टी कशा हाताळाव्यात याचं ट्रेनिंग दिलं जातं पण त्यात कॉकपिटमध्ये साप शिरला तर काय करावं असलं काही ट्रेनिंग दिलेलं नसतं.

'तेव्हा कोब्रा सापडलाच नाही'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“पण मी घाबरलेलो दिसलो असतो तर परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली असती,” ते म्हणतात.

त्यांनी वेल्कोम शहरात इमर्जन्सी लँडिंग केलं.

काही लोकांनी तर या गोष्टीचा जबर धक्का घेतला पण काहींसाठी ही आश्चर्याची गोष्ट नव्हती.

या विमानाने दिवसातलं पहिलं उड्डाण वुस्टर फ्लाईंग क्लबवरून केलं होतं. तिथे काम करणाऱ्या दोन लोकांनी विमानाखाली किंग कोब्रा पाहिला होता. त्यांनी सापाला पकडण्याचाही प्रयत्न केला पण तो हाती आला नाही.

रूडॉल्फ म्हणतात की विमानात बसल्यानंतर उड्डाण करण्याआधी त्यांनीही साप शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो सापडला नाही. त्यामुळे सगळ्यांना वाटलं की विमानातून निघून गेला असेल.

दक्षिण आफ्रिकेच्या नागरी उड्डाण विभागाचे आयुक्त पॉपी खासो यांनी पायलट रूडॉल्फ एरसमस यांचं भरपूर कौतुक केलं.

न्यूज 24 वेबसाईटनेने म्हटलं की खोया म्हणाले, “रूडॉल्फ यांनी कमाल केली, त्यांनी विमानातल्या सर्व प्रवाशांचा जीव वाचवला.”

पण रूडॉल्फ यांना आपण काहीतरी फार वेगळं केलंय असं वाटत नाही.

ते म्हणतात, “माझ्या विमानातल्या प्रवाशांचंही कौतुक आहेच की त्यांनी गोंधळ केला नाही.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)