मुकेश कुमार ठरला वॉशिंग्टन सुंदरवर भारी

फोटो स्रोत, Getty Images
सामन्याचं शेवटचं षटक. प्रतिस्पर्धी संघाला हव्यात 13 धावा. निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न केल्याने दंड म्हणून 30 गज वर्तुळाच्या बाहेर केवळ 4 क्षेत्ररक्षक. आटोक्यातलं लक्ष्य, बचावासाठी सीमारेषेवर चारच क्षेत्ररक्षक अशा परिस्थितीतही मुकेश कुमारने टिच्चून गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध निसटता विजय मिळवून दिला. 34 धावा आणि 2 विकेट्स पटकावणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शेवटच्या षटकात हैदराबादचे वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को यान्सन मैदानात होते तर डेव्हिड वॉर्नरने अनुभवी इशांत शर्माच्या ऐवजी मुकेश कुमारकडे चेंडू सोपवला.
मुकेशच्या पहिल्या चेंडूवर वॉशिंग्टने 2 धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या चेंडूवर मुकेशने वाईड यॉर्कर टाकला. या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. तिसऱ्या चेंडूवर सुंदरने एक धाव काढली. चौथ्या चेंडूवर यान्सननेही एक धाव काढली. पाचव्या चेंडूवर सुंदरने बॅकफूटवर जात डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू तटवून काढला. सुंदरला चेंडू चौकार गेला असं वाटलं, त्यामुळे तो जोरात धावला नाही. सुंदर-यान्सन जोडीने एक धाव पूर्ण केली पण तोवर थ्रो स्टंप्सपाशी आला होता. त्यामुळे त्यांना दुसरी धाव घेता आली नाही आणि समीकरण एक चेंडू 8 धावा असं झालं. सुंदरने त्या चेंडूवर आणखी एक धाव मिळवली असती तर शेवटच्या चेंडूवर षटकार लगावून मुकाबला सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण तसं झालं नाही. शेवटचा चेंडू निर्धाव पडला आणि दिल्लीने 7 धावांनी विजय मिळवला.
कमी धावसंख्येच्या या मुकाबल्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संथ आणि धीम्या खेळपट्टीवर दिल्लीच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. त्यांनी 144 धावांची मजल मारली. मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 34 धावा केल्या. हैदराबादतर्फे वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स पटकावल्या. मिचेल मार्श (25) तर डेव्डिड वॉर्नरने (21) धावा केल्या. पण कोणालाही नेहमीच्या सराईतपणे खेळता आलं नाही. मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 59 चेंडूत केलेली 69 धावांची भागीदारी निर्णायक ठरली.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्युत्तरादाखल खेळताना धोकादायक हॅरी ब्रूकला अँनरिक नॉर्कियाने त्रिफळाचीत केलं. राहुल त्रिपाठी 15 धावा करुन तंबूत परतला. अभिषेक शर्मा फक्त 5 धावा करु शकला. कर्णधार एडन मारक्रमही 3 धावा करुन तंबूत परतला. अनुभवी मयांक अगरवालने 39 चेंडूत 7 चौकारांसह 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. लक्ष्य दूर जातंय असं वाटत असतानाच हेनरिच लासेनने 19 चेंडूत 31 धावांची तडाखेबंद खेळी करत विजय दृष्टिक्षेपात आणला. वॉशिंग्टन सुंदरने चांगली सुरुवात केली. तो संघाला घरच्या मैदानावर विजय मिळवून देणार असं चित्र होतं पण ते स्वप्न स्वप्नच राहिलं. वॉशिंग्टनने नाबाद 24 धावा केल्या. दिल्लीतर्फे नॉर्किया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




