LIVE in the metaverse : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा

बीबीसी मेटाव्हर्सच्या जगात प्रवेश करण्यासाठीयेथे क्लिक करा.

बीबीसी मागील 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून बातम्या आणि मनोरंजनाच्या विश्वात कार्यरत आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची (बीबीसी) स्थापना 1922 मध्ये माहिती देणं, ज्ञानवर्धन करणे आणि मनोरंजन करण्याच्या उद्देशानं झाली होती.

आम्ही मागील 100 वर्षांपासून निष्पक्ष पत्रकारिता करण्याबरोबरच प्रेरणादायी आणि मनोरंजक आशय वाचकांना देत आहोत.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक असो, अपोलो 11 मिशन असो, ऑलिंपिकचे जगातील पहिले थेट प्रक्षेपण असो, बांगलादेशचे स्वातंत्र्य असो, 1983 चा क्रिकेट विश्वचषक असो किंवा अलीकडील विविध देशांमध्ये सुरू असणारे युद्धे किंवा संघर्षांचे कव्हरेज असो - बीबीसी या सर्वांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.

100 वर्षांहून अधिक काळ, जगभरातील लोकांनी आमच्या निष्पक्ष आणि विशेष पत्रकारितेसाठी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. बीबीसी न्यूजची जागतिक सेवा 40 पेक्षा जास्त भाषांमध्ये आठवड्यातून 31 कोटी 80 लाख लोकांपर्यंत पोहोचते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, न्यूजरूममध्ये काम कसं केलं जातं, तिथला अनुभव कसा असतो?

तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर आता तुम्हाला एक संधी चालून आली आहे, बीबीसी न्यूजच्या व्हर्च्युअल न्यूजरूममध्ये म्हणजेच आमच्या स्वतःच्या मेटाव्हर्समध्ये येण्यासाठी तुम्ही सज्ज रहा.

लंडन ब्रॉडकास्टिंग हाऊस आणि आमच्या इतर ब्युरोंमध्ये काम कसं केलं जातं हे जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. येथे तुम्हाला विश्वासार्ह बातम्या म्हणजे काय, फेक न्यूजला सामोरं कसं जायचं आणि प्रश्नमंजुषांद्वारे आपल्या ज्ञानाची चाचणी कशी करायची याची मूलभूत माहितीही मिळेल.

इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या बीबीसी न्यूज वेबसाईटचे होमपेजही डिझाइन करू शकता. आणि हो, तुम्ही इथे आल्यानंतर बीबीसीच्या व्हर्च्युअल न्यूजरूम मेटाव्हर्समध्ये सेल्फी काढायला आणि सर्टिफिकेट डाउनलोड करायला विसरू नका.

चला तर मग व्हर्च्युअल न्यूजरूममध्ये तुमचं स्वागत आहे, हा अनुभव तुमच्यासाठी खूप चांगला आणि नावीन्यपूर्ण असणार आहे. आमच्याबरोबर नवा प्रवास सुरू करण्यासाठी इथं क्लिक करा...

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)