You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचा निकाल तुम्ही इथे पाहू शकता
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभेसाठी 43 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली.
यापूर्वी त्यांनी 11 उमेदवारांची पहिली, 10 उमेदवारांची दुसरी, 30 उमेदवारांची तिसरी, 16 उमेदवारांची चौथी, 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती.
वंचितची 43 उमेदवारांची आठवी यादी
1. जळगाव ग्रामीण - प्रवीण जग्गनाथ सपकाळे
2. अमळनेर - विवेकानंद वसंतराव पाटील
3. एरंडोल - गौतम मधुकर पवार
4. बुलढाणा - प्रशांत उत्तम वाघोदे
5. जळगाव जामोद - डॉ. प्रविण पाटील
6. अकोट - दीपक बोडके
7. अमरावती - राहुल मेश्राम
8. तिरोरा - अतुल मुरलीधर गजभिये
9. राळेगाव - किरण जयपाल कुमरे
10. उमरखेड - तात्याराव मारोतराव हनुमंते
11. हिंगोली - जावेद बाबु सय्यद
12. फुलंब्री - महेश कल्याणराव निनाळे
13. औरंगाबाद पूर्व - अफसर खान यासीन खान
14. गंगापूर - अनिल अशोक चंडालिया
15. वैजापूर - किशोर भीमराव जेजुरकर
16. नांदगाव - आनंद सुरेश शिनगारे
17. भिवंडी ग्रामीण - प्रदिप दयानंद हरणे
18. अंबरनाथ - सुधीर पितांबर बागुल
19. कल्याण पूर्व - विशाल विष्णू पावसे
20. डोंबिवली - सोनिया इंगोले
21. कल्याण ग्रामीण - विकास इंगळे
22. बेलापूर - सुनील प्रभु भोले
23. मागाठाणे - दिपक हनवते
24. मुलुंड - प्रदिप महादेव शिरसाठ
25. भांडूप पश्चिम - स्नेहल सोहनी
26. चारकोप - दिलीप लिंगायत
27. विलेपार्ले - संतोष अमुलगे
28. चांदिवली - दत्ता निकम
29. कुर्ला - स्वप्नील जवळगेकर
30. बांद्रा पश्चिम - आकीफ दाफेदार
31. माहीम - आरफि उस्मान मिठाईवाला
32. भायखळा - फहाद मुजाहिद खान
33. कोथरूड - योदेश राजापुरकर
34. खडकवासला - संजय थिवर
35. श्रीरामपूर - अण्णासाहेब आप्पाजी मोहन
36. निलंगा - मंजू निंबाळकर
37. माढा - मोहन हळणकर
38. मोहळ - अतुल वाघमारे
39. सातारा - बबन करडे
40. सातारा - अर्जुन दुंडगे कर
41. करवीर - दयानंद मारुती कांबळे
42. इचलकरंजी - शमशुद्दीन मोमीन
43. तासगाव कवठे महाकांळ युवराज घागरे
वंचितची सातवी यादी
1. कारंजा - अभिजीत राठोड
वंचितची सहावी यादी
1. जळगाव शहर - ललितकुमार रामकिशोर घोगले
2. मुक्ताईनगर - संजय ब्राम्हणे
3. बुलढाणा - सदानंद माळी
4. अकोला पूर्व - ज्ञानेश्वर सुलताने
5. मेळघाट - संदीप कणीराम तोटे
6. अचलपूर - प्रदीप साहेबराव मानकर
7. मोर्शी वरुड - सौरभ श्रीरामजी मानकर
8. आर्वी - मारुती गुलाबराव उईके
9. काटोल - विवेक रामचंद्र गायकवाड
10. हिंगणा - अनिरुद्ध विठ्ठल शेवाळे
11. नागपूर पूर्व - गणेश ईश्वरजी हरकांडे
12. नागपूर पश्चिम - यश सुधाकर गौरखेड
13. भंडारा - अरुण जाधोजी गोंडाने
14. आरमोरी - मोहन गणपत पुराम
15. राजुरा - महेंद्रसिंह बबनसिंह चंदेल
16. यवतमाळ - डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे
17. दिग्रस - नाजुकराव धांदे
18. नायगाव - डॉ. महादेव विभूते
19. जिंतूर - सुरेश पुंडलिक नागरे
20. गंगाखेड - सीताराम घनदाट
21. पाथरी - सुरेश फड
22. मालेगाव बाह्य - किरण नाना मगरे
23. कळवण - दौलत राम राऊत
24. चांदवड - दिगंबर शांताराम जाधव
25. येवला - नामदेव संपत पवार
26. नाशिक पूर्व - रविंद्रकुमार पगारे
27. शहापूर - सचिन कुनबे
28. कालिना मोहम्मद सिद्दिकी
29. जुन्नर - देवराम लांडे
30. खेड आळंदी - रविंद्र रंधवे
31. शिरूर - रामकृष्ण बीडगर
32. वडगाव शेरी - विवेक लोंढे
33. पर्वती - सुरेखा गायकवाड
34. पुणे कॅन्टोन्मेंट - निलेश आल्हाट
35. करमाळा अतुल खुपसे
36. बार्शी - धनंजय जगदाळे
37. सोलापूर दक्षिण - संतोष पवार
38 फलटण - सचिन भिसे
39. वाई - अनिल लोहार
40. पाटण - बाळासाहेब जगताप
41. कोल्हापूर दक्षिण - अब्दुलहमीद निरशिकारी
42. हातकणंगले -- क्रांती सावंत
43. इस्लामपूर - राजेश गायगवाळे
44. पळसू - कडेगाव - जितन करकटे
45. जत - विठ्ठल पुजारी
वंचित बहुजन आघाडीने 16 उमेदवारांच्या पाचव्या यादीत बारामती मतदारसंघातून मंगलदास तुकाराम निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे.
पहिल्या यादीत तृतीयपंथी असलेल्या शमिभा पाटील यांना स्थान दिले, तर दुसरी 10 उमेदवारांच्या यादीत सर्वच्या सर्व उमेदवार मुस्लीम समाजातील आहेत.
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या 288 जागांपैकी किती जागा लढवणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, उमेदवार जाहीर करण्यात इतर पक्षांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
'वंचित'ची 11 जणांची पहिली यादी
- रावेर (जळगाव) - शमीभा पाटील
- सिंदखेड राजा (बुलडाणा) - सविता मुंडे
- वाशिम - मेघा किरण डोंगरे
- धामणगाव रेल्वे (अमरावती) - निलेश टी. विश्वकर्मा
- नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे
- साकोली (भंडारा) - डॉ. अविनाश नान्हे
- नांदेड दक्षिण - फारुख अहमद
- लोहा (नांदेड) - शिवा नरांगळे
- औरंगाबाद पूर्व - विकास रावसाहेब दांडगे
- शेवगाव (अहमदनगर) - किसन चव्हाण
- खानापूर (सांगली) - संग्राम माने
'वंचित'ची 10 जणांची दुसरी यादी
- मलकापूर विधानसभा - शहेजाद खान सलीम खान
- बाळापूर विधानसभा - खतीब सैय्यद नातीकोद्दीन
- परभणी विधानसभा - सय्यद समी सय्यद साहेबजान
- औरंगाबाद मध्य विधानसभा - मो. जावेद मो. इसाक
- गंगापूर विधानसभा - सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर
- कल्याण पश्चिम विधानसभा - अयाज गुलजार मोलवी
- हडपसर विधानसभा - अॅड. मोहम्मद अफरोज मुल्ला
- माण विधानसभा - इम्तियाज जाफर नदाफ
- शिरोळ विधानसभा - आरिफ मोहम्मद अली पटेल
- सांगली विधानसभा - आल्लाउद्दीन हयातचाँद काजी
'वंचित'ची 30 जणांची पहिली यादी
- धुळे शहर - जितेंद्र शिरसाट
- सिंदखेडा - भोजासिंग तोडरसिंग रावल
- उमरेड - सपना राजेंद्र मेश्राम
- बल्लारपुर - सतीश मुरलीधर मालेकर
- चिमुर - अरविंद आत्माराम सांदेकर
- किनवट - प्रा. विजय खुपसे
- नांदेड उत्तर - प्रा. डॉ. गौतम दुथडे
- देगलूर - सुशील कुमार देगलूरकर
- पाथरी - विठ्ठल तळेकर
- परतूर-आष्टी - रामप्रसाद थोरात
- घनसावंगी - सौ. कावेरीताई बळीराम खटके
- जालना - डेव्हिड घुमारे
- बदनापुर - सतीश खरात
- देवळाली - अविनाश शिंदे
- इगतपुरी - भाऊराव काशिनाथ डगळे
- उल्हासनगर - डॉ. संजय गुप्ता
- अणुशक्ती नगर - सतीश राजगुरु
- वरळी - अमोल आनंद निकाळजे
- पेण - देवेंद्र कोळी
- आंबेगाव - दिपक पंचमुख
- संगमनेर - अझीज अब्दुल व्होरा
- राहुरी - अनिल भिकाजी जाधव
- माजलगाव - शेख मंजूर चांद
- लातुर शहर - विनोद खटके
- तुळजापूर - डॉ. स्नेहा सोनकाटे
- उस्मानाबाद - ऍड. प्रणित शामराव डिकले
- परंडा - प्रविण रणबागुल
- अक्कलकोट - संतोषकुमार खंडू इंगळे
- माळशिरस - राज यशवंत कुमार
- मिरज - विज्ञान प्रकाश माने
'वंचित'ची 16 जणांची चौथी यादी
- शहादा - अलीबाबा रशिद तडवी
- साक्री - भिमसिंग बटन
- तुमसर - भगवान भोंडे
- अर्जुनी मोरगाव - दिनेश रामरतन पंचभाई
- हदगाव - दिलीप राठोड
- भोकर - रमेश राठोड
- कळमनुरी - दिलीप तातेराव मस्के
- सिल्लोड - मनोहर जगताप
- कन्नड - अय्याज मकबुल शाह
- औरंगाबाद पश्चिम - अंजन लक्ष्मण साळवे
- पैठण - अरुण सोनाजी घोडके
- महाड - आरीफ अब्दुल्ला खान देशमुख
- गेवराई - प्रियांका शिवप्रसाद खेडकर
- आष्टी - वेदांत सुभाष भादवे
- कोरेगाव - चंद्रकांत जानू कांबळे
- कराड दक्षिण - संजय कोंडिबा गाडे
'वंचित'ची 16 जणांची पाचवी यादी
मागील चार याद्यांप्रमाणे वंचितने पाचव्या यादीतही वंचितने विविध समाज घटकांतील उमेदवार दिले आहेत.
1. भुसावळ - जगन सोनवणे
2. मेहकर - डॉ. ऋतुजा चव्हाण
3. मूर्तीजापूर - सुगत वाघमारे
4. रिसोड - प्रशांत सुधीर गोळे
5. ओवळा माजिवडा - लोभसिंग राठोड
6. ऐरोली - विक्रांत चिकणे
7. जोगेश्वरी पूर्व - परमेश्वर रणशुर
8. दिंडोशी - राजेंद्र ससाणे
9. मालाड - अजय रोकडे
10. अंधेरी पूर्व - ॲड. संजीवकुमार कलकोरी
11. घाटकोपर पश्चिम - सागर गवई
12. घाटकोपर पूर्व - सुनीता गायकवाड
13. चेंबूर - आनंद जाधव
14. बारामती - मंगलदास निकाळजे
15. श्रीगोंदा - अण्णासाहेब शेलार
16. उदगीर - डॉ. शिवाजीराव देवनाळे
यापूर्वी 21 सप्टेंबरला 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या मुख्यप्रवाहातील पक्षाने प्रथमच तृतीयपंथी व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी दिल्याने सर्व स्तरातून कौतुकही झालं.
कोण आहेत तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील?
रावेर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या उच्चशिक्षित असून, सध्या त्या मराठी साहित्यात पीएचडी करत आहेत.
शमिभा पाटील या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असणाऱ्या फैजपूरच्या रहिवासी आहेत.
वंचित बहुजन आघाडीने रावेर मतदारसंघातून उमेदवारी दिलेल्या शमिभा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "मागच्या काही वर्षांमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या मेहनतीला आमच्या पक्षाने उमेदवारी देऊन न्याय दिला आहे. एक तृतीयपंथी व्यक्ती म्हणून राजकारणात एक सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न असेल. येणाऱ्या निवडणुकीला संपूर्ण तयारीनिशी तोंड देणार आहे. माझ्या शिक्षणाचा आणि राजकीय-सामाजिक कामांचा फायदा भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल."
'वंचित' तिसऱ्या आघाडीत का सहभागी झाली नाही?
तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आमच्यासोबत आघाडी करायची की नाही हे राजू शेट्टींनी ठरवायची आहे. त्यानुसार आमची चर्चा सुरु आहे. बच्चू कडू यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर आघाडीची चर्चा झाली तर आम्ही ती नक्कीच करू. प्रकाश शेंडगे यांच्यासोबत आमची कसलीही चर्चा झालेली नाही."
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "राज्यभरातील ओबीसी संघटनांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यादृष्टीने आम्ही तयारी आणि चर्चा करत आहोत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि प्राध्यपक वाघमारे यांच्याशी चर्चा झालेली आहे."
यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे आणि इतर लेखक, विचारवंतांच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आघाडीने केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "सामान्य माणसाने आणि आरक्षणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं व्यक्त केलं आहे. मी पक्ष म्हणून या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने बघतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)