सद्दाम हुसैन यांच्या एका निर्णयामुळे हसन नसरल्लाह यांना इराक सोडून जावं लागलं होतं

हसन नसरल्लाह, सद्दाम हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिमा बेबली
    • Role, बीबीसी अरबी

लेबनॉनची राजधानी बैरुतच्या दक्षिण भागावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाल्यानंतर लेबनॉन आणि या संघटनेशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हसन नसराल्लाह यांचा लेबनॉन आणि संपूर्ण प्रदेशावर अनेक दशकांपासून प्रभाव होता. नसराल्लाह यांच्या मृत्यूने हिजबुल्लाहच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नसराल्लाह यांच्यानंतर त्यांचे चुलत भाऊ हाशिम सफीउद्दिन हे हिजबुल्लाहचे नवे प्रमुख असतील.

जे सध्या या संघटनेची राजकीय भूमिकेवर नियंत्रण ठेवतात आणि लष्करी कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिहाद परिषदेचे ते सदस्यही आहेत.

हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर ना लेबनॉनमधील इस्रायलची कारवाई थांबली, ना लेबनॉनकडून इस्रायलच्या दिशेने रॉकेटचा मारा थांबला. पण महत्त्वाचा प्रश्न समोर आला तो म्हणजे आता पुढे काय होणार?

ग्राफिक्स
ग्राफिक्स

हसन नसरल्लाह यांच्या अनुपस्थितीत हिजबुल्लाहसमोरची आव्हाने

अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक पाश्चात्य देशांव्यतिरिक्त, काही अरब देश देखील इराण समर्थित हिजबुल्लाहला 'दहशतवादी संघटना' म्हणतात, तर लेबनीज सरकार हिजबुल्लाहला इस्रायलच्या विरोधात काम करणाऱ्या एक 'अधिकृत प्रतिकार गट' मानतं.

लेबनॉनमधील 'अल निहार' या वृत्तपत्राशी संबंधित पत्रकार इब्राहिम बैराम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, हसन नसराल्लाहचा मृत्यू ही एक असामान्य घटना आहे ज्यामुळे इस्रायलविरुद्धच्या लढाईत हिजबुल्लाहचा संकल्प बदलणार नाही.

इब्राहिम बैराम म्हणाले की, मला आशा आहे की हिजबुल्लाह "नसरल्लाहने दाखविलेल्या मार्गावर ठामपणे चालत राहील."

हाशिम सफीउद्दीन

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, हाशिम सफीउद्दीन हे हिजबुल्लाचे नवीन प्रमुख असू शकतो

बैराम म्हणाले की, हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूबद्दल लेबनॉनमध्ये संमिश्र भावना आहेत.

"असे काही लोक आहेत ज्यांना याबद्दल आनंद वाटतो, तर असे बरेच लोक आहेत जे हिजबुल्लालाहसाठी हा गंभीर धक्का असल्याचं मानतात."

ते म्हणाले की, हसन नसरल्लाह यांना हे माहिती होतं की हिजबुल्लाहच्या माजी प्रमुखांसोबत जे घडलं ते त्यांच्यासोबतही घडणार होतं. हिजबुल्लाहचे माजी प्रमुख अब्बास अल मुसावी यांच्यासोबत जे घडलं, तसंच हसन नसरल्लाह यांच्यासोबत देखील घडू शकतं याची त्यांना कल्पना होती.

इस्रायलने 1992 मध्ये अब्बास अल-मुसावी यांची हत्या केली होती.

इस्रायलने हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूची घोषणा केल्यानंतर, इराणचे नेते अयातुल्ला खामेनी यांनी त्यांच्या पहिल्या वक्तव्यात नसराल्लाह यांचे नाव घेणे टाळले, परंतु लेबनॉनमधील नागरिकांच्या हत्येचा निषेध केला आणि इस्रायलच्या या कारवाईला 'इस्रायली नेत्यांचा मूर्खपणा' असं म्हटलं.

हसन नसराल्लाह यांचे समर्थक बैरुतमध्ये त्यांच्या फोटोसह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हसन नसराल्लाह यांचे समर्थक बैरुतमध्ये त्यांच्या फोटोसह
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खामेनी म्हणाले की, "इस्रायली गुन्हेगारांनी केलेल्या कारवाईत हिजबुल्लाहचं काही विशेष नुकसान झालेलं नाही."

अयातुल्ला खामेनी यांनी जगभरातील मुस्लिम समुदायाच्या लोकांना इस्रायलचा सामना करण्यासाठी लेबनॉन आणि हिजबुल्लाह यांची साथ देण्याचं आवाहन केलं आहे.

प्राध्यापक आणि लेखक मोहम्मद अली मुकालिद यांचा असा विश्वास आहे की, हसन नसराल्लाह यांचा मृत्यू ही लेबनॉनसाठी त्याच्या प्रदेशांवर पुन्हा स्वायत्तता मिळवण्याची संधी आहे.

त्यांचा असा विश्वास आहे की, हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूने "लेबनॉनमध्ये निर्माण झालेला राजकीय तिढा सुटू शकतो. ज्यामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका घेणं आणि लेबनॉनशी संबंधित नसणाऱ्या इराणी योजनेला नाकारणाऱ्या हिजबुल्लाहच्या लेबनीज सदस्यांची सुरक्षा सुनिश्चित करणं या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात."

हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूमुळे हिजबुल्लाहच्या क्षमता किंवा प्रदेशातील स्थानावर कोणताही परिणाम होणार नाही आणि नेतृत्व बदलले तरी हिजबुल्लाहची ताकद आणि प्रभाव वाढेल यावर इराण जोर देण्याचा प्रयत्न करत आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कुड्स फोर्सचे माजी कमांडर अहमद वाहिदी म्हणतात की, "हिजबुल्लाहने अनेक नेत्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि एखादा नेता मृत्युमुखी पडला तर लगेच त्याच्या जागी एक दुसरा नेता तयार होतो."

दुसरीकडे, अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूचे वर्णन मध्य पूर्वेसाठी एक 'महत्त्वाची घडामोड' असं केलं आहे.

मोहम्मद अली मुकालिद यांचा असा विश्वास आहे की हसन नसराल्लाह यांच्या राजकीय क्षेत्रातील अनुपस्थितीमुळे, हिजबुल्लाहचे सदस्य आपापसात विभागले जाऊ शकतात, आणि अर्ध्याहून अधिक सदस्य लेबनीज सरकारला पाठिंबा देऊन इराणमधून परत येऊ शकतात.

कोण आहेत हिजबुल्लाहचे नवीन प्रमुख हाशिम सफीउद्दिन?

हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर बैरुतच्या रस्त्यांवर शोक आणि संताप पाहायला मिळाला, तर काही लोकांनी सोशल मीडियावरही आपले दुःख व्यक्त केले.

हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूच्या घोषणेनंतर हिजबुल्लाहच्या 'अल मनार' वाहिनीने कुराणातील आयतींचे पठण केले. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यामुळे बेघर झालेले अनेक लोक लेबनॉनच्या रस्त्यांवर दिसत आहेत.

लेबनीज आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 800 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

पत्रकार इब्राहिम बैराम यांच्यासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, हसन नसराल्लाह यांच्यानंतर हिजबुल्लाहचे नेतृत्व कुणाच्या हाती असेल?

हिजबुल्लाहच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष हाशिम सफिउद्दीन हे हिजबुल्लाहचे पुढचे प्रमुख असतील, पण इब्राहिम बैराम यांच्या मते, ते हसन नसरल्लाह यांच्याप्रमाणे पक्ष हाताळू शकतील की नाही हे सर्वात मोठे आव्हान असेल.

लेबनॉन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिजबुल्लाहबाबत लेबनॉनच्या नागरिकांमध्ये देखील वेगवेगळे मतप्रवाह आहेत

इब्राहिम बैराम म्हणाले की, "गेल्या चार दशकांपासून हसन नसराल्लाहसारखी शिया व्यक्ती इस्रायलसोबतच्या वादात एवढी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा नव्हती, परंतु त्यांच्या बरोबरीची व्यक्ती समोर येण्यासाठी बराच वेळ लागू शकतो."

इब्राहिम बैराम यांनी हसन नसराल्लाह यांचं वर्णन 'अतुलनीय नेता' असं केलं. आणि ते म्हणाले की त्यांनी पक्षाला राजकीय आणि लष्करीदृष्ट्या एकत्र केलं.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हाशिम सफीउद्दीन यांना 2017 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याच्या विधानांवरून हे स्पष्ट आहे की ते पॅलेस्टिनी नागरिकांचा संघर्ष आणि इस्रायलविरोधातल्या लष्करी कारवाईचं समर्थन करतात.

सद्दाम हुसैन यांच्या निर्णयाचा परिणाम

बैरुतच्या पूर्वेकडील एका गरीब वस्तीत हसन नसरल्लाह यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर लगेचच लेबनॉनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले.

लेबनॉनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले, तेव्हा ते पाच वर्षांचे होते. भूमध्य सागराजवळ असणाऱ्या लेबनॉन या छोट्याशा देशाला या विनाशकारी गृहयुद्धाने तब्बल 15 वर्षं ग्रासलं होतं. या युद्धात धर्म आणि वंशावरून लेबनॉनचे नागरिक एकमेकांविरोधात लढत होते.

या युद्धात ख्रिश्चन आणि सुन्नी सशस्त्र संघटनांनी परदेशातून मदत मिळवल्याचा आरोप लावण्यात आला होता.

हे युद्ध सुरु झाल्यामुळे हसन नसरल्लाह यांच्या वडिलांनी बैरुत सोडून शिया बहुसंख्य असणाऱ्या दक्षिण लेबनॉनमधल्या त्यांच्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी, हसन नसराल्लाह 'अमेल चळवळ' नावाच्या त्या काळातील सर्वात महत्त्वाच्या लेबनीज शिया राजकीय-लष्करी संघटनेचे सदस्य झाले. हा एक सक्रिय आणि प्रभावी गट होता, ज्याची स्थापना इराणच्या मुसी सदर यांनी केली होती.

याच काळात नसरल्लाह यांनी त्यांचे धार्मिक शिक्षणही सुरू केले. नसराल्लाहच्या शिक्षकांपैकी एकाने त्यांना शेख बनण्याचा आणि नजफला जाण्याचा सल्ला दिला. हसन नसराल्लाह यांनी हा सल्ला ऐकून वयाच्या 16 व्या वर्षी ते इराकचे नजफ शहर गाठले.

हसन नसराल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हसन नसराल्लाह हे 22 वर्षांचे असताना हिजबुल्लामध्ये सामील झाले.

हसन नसरल्लाह इराकच्या नजफमध्ये राहायचे, तेव्हा इराक हा एक अस्थिरतेने ग्रासलेला देश होता.

इराकमध्ये दोन दशकांपासून सतत रक्तरंजित क्रांती, बंडखोरी, हिंसाचार आणि राजकीय हत्या होत होत्या.

हसन नसराल्लाह यांना नजफ शहरात दोन वर्षे झाली आणि इराकच्या बाथ पक्षाचे नेते आणि विशेषतः सद्दाम हुसैन यांनी इराकच्या मदरशांमधून लेबनॉच्या शिया विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर हसन नसराल्लाह यांना नजफ सोडून मायदेशी परत जावं लागलं. मात्र तेथील शिकवणीचा तरुण हसन नसरल्लाहच्या मनावर दीर्घकालीन परिणाम झाला. नजफमध्ये अब्बास मूसावी नावाचे आणखी एक आलिम (धार्मिक नेता) त्यांना भेटले.

सद्दाम हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सद्दाम हुसैन

इराणशी जवळीक वाढली

एकेकाळी लेबनॉनमधील मौसासी सदरच्या शिष्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या मुसावी यांच्यावर इराणचे क्रांतिकारी धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या राजकीय दृष्टीचा खूप प्रभाव होता.

ते नसराल्लाह यांच्याहून आठ वर्षांनी मोठे होते आणि त्यांनी त्वरीत कठोर शिक्षक आणि प्रभावी नेत्याची भूमिका स्वीकारली.

लेबनॉनला परतल्यानंतर, या दोघांनी स्थानिक गृहयुद्धात भाग घेतला, परंतु यावेळी नसराल्लाह अब्बास मुसावी यांच्या मूळ गावी गेले. ते शिया बहुसंख्य गाव होतं.

या काळात नसरल्लाह अमेल चळवळीचे सदस्य राहिले आणि अब्बास मुसावी यांनी बांधलेल्या मदरशात शिक्षण घेणे सुरू ठेवले.

हसन नसराल्लाह लेबनॉनमध्ये परतल्याच्या एक वर्षानंतर इराणमध्ये क्रांती झाली आणि रुहोल्ला खोमेनी यांनी सत्ता हाती घेतली. इथून लेबनॉनच्या शिया समाजाचे इराणशी असलेले संबंध तर पूर्णपणे बदललेच, पण इराणमध्ये घडणाऱ्या घटना आणि तेथील दृष्टीकोन यांचा प्रभाव त्यांच्या राजकीय जीवनावर आणि सशस्त्र चळवळीवरही पडला.

हसन नसराल्लाह यांनी नंतर तेहरानमध्ये इराणच्या तत्कालीन नेत्याची भेट घेतली आणि खोमेनी यांनी त्यांना लेबनॉनमध्ये आपले प्रतिनिधी बनवले.

येथूनच हसन नसराल्लाह यांचे इराण दौरे सुरू झाले आणि त्यांनी इराण सरकारमधील निर्णायक आणि शक्तिशाली केंद्रांशी संबंध विकसित केले.

या काळात, गृहयुद्धात गुरफटलेला लेबनॉन, पॅलेस्टिनी सैनिकांसाठी एक महत्त्वाचा तळ बनला होता आणि स्वाभाविकच, बैरुतशिवाय, दक्षिण लेबनॉनमध्येही त्यांची मजबूत उपस्थिती होती.

लेबनॉनमधील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला आणि त्या देशाचा महत्त्वाचा भाग पटकन ताब्यात घेतला.

पॅलेस्टिनी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी लेबनॉनवर हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायली हल्ल्यानंतर लगेचच, इराणमधील रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या लष्करी कमांडर्सनी लेबनॉनमध्ये इराणशी संबंधित एक लष्करी गट तयार करण्याचा निर्णय घेतला.

ही संघटना हिजबुल्लाह होती आणि हसन नसराल्लाह आणि अब्बास मुसावी हे अमेल चळवळीतील इतर काही सदस्यांसह या नव्याने स्थापन झालेल्या गटात सामील झाले होते.

हसन नसराल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हसन नसराल्लाह लेबनॉनला परतल्यानंतर एक वर्षानंतर इराणमध्ये क्रांती झाली

या संघटनेने लवकरच लेबनॉनमध्ये अमेरिकन सैनिकांवर सशस्त्र कारवाई करून प्रदेशाच्या राजकारणात आपले नाव कमावले.

हसन नसराल्लाह जेव्हा हिजबुल्लाहमध्ये सामील झाले तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते. नसराल्लाह यांचे इराणशी असलेले संबंध दिवसेंदिवस अधिक घट्ट होत होते.

धार्मिक शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांनी इराणमधील क्यूम शहरात जाण्याचा निर्णय घेतला.

नसराल्लाह यांनी दोन वर्षे कुममध्ये शिक्षण घेतले, ते पर्शियन शिकले तसेच इराणी उच्चभ्रू लोकांमध्ये त्यांचे अनेक जवळचे मित्र बनवले.

लेबनॉनला परतल्यावर एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून त्याच्यात आणि अब्बास मुसावी यांच्यामध्ये मतभेद झाले.

त्यावेळी, मुसावी हे सीरियाचे अध्यक्ष हाफेज अल-असद यांचे समर्थक होते, परंतु नसराल्लाह यांनी आग्रह केला की हिजबुल्लाहने अमेरिकन आणि इस्रायली सैन्यावरील हल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले.

नसराल्लाह हे हिजबुल्लाहमध्ये एकटे पडले होते आणि काही काळानंतर त्यांना इराणमध्ये हिजबुल्लाहचे प्रतिनिधी बनवण्यात आले. ते पुन्हा इराणला परतले आणि हिजबुल्लाहपासून दूर ढकलले गेले.

त्या वेळी इराणचा हिजबुल्लावरील प्रभाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिसत होतं.

हा तणाव इतका वाढला की हिजबुल्लाचे महासचिव हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी सीरियाला पाठिंबा देणार्या अब्बास मुसावी यांना नवीन प्रमुख बनवण्यात आलं.

तोफैली यांना हटवल्यानंतर हसन नसरल्लाह परत आले आणि ते हिजबुल्लाहचे उपाध्यक्ष झाले.

हिजबुल्लाहचे सरचिटणीस म्हणून निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत अब्बास मुसावी यांची इस्रायली एजंटांनी हत्या केली आणि त्याच वर्षी 1992 मध्ये या संघटनेचे नेतृत्व हसन नसरल्लाह यांच्या हाती गेले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)